Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इफिसकरांस 1:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 मंडळी जे त्यांचे शरीर, तिला त्यांच्या परिपूर्णतेने सर्वकाही सर्वप्रकारे पुरवितात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 हीच त्याचे शरीर; जो सर्वांनी सर्वकाही भरतो त्याने ती भरलेली आहे.1

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 हेच ख्रिस्ताचे शरीर. जो सर्वांनी सर्वकाही भरतो त्याने ते भरलेले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

23 ही ख्रिस्तमंडळी शरीर असून जो सर्व काही सर्व ठिकाणी परिपूर्ण करतो त्याची ख्रिस्तमंडळी ती परिपूर्ती आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इफिसकरांस 1:23
19 Iomraidhean Croise  

त्यांच्या पूर्णतेतून आम्हा सर्वांना कृपेवर कृपा भरून मिळाली आहे.


यास्तव केवळ संभवनीय दंडाकरिताच नव्हे, तर सदसद्विवेकबुद्धीमुळे अधिकार्‍यांच्या अधीन राहणे आवश्यक आहे.


कार्य निरनिराळ्या प्रकारचे आहेत, परंतु त्या सर्व गोष्टींमध्ये आणि प्रत्येकामध्ये कार्य करणारे परमेश्वर एकच आहेत.


हे सर्व त्यांनी केल्यानंतर, पुत्र स्वतः त्यांच्या अधीन होईल ज्या परमेश्वराने सर्वकाही त्यांच्या स्वाधीन केले आहे, यासाठी की परमेश्वराने सर्वात सर्वकाही व्हावे.


कारण त्यांनी क्रूसाद्वारे वैरभाव नाहीसा करून व दोघांना एक शरीर करून परमेश्वराशी समेट घडवून आणला.


यासाठी की आता मंडळीद्वारे, आकाशमंडळातील शासक आणि अधिकार्‍यांना परमेश्वराचे विविध ज्ञान कळावे हाच त्यांचा उद्देश होता,


आणि ही प्रीती जी ज्ञानापलीकडे आहे, ती तुम्हाला समजावी, यासाठी की तुम्ही स्वतः परमेश्वराच्या सर्व पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे.


जे अधोभागात उतरले त्यांनी पूर्ण सृष्टी भरून जाण्याच्या उद्देशाने स्वर्गाच्या उच्च स्थानापर्यंत सन्मानाने आरोहण केले.


हे यासाठी की त्यांच्या लोकांना सेवेच्या कार्यात सिद्ध करून ख्रिस्ताचे शरीर सुसज्ज व्हावे.


जोपर्यंत आपण सर्व विश्वास आणि परमेश्वराच्या पुत्राच्या ज्ञानामध्ये एकता, परिपक्वता व ख्रिस्ताची परिपूर्णता यापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत हे दिले आहे.


जसे एक शरीर व एक आत्मा, तसेच आपल्याला एकाच गौरवी आशेसाठी पाचारण करण्यात आले होते.


आता तुमच्यासाठी दुःख सहन करण्यात मला आनंद आहे; कारण ख्रिस्ताने, त्यांचे शरीर म्हणजे मंडळी हिच्याकरिता सोसलेल्या दुःखातले जे अद्यापि अपूर्ण राहिलेले आहे, ते मी माझ्या शरीरामध्ये भरून काढत आहे.


त्या लोकांचा त्यांच्या मस्तकाशी संबंध तुटला आहे, ज्या मस्तकाला संपूर्ण शरीर बळकटपणे एकत्रित जोडले जाते, सांधे व बंधने त्यांच्यापासून पुरवठा पावते व त्याची परमेश्वरामध्ये वाढ होते.


यामध्ये गैरयहूदी किंवा यहूदी, सुंती किंवा असुंती, बर्बर व स्कुथी, गुलाम किंवा स्वतंत्र असा फरक नाही, परंतु ख्रिस्तच सर्व आणि सर्वात आहेत.


ख्रिस्ताची शांती, तुमच्या अंतःकरणात राज्य करो; कारण एकाच शरीराचे अवयव म्हणून तुम्हीही या शांतीसाठी बोलावलेले आहात. तुम्ही कृतज्ञ राहा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan