तेव्हा त्या तिसांचा पुढारी अमासयवर पवित्र आत्मा आला आणि अमासय म्हणाला: “दावीद महाराज, आम्ही तुमचे आहोत! अहो इशायपुत्र, आम्ही तुमच्या बाजूचे आहोत! तुम्हाला शांती, कल्याण लाभो, आणि जे तुम्हाला मदत करतील, त्या सर्वांना यश लाभो. कारण तुमचे परमेश्वर तुम्हाला मदत करतील.” मग दावीदाने त्यांचा स्वीकार केला आणि त्यांना आपल्या गनिमी युद्धाच्या सेनेवर अधिकारी नेमले.