उपदेशक 4:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 एक एकटाच मनुष्य होता; त्याला ना मुलगा होता ना भाऊ. त्याच्या श्रमाला अंत नव्हता, तरी त्याच्या डोळ्यात धनाने तृप्तता नव्हती. तो विचारीत होता, “मी कोणासाठी हे श्रम करीत आहे,” “आणि मी स्वतःला आनंदापासून का वंचित ठेवीत आहे?” हे सुद्धा व्यर्थ आहे— ही दैन्यावस्था आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 कोणी एकटाच असून त्याला दुसरा कोणी नाही; त्याला पुत्र किंवा बंधू नाही; तरी त्याच्या कष्टाला अंत नाही, व धनाने त्याच्या नेत्रांची तृप्ती होत नाही. तो म्हणतो, “मी हे श्रम करतो व माझ्या जिवाचे सुख दवडतो, हे कोणासाठी?” हेही व्यर्थ, कष्टमय होय. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तेथे अशाप्रकारचा कोणी मनुष्य आहे, तो एकटाच असून त्यास दुसरा कोणी नाही. त्यास मुलगा किंवा भाऊ नाही. परंतु तेथे त्याच्या कष्टाला अंत नाही. मिळकतीच्या धनाने त्याच्या नेत्राचे समाधान होत नाही. तो स्वतःशीच विचार करून म्हणतो, मी इतके कष्ट कोणासाठी करीत आहे? आणि माझ्या जिवाचे सुख हिरावून घेत आहे? हेही व्यर्थ आहे, वाईट कष्टमय आहे. Faic an caibideil |