Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 8:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 बेलशस्सर राजाच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी, मी जो दानीएलने पहिल्यासारखाच आणखी एक दृष्टान्त पाहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मी जो दानीएल त्या मला प्रथम दृष्टान्त झाला होता, त्यानंतर बेलशस्सर राजाच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी मला पुन्हा दृष्टान्त झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 त्यानंतर बेलशस्सर राजाच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी मी जो दानीएल त्या मला प्रथम दृष्टांत झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 8:1
11 Iomraidhean Croise  

माझ्या तिसाव्या वर्षी, चौथ्या महिन्याच्या पाचव्या दिवशी, खेबर नदीजवळ मी निर्वासित लोकांबरोबर असताना, स्वर्ग उघडले आणि मी परमेश्वराचा दृष्टान्त पाहिला.


परमेश्वराने या चार तरुणांना सर्वप्रकारच्या साहित्याचे ज्ञान आणि समज दिली. दानीएलला सर्व प्रकारची स्वप्ने व दृष्टान्त समजत असत.


त्यावेळेस मी, दानीएल, तीन आठवडे शोक करीत होतो.


हा दृष्टान्त केवळ मला, दानीएललाच दिसला; जे माझ्याबरोबर होते, त्यांना तो दिसला नाही, परंतु त्यांना अतिशय भीतीने ग्रासले व लपण्यासाठी ते पळून गेले.


त्याचा उदय झाल्यानंतर त्याचे राज्य भंग पावेल आणि चार दिशांत त्याची विभागणी होईल. हे त्याच्या वंशजांकडे जाणार नाही किंवा ज्या सामर्थ्याने त्याने राज्य केले ते त्यांच्याकडे नसेल, कारण त्याचे साम्राज्य उपटले जाईल आणि ते दुसर्‍यांना दिले जाईल.


बाबेलचा राजा बेलशस्सर याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी दानीएल आपल्या बिछान्यावर पडला असताना त्याने स्वप्न पाहिले व मनात दृष्टान्त पाहिला. त्याने आपल्या स्वप्नाचा सारांश लिहून ठेवला.


“मी, दानीएल, माझ्या आत्म्यात खूप व्यथित झालो आणि मी माझ्या मनात जो दृष्टान्त पाहिला, त्यामुळे मी गोंधळून गेलो.


“येथे हा विषय समाप्त होतो. मी दानीएल, आपल्या विचारांनी व्याकूळ झालो. आणि माझा चेहरा पांढराफटक पडला, परंतु मी ही गोष्ट आपल्या मनात ठेवली.”


मग मी दानीएल, या दृष्टान्ताचा अर्थ काय असावा ते जाणून घेण्याच्या प्रयत्न करू लागलो, तेवढ्यात एकाएकी मानवासारखा दिसणारा कोणी एक पुरुष माझ्यासमोर उभा राहिला.


माझ्या दृष्टान्तात मी असे पाहिले की, मी एलाम प्रांतातील शूशनच्या किल्ल्यात आहे; मी दृष्टान्तात उलई नदीकाठी उभा होतो.


त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी मला, दानीएलला, संदेष्टा यिर्मयाहला दिलेल्या याहवेहच्या वचनानुसार पवित्र शास्त्रातून समजले की यरुशलेम सत्तर वर्षे उजाड अशा अवस्थेत राहील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan