Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 4:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 परमोच्च परमेश्वराने मला जी चिन्हे व चमत्कार दाखविले ते तुम्ही सर्वांना सांगण्यात मला आनंद होत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 परात्पर देवाने जी चिन्हे व जे अद्भुत चमत्कार माझ्यासंबंधाने दाखवले आहेत ते विदित करावेत हे मला बरे वाटले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 सर्वोच्च देवाने जी चिन्हे आणि जे चमत्कार माझ्यासाठी केलेले तुम्हास सांगावे हे मला बरे वाटले आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 4:2
19 Iomraidhean Croise  

तेव्हा सुद्धा तुम्ही मला स्वप्नांनी घाबरवितात आणि दृष्टान्तांनी मला भेडसावतात,


परमेश्वरा, माझ्या तारणकर्ता परमेश्वरा, मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त करा, म्हणजे माझी जीभ तुमच्या नीतिमत्तेची स्तुती करेल.


तुम्ही या भूमीची काळजी घेता व ती सिंचनासाठी देता. आपण ते विपुल व समृद्ध करता. लोकांना धान्य मिळावे म्हणून परमेश्वराच्या नद्या पाण्याने भरल्या आहेत, कारण तुम्ही ते निर्धारित केले आहे.


अहो तुम्ही, जे परमेश्वराचे भय बाळगता, ते या आणि ऐका; त्यांनी माझ्यासाठी काय काय केले ते सर्व मी तुम्हाला सांगेन.


आता माझे केस पांढरे झालेले असताना आणि मी वयस्कर झालो असताना, परमेश्वरा, माझा त्याग करू नका; तुमच्या सर्व सामर्थ्याचे वर्णन नवीन पिढीला आणि त्यांच्या मुलांना देखील सांगण्यासाठी तुम्ही मला अवधी द्या.


आपल्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरला स्वप्न पडले; त्याचे मन व्याकूळ झाले आणि त्याला झोप येत नव्हती.


नबुखद्नेस्सर त्या धगधगत्या भट्टीच्या दाराजवळ गेला आणि मोठ्याने हाक मारून म्हणाला, “परमोच्च परमेश्वराचे सेवक शद्रख, मेशख आणि अबेदनगो, बाहेर या! इकडे या!” तेव्हा शद्रख, मेशख आणि अबेदनगो अग्नीतून बाहेर आले,


“ ‘हा निर्णय दूतांद्वारे घोषित केला जातो, पवित्र लोक हा निर्णय जाहीर करतात, जेणेकरून जिवंतांना हे कळावे की जे परात्पर आहेत, ते पृथ्वीवरील सर्व राज्यांवर सर्वोच्च राज्यकर्ता आहेत आणि ज्याला ते इच्छितात, त्यांना ते देतात आणि त्यांच्यावर अगदी कनिष्ठाला नियुक्त करतात.’


“महाराज हे आहे याचा अर्थ, आणि महाराज, हा अर्थ आहे आणि परात्पर परमेश्वराने माझ्या स्वामी राजाच्या विरुद्ध काढलेला हा आदेश आहे:


तुम्हाला लोकांमधून हाकलून देण्यात येईल आणि तुम्ही वन्यप्राण्यांबरोबर राहाल; तुम्ही बैलाप्रमाणे गवत खाल आणि आकाशाच्या दवाने भिजून जाल. सात कालखंड संपेपर्यंत तुम्ही या स्थितीत राहाल आणि मग तुमचा असा विश्वास असेल की सार्वभौम परमेश्वर हे पृथ्वीवरील सर्व राज्यांवर सर्वोच्च परमेश्वर आहेत आणि ते ज्याला इच्छितात त्याला ही राज्ये देतात.


निर्धारित कालखंडाच्या शेवटी, मी, नबुखद्नेस्सरने माझी नजर वर स्वर्गाकडे वळवली आणि माझी बुद्धी मला पुन्हा लाभली. मग मी परात्पर परमेश्वराची महिमा केली; त्यांना आदर आणि गौरव दिला, जे सदासर्वकाळ जिवंत आहेत, त्यांची सत्ता शाश्वत आहे. त्यांचे साम्राज्य पिढ्यान् पिढ्या राहणारे आहे.


“महाराज, परात्पर परमेश्वराने तुमचे पिता नबुखद्नेस्सर राजाला राज्य आणि महानता वैभव आणि गौरव दिले होते.


ते सुटका करतात व ते वाचवितात; ते आकाशात आणि पृथ्वीवर चिन्ह आणि चमत्कार करतात. त्यांनीच दानीएलला सिंहांच्या तावडीतून सोडविले आहे.”


तो परमोच्च परमेश्वराच्या विरुद्ध बोलेल आणि त्यांच्या पवित्र लोकांवर अत्याचार करेल आणि निर्धारित वेळ आणि कायदे बदलण्याचा प्रयत्न करेल. पवित्र लोक एक वेळ, दोन वेळा आणि अर्धा वेळ त्याच्या हातात देण्यात येतील.


तेव्हा येशू म्हणाले, “मी अद्भुते व चिन्हे केल्याशिवाय तुम्ही लोक मजवर विश्वास ठेवणार नाही.”


तेव्हा यहोशुआ आखानास म्हणाला, “माझ्या मुला, याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचे गौरव कर आणि आपले पाप कबूल कर. तू काय केलेस ते मला सांग; माझ्यापासून काहीही लपवू नकोस.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan