Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 2:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 मी स्वतःला द्राक्षारसाने हर्षित करण्याचा प्रयत्न केला व मूर्खता जवळ करून—तरीही माझे मन मला ज्ञानाने चालवित होते. मनुष्य या पृथ्वीवरील थोडक्या दिवसांमध्ये काय चांगले करू शकतो हे मला हे बघायचे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मानवपुत्रांनी आपल्या सार्‍या आयुष्यात ह्या भूतलावर2 काय केले असता त्यांचे हित होईल ह्याचा निर्णय समजावा म्हणून विवेकाने माझ्या मनाचे संयमन करून द्राक्षारसाने माझ्या शरीराची चैन कशी होईल आणि मूर्खपणाच्या आचारांचे अवलंबन कसे करता येईल ह्याचा मी आपल्या मनाशी शोध केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 जे मनुष्यास चांगले, जे त्यांनी आकाशाखाली आपल्या आयुष्याचे सर्व दिवस करावे ते मी शोधून पाहीपर्यंत माझे मन मला ज्ञानाच्या योगाने वाट दाखवीत घेऊन जात असताही, मी आपली इच्छा द्राक्षरसाने कशी पुरी करावी आणि मूर्खपणाच्या आचारांचे अवलंबन कसे करता येईल याचा मी आपल्या मनाशी शोध केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 2:3
22 Iomraidhean Croise  

आणि याकोबाने फारोहला उत्तर दिले, “माझी जीवनयात्रा एकशे तीस वर्षाची आहे. माझी ही वर्षे अत्यंत कष्टाची आणि दुःखाची अशी होती; तरीपण माझ्या पूर्वजांइतके माझे वय अजून झालेले नाही.”


जर कोणी मेला तर पुन्हा जिवंत होईल का? माझ्या सर्व कठीण श्रमाच्‍या दिवसात माझ्या सुटकेची मी वाट पाहीन.


मानवाचे हृदय उल्हासित करण्यास द्राक्षारस, त्याचे मुख तुळतुळीत राखण्यासाठी तेल आणि त्याच्या हृदयाचे जतन व्हावे म्हणून भाकर उत्पन्न करतात.


मद्य चेष्टा करते आणि मदिरा मोठमोठ्याने भांडणे काढते; तिच्यामुळे जे पथभ्रष्ट होतात ते शहाणे नाहीत.


मग मी सुज्ञता तसेच वेडेपणा व मूर्खपणा जाणून घेण्याचा प्रयास केला, परंतु मला समजले की, हे देखील वार्‍याचा पाठलाग केल्यासारखे आहे.


मनोरंजनासाठी मेजवानी असते, द्राक्षारस जीवनाला आनंदित बनविते, आणि पैशाने सर्व समस्याचे समाधान होते.


आता सर्व ऐकून झाले; सर्व गोष्टींचा निष्कर्ष हाच की: परमेश्वराचे भय बाळग आणि त्यांच्या आज्ञा पाळ, कारण सर्व मानवजातीचे हेच कर्तव्य आहे.


खाणे आणि पिणे करून स्वतःच्या कष्टामधून समाधान मिळविणे यापेक्षा मानव अधिक चांगले काय करू शकतो आणि मी पाहतो की, हे सुद्धा परमेश्वराच्याच हातात आहे,


तरी एक चांगली गोष्ट मी पाहिली: मनुष्याने खावे, प्यावे व परमेश्वराने आपल्याला सूर्याखाली दिलेल्या या थोड्या दिवसाच्या कष्टमय जीवनात जे आहे, त्यात समाधान मानावे—हाच त्यांचा वाटा आहे.


वायफळ सावलीसारख्या अल्पकाळच्या जीवनात उत्तम काय आहे हे कोणा मनुष्याला सांगता येईल काय? मेल्यानंतर सूर्याच्या खाली काय होईल, हे कोणाला सांगता येईल?


पहिल्याला घट्ट धरून ठेवणे, आणि दुसर्‍यालाही सोडून न देणे हे बरे. जे परमेश्वराचे भय धरतात ते अतिरेक टाळतील.


ज्ञान व रचनेच्या पध्दती जाणून व त्याच शोध घेण्यासाठी आणि दुष्टतेची मूर्खता व मूर्खतेचा वेडेपणा समजण्यासाठी मी माझे मन वळविले.


म्हणून मी जीवनाच्या आनंदाची प्रशंसा केली, कारण मनुष्याने खावे, प्यावे, व आनंद करावा, सूर्याखाली त्याहून अधिक चांगले काही नाही. तेव्हा सूर्याखाली परमेश्वराने दिलेल्या त्यांच्या कष्टदायक जीवनाच्या सर्व दिवसात, त्यांना आनंदाची साथ लाभेल.


“कोणी दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही. तुम्ही एकाचा द्वेष कराल आणि दुसर्‍यावर प्रीती कराल किंवा एकाला समर्पित असाल आणि दुसर्‍याला तुच्छ मानाल. तुम्हाला परमेश्वराची आणि धनाची सेवा एकाच वेळी करता येणार नाही.


मद्यपान करून धुंद होऊ नका, ज्यामुळे अनीती वाढते. त्याऐवजी आत्म्याने परिपूर्ण व्हा.


“परंतु द्राक्षवेलाने उत्तर दिले, ‘केवळ इतर वृक्षांवर हलतडुलत राहण्यासाठी दैवत व मनुष्यांना आनंदित करणारा द्राक्षारस देण्याचे मी सोडून द्यावे का?’


जेव्हा अबीगईल नाबालाकडे गेली तेव्हा तो घरात होता, त्याने एका राजासारखी मेजवानी आयोजित केली होती. आणि मद्यपान करून तो फार नशेत होता, म्हणून सकाळ होईपर्यंत तिने त्याला काहीही सांगितले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan