Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 2:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मी स्वतःसाठी चांदी आणि सोन्याचा व राजांच्या व प्रांताच्या मौल्यवान वस्तूंचा मोठा संग्रह केला. मी गायक आणि गायिका ठेवल्या, तसेच उपपत्न्यांसाठी जनानखानाही तयार केला—जे मनुष्याचे हृदय हर्षित करते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मी सोन्यारुप्याचा आणि राजांजवळ असणार्‍या देशोदेशींच्या बहुमूल्य पदार्थांचा संचय केला; स्वतःसाठी गाणारे व गाणारणी मिळवल्या आणि मानवपुत्रांना रंजवणार्‍या अशा बहुत उपस्त्रिया मी ठेवल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मी माझ्यासाठी सोने आणि चांदी, राजे व राष्ट्रे यांच्या संपत्तीचा संग्रह केला. माझ्यासाठी गाणे म्हणणारे स्त्री-पुरुष माझ्याजवळ होते आणि मानवजातीस आनंदीत करणारे सर्व होते जसे पुष्कळ स्त्रिया ठेवल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 2:8
21 Iomraidhean Croise  

आणि तिने राजाला एकशेवीस तालांत सोने, पुष्कळ सुगंधी द्रव्ये व मौल्यवान रत्ने दिली. शबाच्या राणीने शलोमोन राजाला इतकी सुगंधी द्रव्ये आणली की त्यानंतर तेवढी द्रव्ये परत कोणी आणली नाहीत.


त्यांनी ओफीरपर्यंत प्रवास करून चारशे वीस तालांत सोने परत आणले व ते शलोमोन राजाला दिले.


मी ऐंशी वर्षाचा आहे. कोणत्या गोष्टी मला आनंद देतील आणि कोणत्या नाही यातील फरक मला सांगता येईल काय? आपला सेवक जे काही खातो किंवा पितो याची चव तरी त्याला कळते काय? गाणारे पुरुष किंवा स्त्रियांचा आवाज मला अजूनही ऐकायला येतो काय? माझ्या स्वामीला त्यांचा सेवक एक ओझे म्हणून का असावा?


शलोमोनला मिळत जाणारे वार्षिक सोने सहाशे सहासष्ट तालांत होते,


तुम्ही वीणेच्या सुरावर निरर्थक गाणी गाता, आणि दावीदासारखे आहोत याची भ्रामक कल्पना करता.


मग आता जेव्हा तुम्ही शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पावा आणि सर्वप्रकारच्या वाद्यांचा गजर ऐकताच मी तयार केलेल्या पुतळ्याला तुम्ही नमन केले आणि उपासना केली तर उत्तम. परंतु जर तुम्ही उपासना नाही केली तर त्याच घटकेस तुम्हाला अग्नीच्या धगधगत्या भट्टीत टाकण्यात येईल. मग माझ्या हातून कोणता देव तुम्हाला सोडवितो ते पाहूया?”


म्हणून जेव्हा त्यांनी कर्णे, बासरी, सतार, तंतुवाद्य, वीणा आणि सर्वप्रकारचे संगीत ऐकले, तेव्हा सर्व वंश आणि भाषांचे लोक पालथे पडले आणि त्यांनी राजा नबुखद्नेस्सरने प्रतिष्ठापन केलेल्या सोन्याच्या मूर्तीची आराधना केली.


शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पावा आणि सर्वप्रकारच्या वाद्यांचा गजर ऐकताच, तुम्हाला नबुखद्नेस्सर महाराजांनी उभारलेल्या या सुवर्ण पुतळ्याला दंडवत घालून उपासना करावी लागेल.


याशिवाय त्यांचे 7,337 दास व दासी व 200 गायक व गायिका होत्या.


शलोमोनने याहवेहच्या मंदिरात व राजवाड्यात पायर्‍या बनवण्यासाठी व वादकांसाठी वीणा व सतारी बनविण्यास चंदनाच्या लाकडाचा उपयोग केला. यहूदीयामध्ये त्यासारखे कधीही पाहण्यात आले नव्हते.)


हे सर्वजण याहवेहच्या मंदिरात आपल्या पित्याच्या नेतृत्वाखाली झांजा, सतारी व वीणा वाजवून परमेश्वराच्या भवनात सेवा करीत असत. आसाफ, यदूथून व हेमान राजाच्या नेतृत्वाखाली कार्य करीत.


दावीद व निवासमंडपाचे अधिकारी यांनी आसाफ, हेमान व यदूथूनच्या काही पुत्रांना सतारी, वीणा व झांजा वाजवून संदेशाची सेवा करण्यासाठी वेगळे केले. त्यांच्या सेवेनुसार त्यांची यादी अशी आहे:


म्हणून रेहोबोअम राजाने त्या सोन्याच्या ढालींच्या ऐवजी कास्याच्या ढाली तयार केल्या व राजवाड्यातील पहारेकर्‍यांच्या कामगिरीवर असलेल्यांच्या हाती त्या स्वाधीन केल्या.


शलोमोनचे सर्व प्याले सोन्याचे होते. लबानोनच्या वाळवंटातील राजवाड्यात असलेली सर्व पात्रे सुद्धा शुद्ध सोन्याची होती. चांदीचे काहीही बनविले नव्हते, कारण शलोमोनच्या काळात चांदीचे मोल कमी मानले जात असे.


हीरामाने राजाकडे एकशेवीस तालांत सोने पाठवले होते.


त्याला राजकीय घराण्यातील सातशे पत्नी आणि तीनशे उपपत्नी होत्या व त्याच्या पत्नींनी त्याला बहकविले.


“व्यर्थ आहे! व्यर्थ आहे!” उपदेशक म्हणतो. “निव्वळ व्यर्थ! सर्वकाही व्यर्थ आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan