Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 1:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 या सूर्याखाली लोक जे कष्ट करतात, त्याचा त्यांना काय लाभ?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 ह्या भूतलावर2 मनुष्य जे सर्व परिश्रम करतो त्यांत त्याला काय लाभ?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 भूतलावर मानवजात जे सर्व कष्ट करते त्यापासून त्यास काय लाभ?

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 1:3
23 Iomraidhean Croise  

तरी जेव्हा माझ्या सर्व हस्तकृतीचे, आणि माझ्या कष्टसाध्य कार्याने मी काय मिळविले याचा मी आढावा घेतला, तर सर्वकाही व्यर्थ, वार्‍याचा पाठलाग करण्यासारखे होते; सूर्याखाली काहीच लाभले नाही.


या सूर्याखाली मी ज्याच्यासाठी कष्ट केले, त्या सर्वाचा मला द्वेष वाटू लागला, कारण जे लोक माझ्यानंतर येणार त्यांच्यासाठी ते मला सोडून द्यावे लागणार.


कोणाला माहीत की तो व्यक्ती सुज्ञ असेल वा मूर्ख? तरीही सूर्याखाली ज्यामध्ये मी माझे प्रयत्न आणि कौशल्य ओतले, त्या माझ्या या कष्टाच्या प्रतिफळांचा ताबा त्यांच्याकडे असेल. हे सुद्धा व्यर्थच आहे.


सूर्याखाली त्या लोकांचे सर्व कष्ट, ज्यासाठी त्यांनी मनापासून परिश्रम केले त्याचे त्यांना काय मिळणार?


कामकर्‍यांना त्यांच्या कष्टापासून काय मोबदला मिळतो?


परंतु त्या दोघांपेक्षाही जो जन्मालाच आला नाही तो अधिक बरा. सूर्याखाली असलेले जे वाईट ते त्यांच्या पाहण्यात आले नाही.


पुन्हा एकदा या सूर्याखाली निरर्थक असे काहीतरी मी पाहिले:


ही देखील अतिशय भयानक दुष्टता आहे: सर्वजण जसे येतात, तसेच ते जातात, आणि वार्‍यासाठी कष्ट करून त्यांना काय मिळते?


तरी एक चांगली गोष्ट मी पाहिली: मनुष्याने खावे, प्यावे व परमेश्वराने आपल्याला सूर्याखाली दिलेल्या या थोड्या दिवसाच्या कष्टमय जीवनात जे आहे, त्यात समाधान मानावे—हाच त्यांचा वाटा आहे.


वायफळ सावलीसारख्या अल्पकाळच्या जीवनात उत्तम काय आहे हे कोणा मनुष्याला सांगता येईल काय? मेल्यानंतर सूर्याच्या खाली काय होईल, हे कोणाला सांगता येईल?


सुज्ञान, हे वतन प्राप्तीप्रमाणे चांगले आहे, आणि ज्यांना सूर्य दिसतो त्यांच्यासाठी ते लाभदायक आहे.


सुज्ञानाचे हे उदाहरण मी सूर्याखाली पाहून फार प्रभावित झालो:


सूर्याखाली घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीत हे वाईट आहे: एकसमान नियती सर्वांवर मात करते. शिवाय, लोकांची अंतःकरणे दुष्टाईने भरलेली आहेत आणि जिवंत असताना त्यांच्या अंतःकरणात वेडेपणा आहे आणि नंतर ते मृतांमध्ये सामील होतात.


त्यांचे प्रेम, त्यांचा द्वेष आणि त्यांचा हेवा हे सर्व फार पूर्वीच नाहीसे झाले आहे; सूर्याखाली घडत असलेल्या कोणत्याही गोष्टीत पुन्हा त्यांचा वाटा नसेल.


जी भाकर नाही त्या अन्नपदार्थांवर व्यर्थ पैसे का खर्च करावे, आणि ज्याने समाधान होत नाही त्यासाठी कष्ट का करावे? ऐका, माझे ऐकून घ्या आणि जे चांगले आहे ते खा, आणि हे उत्तम अन्नपदार्थ खाऊन तुम्ही अत्यंत आनंदित व्हाल.


लोकांचे कष्ट अग्नीत घालण्याचे सरपण होणे, आणि देशांनी केलेले सर्व श्रम व्यर्थच जावे असे सर्वसमर्थ याहवेहनी निर्धारित केले नाही काय?


“मूर्तीकाराने निर्मित केलेल्या मूर्तीची काय किंमत आहे? किंवा प्रतिमा, जी असत्य शिकविते? स्वतःच्या हस्तकृतीवर भरवसा ठेवणारे; तो मूर्ती घडवितो जी बोलू शकत नाही.


कोणी सर्व जग मिळविले आणि आपला आत्मा गमविला तर त्यातून काय चांगले निष्पन्न होणार? आपल्या आत्म्याच्या मोबदल्यात मनुष्याला दुसरे काही देता येईल का?


नाशवंत अन्नासाठी कष्ट करू नका, तर जे अन्न सार्वकालिक जीवनासाठी टिकते व जे मानवपुत्र तुम्हाला देतो, ते मिळविण्यासाठी झटा, कारण परमेश्वरपित्याने आपल्या मान्यतेचा शिक्का त्यांच्यावर दिला आहे.”


की जे कोणी साहाय्य आणि श्रम करतात अशा लोकांच्या स्वाधीन राहा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan