Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 4:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 किती महान त्यांनी प्रकट केलेली चिन्हे, किती थोर त्यांनी केलेले चमत्कार! त्यांचे राज्य सदासर्वकाळचे आहे; त्यांचे प्रभुत्व पिढ्यान् पिढ्या राहणारे आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्याची चिन्हे किती थोर! त्याच्या अद्भुत चमत्कारांचा प्रभाव केवढा! त्याचे राज्य सर्वकालचे आहे व त्याचे प्रभुत्व पिढ्यानपिढ्या राहणारे आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 त्याची चिन्हे किती थोर, त्याचे चमत्कार किती अद्भूत, त्याचे राज्य हे सार्वकालीक राज्य आहे. त्याचे स्वामित्व पिढ्यानपिढ्या राहते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 4:3
29 Iomraidhean Croise  

“प्रभुत्व आणि भय हे परमेश्वराचे आहे; तेच परमोच्च स्वर्गामध्ये शांती स्थापित करतात.


हे याहवेह! तुमचे कार्य किती विविध आहे: अद्भुत ज्ञानाने तुम्ही सर्व घडविले आहे; तुमच्या रचनेने संपूर्ण पृथ्वी संपन्न झाली आहे.


त्यांनी इजिप्ती समोर याहवेहचे चमत्कार केले, हामच्या भूमीवर त्यांची अद्भुत कार्ये प्रकट केली.


कारण तुमचे राज्य अनंतकाळचे राज्य आहे, तुमची सत्ता पिढ्यान् पिढ्या चालते. याहवेह आपल्या सर्व प्रतिज्ञांशी एकनिष्ठ आहेत, त्यांच्या सर्व कार्यात ते विश्वासू असतात.


आपल्या सामर्थ्याने ते सदासर्वकाळ राज्य करतात, प्रत्येक राष्ट्रांना ते न्याहाळून पाहतात— की बंडखोरांनी त्यांच्याविरुद्ध विद्रोह करू नये. सेला


इस्राएलाचे परमेश्वर, याहवेह धन्यवादित असोत, केवळ तेच महान कार्य करतात.


तुमच्या पावलांचे ठसे दिसत नसले, तरी तुमची वाट समुद्रातून गेली होती; तुमचा मार्ग प्रचंड जलाशयातून गेला होता.


कारण तुम्ही महान आहात आणि अद्भुत चमत्कार करता; तुम्हीच एकटे परमेश्वर आहात.


हे याहवेह, तुमची कृत्ये किती महान आहेत! तुमचे विचार किती गहन आहेत!


याहवेह तुम्ही माझे परमेश्वर आहात; मी तुम्हाला उंचावेन आणि तुमच्या नावाची स्तुती करेन, कारण परिपूर्ण विश्वासूपणाने तुम्ही अद्भुत गोष्टी केल्या आहेत, ज्या फार पूर्वीपासून योजलेल्या होत्या.


ही सर्व माहिती सर्वसमर्थ याहवेहकडून प्राप्त होते. त्यांच्या योजना चमत्कारिक असतात, त्यांचे ज्ञान अद्भुत आहे.


त्यांच्या सत्तेच्या महानतेचा आणि शांतीचा अंत होणार नाही. ते दावीदाच्या सिंहासनावरून राज्य करतील आणि त्याच्या राज्यावर राज्य करतील, ते त्या काळापासून आणि सर्वकाळपर्यंत न्याय आणि धार्मिकता स्थापन करतील आणि टिकवतील. सर्वसमर्थ याहवेहचा आवेश हे पूर्ण करेल.


परंतु याहवेह हेच खरे परमेश्वर आहेत; ते जिवंत परमेश्वर आहेत, ते सनातन राजा आहेत. जेव्हा ते क्रोधित होतात, सर्व पृथ्वी कंपायमान होते; त्याच्या प्रकोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही.


म्हणून राजाने आदेश दिला की जादूगार, मांत्रिक, तांत्रिक आणि ज्योतिषी यांना बोलवावे आणि त्याला जे स्वप्न पडले ते सांगावे, जेव्हा ते आत आले आणि राजासमोर उभे राहिले,


“त्या राजांच्या काळात, स्वर्गातील परमेश्वर एक राज्य स्थापन करतील, ज्याचा नाश होणार नाही किंवा इतर कोणीही त्याच्यावर राज्य करू शकणार नाही. हे त्या सर्व राज्यांना चिरडून टाकेल आणि त्यांचा नाश करेल, परंतु ते स्वतःच कायम टिकून राहील.


“ ‘हा निर्णय दूतांद्वारे घोषित केला जातो, पवित्र लोक हा निर्णय जाहीर करतात, जेणेकरून जिवंतांना हे कळावे की जे परात्पर आहेत, ते पृथ्वीवरील सर्व राज्यांवर सर्वोच्च राज्यकर्ता आहेत आणि ज्याला ते इच्छितात, त्यांना ते देतात आणि त्यांच्यावर अगदी कनिष्ठाला नियुक्त करतात.’


त्याला अधिकार, गौरव व सार्वभौम सामर्थ्य देण्यात आले; सर्व राष्ट्रांनी आणि प्रत्येक सर्व भाषा बोलणार्‍यांनी त्याची उपासना केली. त्याचे सामर्थ्य शाश्वतचे आहे, जे कधीही ढळणार नाही आणि त्याचा कधी अंत होत नाही आणि म्हणून त्याचे राज्य हे असे राज्य आहे, ज्याचा कधीही नाश होणार नाही.


मग परमोच्च परमेश्वराच्या पवित्र लोकांना आकाशाखाली असलेल्या राज्यांचे सार्वभौमत्व, सामर्थ्य आणि महानता देण्यात येईल. त्यांचे राज्य सनातन राज्य आहे आणि सर्व शासक त्यांची सेवा करतील व त्यांच्या आज्ञा पाळतील.’


अहाहा, परमेश्वराचे गहन ज्ञान आणि बुद्धीची संपत्ती किती अगम्य आहे! त्यांचे न्याय गहन आहेत, त्यांचे मार्ग किती दुर्गम आहेत!


कोणत्या दैवताने एका राष्ट्रातून दुसर्‍या राष्ट्राला गुलामगिरीतून बाहेर काढण्याकरिता भयानक पीडा पाठविल्या, चिन्हे, चमत्कार केले, युद्ध व अद्भुत कृत्ये केली, जसे इजिप्त देशातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी याहवेह तुमच्या परमेश्वराने पराक्रमी बाहू आणि उगारलेल्या हाताने चमत्कार केले, असे एक तरी उदाहरण इतरत्र तुम्हाला सापडेल का?


जे सर्वकाळचे राजा, अविनाशी व अदृश्य असे एकच परमेश्वर यांना सदासर्वकाळ सन्मान आणि गौरव असो. आमेन.


पण आपल्या पुत्राविषयी ते म्हणतात, “हे परमेश्वरा, तुमचे सिंहासन सदासर्वकाळ टिकेल; न्याय्यतेचा राजदंड त्यांच्या राज्याचे राजदंड राहील.


परमेश्वराने चिन्हे, अद्भुते व नाना प्रकारचे चमत्कार करून साक्ष दिली आणि पवित्र आत्म्याद्वारे त्यांच्या इच्छेनुसार विशिष्ट दाने वाटून दिली आहेत.


जर कोणी संदेश देतो तर त्याने असा संदेश द्यावा की, तो परमेश्वराचेच शब्द बोलत आहे. जर कोणी सेवा करतात, तर परमेश्वर जशी शक्ती पुरवितात त्याप्रमाणे करावी, म्हणजे सर्व गोष्टीमध्ये येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराचे गौरव होईल. त्यांना गौरव आणि सामर्थ्य सदासर्वकाळ असो. आमेन!


कारण त्याचवेळी सातव्या देवदूताने आपला रणशिंग वाजविला, त्याबरोबर स्वर्गातून अनेक प्रचंड ध्वनी झाले, त्या वाण्या म्हणत होत्या: “जगाचे राज्य आमच्या प्रभूचे आणि त्यांच्या ख्रिस्ताचे झाले आहे, ते युगानुयुग राज्य करतील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan