Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 1:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 वारा दक्षिणेकडे वाहतो आणि उत्तरेकडे वळतो; तो गोल गोल भ्रमण करीत आपल्या ठिकाणी परत जातो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 वायू दक्षिण दिशेकडे वाहतो व उलटून उत्तर दिशेकडे वाहतो; तो एकसारखा घुमत जाऊन पुनःपुन्हा आपली फेरी करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 वारा दक्षिणेकडे वाहतो आणि उत्तरेकडे वळतो, नेहमी त्याच्यामार्गाने सभोवती जाऊन फिरून आणि पुन्हा माघारी येतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 1:6
11 Iomraidhean Croise  

जेव्हा तुझ्या वस्त्रांमध्ये तुला घाम फुटतो आणि दक्षिणेच्या वार्‍यामुळे भूमी स्तब्ध होते,


त्यांच्या भवनामधून तुफान येते, आणि वादळी वार्‍यातून थंडी येते.


ते बोलले व सागरात प्रचंड उत्पात होऊन, त्या वादळाने लाटा उंचच उंच उसळल्या.


त्यांनी वादळ असे शांत केले की ते कुजबुज करू लागले, आणि समुद्राच्या लाटा अगदी स्तब्ध केल्या.


सर्व प्रवाह समुद्रास मिळतात, तरीही समुद्र कधी भरलेला नाही. नद्या पुन्हा त्या स्थानाकडून वाहू लागतात, जिथून त्यांचा उगम होतो,


जसे वार्‍याचे मार्ग, किंवा आईच्या उदरात गर्भ कसा वाढतो हे तुला कळत नाही, तसेच परमेश्वर जे सर्वांचे निर्माणकर्ता आहेत, त्यांची कृत्येही तुला समजू शकत नाहीत.


मग याहवेहने समुद्रावर एक प्रचंड वारा सोडला आणि इतके भयंकर वादळ उठले की जहाज फुटण्याचे भय उद्भवले.


“यास्तव माझी शिकवण ऐकणारे व त्याप्रमाणे वागणारे सर्वजण एका शहाण्या मनुष्यासारखे आहेत. त्याने आपले घर खडकावर बांधले.


मग पाऊस पडला, पूर आला, वारेही सुटले आणि त्या घरावर जोराने आदळले आणि ते घर कोसळून पडले.”


वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, परंतु तो कुठून आला व कुठे जाईल हे तुम्ही सांगू शकत नाही. तसेच जो प्रत्येकजण आत्म्यापासून जन्मतो त्यांच्या बाबतीत असेच आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan