Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 7:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 दानीएल म्हणाला: रात्री मी आपल्या दृष्टान्तात पाहिले, माझ्यापुढे स्वर्गातील चार वाऱ्यांनी मोठ्या समुद्राला घुसळले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 दानिएलाने म्हटले, “मी रात्री दृष्टान्तात पाहिले तर चार्‍ही दिशांचे वारे महासागरावर सुटले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 दानीएलाने म्हटले, “रात्रीच्या माझ्या दृष्टांतात मी पाहीले स्वर्गातील चार वारे महासागरावर घोळत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 7:2
13 Iomraidhean Croise  

पुष्कळ राष्ट्रे जी संतापतात त्यांना धिक्कार असो— ते उफाळणाऱ्या समुद्राप्रमाणे रागावतात! गर्जना करणाऱ्या लोकांचा धिक्कार असो— पाण्याच्या प्रचंड लोंढ्याप्रमाणे ते गर्जना करतात!


मी एलामच्या विरुद्ध चारही दिशातील वार्‍याला आणेन; ते आकाशाच्या चारही कोपऱ्यातून येतील; मी त्यांना चारही दिशातील वार्‍यावर पसरवून टाकेन, असे एकही राष्ट्र नसेल जिथे एलामचे निर्वासित नसतील.


बाबेलवर सागर उसळून येईल; सागरलाटांनी ती भूमी झाकून जाईल.


त्याचा उदय झाल्यानंतर त्याचे राज्य भंग पावेल आणि चार दिशांत त्याची विभागणी होईल. हे त्याच्या वंशजांकडे जाणार नाही किंवा ज्या सामर्थ्याने त्याने राज्य केले ते त्यांच्याकडे नसेल, कारण त्याचे साम्राज्य उपटले जाईल आणि ते दुसर्‍यांना दिले जाईल.


त्या रात्री याहवेहने दानीएलला दृष्टान्तात ते रहस्य प्रकट केले. तेव्हा दानीएलने स्वर्गाच्या परमेश्वराला धन्यवाद दिला.


“नंतर रात्री दृष्टान्तात पाहत होतो आणि मी पाहिले, मानवपुत्रासारखा आकाशात मेघारूढ होऊन येत असलेला दिसला. तो प्राचीन पुरुषाकडे गेला आणि त्याच्या उपस्थितीत त्याला सादर करण्यात आले.


“यानंतर रात्री मी दृष्टान्तात पाहत होतो आणि तिथे माझ्यापुढे चौथा पशू होता—तो भयंकर आणि विक्राळ आणि फार बलिष्ठ होता. त्याला मोठे लोखंडी दात होते; त्याने आपल्या काही बळींना चिरडून टाकले, काहींना फाडून खाल्ले आणि उरलेल्यांना पायाखाली तुडविले. पूर्वीच्या सर्व पशूपेक्षा हा पशू वेगळा होता. त्याला दहा शिंगे होती.


माझ्या दृष्टान्तात मी असे पाहिले की, मी एलाम प्रांतातील शूशनच्या किल्ल्यात आहे; मी दृष्टान्तात उलई नदीकाठी उभा होतो.


तो बोकड फार महान झाला, परंतु तो बलिष्ठ झाल्यामुळे त्याचे मोठे शिंग मोडले आणि त्या शिंगाच्या जागी चार ठळक शिंगे फुटली. त्यांची टोके चारही दिशांनी वाढली.


देवदूताने मला उत्तर दिले, “अखिल पृथ्वीच्या प्रभूच्या समोर उभे राहणारे हे चार स्वर्गीय आत्मे आहेत, ते तिथून बाहेर जात आहेत.


तो कर्ण्यांच्या महानादाबरोबर आकाशांच्या या टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत आणि चारही दिशेकडून त्याच्या निवडलेल्या लोकांना एकत्र करण्यासाठी आपल्या दूतांस पाठवेल.


तेव्हा देवदूत मला म्हणाला, “ती वेश्या ज्यांच्यावर बसली आहे, ते जलप्रवाह म्हणजे प्रत्येक लोक, समुदाय, राष्ट्र व भाषा आहेत.


त्यानंतर पृथ्वीच्या चारही कोपर्‍यांवर चार देवदूत उभे राहिलेले मी पाहिले. पृथ्वीवरील भूमी, समुद्र किंवा कोणताही वृक्ष, यावर वाहू नये म्हणून ते त्या चारही वार्‍यांना थोपवून धरीत होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan