Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 7:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 सन्माननीय नाव हे सुवासिक अत्तरापेक्षा उत्तम आहे, आणि मृत्युदिन जन्म दिवसापेक्षा उत्तम आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 सुवासिक अत्तरापेक्षा नावलौकिक बरा; जन्मदिनापेक्षा मृत्युदिन बरा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 किंमती सुगंधी द्रव्यापेक्षा चांगले नाव असणे हे उत्तम आहे, आणि जन्मदिवसापेक्षा मरण दिवस उत्तम आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 7:1
23 Iomraidhean Croise  

कारण तिथे दुष्ट त्रास देण्याचे थांबवितात, आणि थकलेले लोक विसावा पावतात.


ते अहरोनाच्या मस्तकावर ओतलेल्या मोलवान तेलासमान, त्याच्या दाढीवर ओघळलेल्या, अहरोनाच्या दाढीवर ओघळलेल्या, झग्याच्या काठापर्यंत आलेल्या सुगंधी तेलाप्रमाणे आहे.


निरोप्याच्या नजरेतील चमक हृदयाला आनंद देते, आणि शुभवार्ता हाडांना आरोग्य देते.


चांगले नाव मिळविणे पुष्कळ संपत्ती मिळविण्यापेक्षा व बहुमान मिळविणे सोन्याचांदीपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे.


नाहीतर तो ऐकणारा तुला निर्लज्ज ठरवेल आणि तुझ्याविरुद्ध तो दावा दाखल करेल.


अत्तर आणि सुगंध मनाला आनंद देतात, आणि अंतःकरणापासून दिलेल्या सल्ल्यातून मित्राचा आनंद उसळून येतो.


जशा मेलेल्या माशा सुगंधी तेलाला दुर्गंधी बनवतात, तसेच जराशी मूर्खता सुज्ञान आणि सन्मानावर भारी पडते.


यावरून मी घोषित केले, मृत असलेल्या व्यक्ती, जिवंत असलेल्या माणसांपेक्षा अधिक संतुष्ट आहेत.


एखाद्या कामाचा शेवट त्याच्या आरंभापेक्षा बरा, आणि गर्वापेक्षा सहनशीलता बरी.


तुझ्या अत्तरांचा सुगंध सुखदायक आहे; तुझे नाव ओतलेल्या अत्तरासारखे आहे. तरुण कुमारी तुझ्यावर प्रेम करतात यात आश्चर्य नाही!


माझ्या भगिनी, माझ्या वधू, तुझे प्रेम किती हर्षित करणारे आहे! तुझे प्रेम द्राक्षारसापेक्षा कितीतरी उत्तम आहे, इतर सुगंधी द्रव्यांपेक्षा तुझ्या अत्तराचा सुगंध अधिक मनमोहक आहे.


त्यांना मी माझ्या मंदिरामध्ये व त्याच्या भिंतीच्या आत पुत्र व कन्यापेक्षाही चांगले असे संस्मरणीय बनवेन व एक नाव देईन. त्यांना मी सर्वकाळ टिकणारे नाव देईन, जे नाव कधीही नाहीसे होणार नाही.


तेव्हा हे याहवेह, माझा जीव घ्या, कारण मला जगण्यापेक्षा मरणेच बरे आहे.”


तरीपण दुष्टात्मे तुमची आज्ञा पाळतात, या गोष्टींचा आनंद करण्यापेक्षा तुमची नावे स्वर्गात नोंदली गेली आहेत याचा आनंद करा.”


संध्याकाळचे भोजन चालू असताना, येशूंचा विश्वासघात करावा असा विचार सैतानाने शिमोनाचा पुत्र यहूदाह इस्कर्योतच्या मनात घातला होता.


आम्हास ठाऊक आहे की ज्या ऐहिक तंबू—आमचे शरीर—मध्ये आम्ही राहतो त्याचा जर नाश झाला, तर परमेश्वराने आमच्यासाठी इमारत, सार्वकालिक स्वर्गीय घर जे मानवी हाताने बांधलेले नाही असे तयार केले आहे.


आमचा भरवसा आहे आणि हे आम्हास बरे वाटते की या शरीरापासून वेगळे होऊन प्रभूसह आपण आनंदाने वास करावा.


पुरातन काळातील परमेश्वराचे भक्त त्यांच्या विश्वासाबद्दल नावाजलेले होते.


या माणसांनी विश्वासाद्वारे परमेश्वराची मान्यता मिळविली, तरीपण त्यांच्यापैकी कोणालाही परमेश्वराच्या वचनांची फळे मिळाली नाहीत;


मग मला आकाशातून एक वाणी ऐकू आली. ती मला म्हणाली “हे लिही: आतापासून प्रभूमध्ये मृत झालेले ते धन्य.” आत्मा म्हणतो, “होय, कारण आता सर्व श्रमापासून त्यांना विश्रांती मिळेल. त्यांची सत्कृत्ये त्यांच्या मागोमाग जातील.”


म्हणून ती सकाळपर्यंत त्याच्या पायाजवळ पडून राहिली, परंतु इतर कोणालाही कळण्याआधी ती उठून बसली, तेव्हा तो म्हणाला, “कोणालाही हे माहीत व्हायला नको की एक स्त्री या खळ्यात आली होती.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan