Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 1:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 अश्पनज अधिकार्‍याने त्यांना नवीन नावे दिली: त्याने दानीएलला बेलटशास्सर; हनन्याहला शद्रख; मिशाएलला मेशख; आणि अजर्‍याहला अबेदनगो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 खोजांच्या सरदाराने त्यांना येणेप्रमाणे नावे दिली : दानिएलास बेल्टशस्सर, हनन्यास शद्रख, मीशाएलास मेशख व अजर्‍यास अबेद्नगो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 प्रमुख अधिकाऱ्याने त्यांना, दानीएलास बेल्टशस्सर, हनन्यास शद्रख, मीशाएलास मेशख, अजऱ्यास अबेदनगो, नावे दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 1:7
13 Iomraidhean Croise  

फारोहने त्याला सापनाथ-पानेह हे नाव दिले, आणि त्याला ओन येथील पोटीफेरा याजकाची कन्या आसनथ ही पत्नी करून दिली. योसेफ संपूर्ण इजिप्त देशभर फिरला.


फारोह नखोने योशीयाहचा पुत्र एल्याकीमला त्याच्या पित्याच्या जागी राजा केले आणि एल्याकीमचे नाव बदलून यहोयाकीम ठेवले. परंतु त्याने यहोआहाजाला इजिप्तमध्ये नेले आणि तिथे तो मरण पावला.


बाबेलच्या राजाने यहोयाखीनचा काका मत्तन्याहला त्याच्या ठिकाणी राजा केले आणि त्याने त्याचे नाव बदलून ते सिद्कीयाह असे ठेवले.


राजा त्यांच्यासोबत बोलला आणि त्या सर्वांमध्ये दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्‍याह यांच्यासारखे कोणीही सापडले नाही; म्हणून त्यांना राजाच्या सेवेसाठी निवडण्यात आले.


मग राजाने आपल्या दरबारातील प्रमुख अधिकारी अश्पनजास राजघराण्यातील काही इस्राएली आणि कुलीन लोकांना राजाच्या सेवेत आणण्याचा आदेश दिला—


पर्शियाचा राजा कोरेश च्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी दानीएलला (ज्याला बेलटशास्सर असे म्हटले जाते) एक प्रकटीकरण झाले. तो संदेश खरा असून त्याचा संबंध मोठ्या युद्धाशी होता. संदेशाचा समज दृष्टान्ताद्वारे त्याच्याकडे आला.


राजाने दानीएलला (ज्याला बेलटशास्सर असेही म्हटले जाते) विचारले, “मी जे स्वप्न पाहिले ते आणि त्याचा अर्थ तू सांगण्यास सक्षम आहेस काय?”


मग दानीएलच्या विनंतीवरून राजाने शद्रख, मेशख व अबेदनगो यांना बाबेल प्रांताचा प्रशासक सहायक म्हणून नेमले, परंतु की दानीएल राजाच्या दरबारातच राहिला.


मी एक स्वप्न पाहिले, जेव्हा मी माझ्या बिछान्यावर निजलेला होतो, ते चित्र आणि दृष्टान्त जे माझ्या मनात आले, त्यामुळे मी अतिशय भयभीत झालो.


अखेरीस दानीएल माझ्या उपस्थितीत आला आणि मी त्याला माझे स्वप्न सांगितले. (माझ्या देवाच्या नावावरून मी त्याचे बेलटशास्सर असे नाव ठेवले होते. याच माणसामध्ये पवित्र देवाचा आत्मा आहे.)


त्याने हे केले कारण दानीएल हा ज्याला राजा बेलटशास्सर म्हणत होता, त्याच्याकडे उत्तम मन आणि ज्ञान आणि समज होती आणि त्याच्याकडे स्वप्नांचा अर्थ सांगण्याचे, कोडे सोडविण्याचे आणि कठीण समस्या सोडविण्याची क्षमता होती. म्हणून दानीएलला बोलवा म्हणजे तो तुम्हाला त्या लिखाणाचा अर्थ सांगेल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan