Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 1:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 यहूदीयाचा राजा यहोयाकीमच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने यरुशलेमला वेढा दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने यरुशलेमेवर चढाई करून त्याला वेढा घातला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 यहूदाचा राजा यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याने यरूशलेमेवर चढाई करून त्यांची रसद बंद करण्यासाठी यरूशलेमेला वेढा दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 1:1
14 Iomraidhean Croise  

वयाच्या पंचविसाव्या वर्षी यहोयाकीम राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये अकरा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव जबूदाह होते; ती रुमाह येथील पदायाहची कन्या होती.


याहवेहने घोषणा केल्याप्रमाणे, नबुखद्नेस्सरने याहवेहच्या मंदिरातील व राजवाड्यातील सर्व संपत्ती लुटून नेली आणि इस्राएलाच्या शलोमोन राजाने याहवेहच्या मंदिरासाठी ठेवलेले सोन्याचे कटोरे तोडून त्यांचे तुकडे केले.


आणि तुमच्या वंशजांपैकी काही, तुमच्या मांसाचे आणि तुमच्या रक्ताचे जे तुमच्यापासून जन्माला येतील, ते नेले जातील आणि ते बाबेलच्या राजाच्या राजवाड्यात खोजे करण्यात येतील.”


यहूदीयाचा राजा, योशीयाहचा पुत्र, यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी व बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी यहूदीयाच्या सर्व लोकांबद्दल यिर्मयाहला संदेश मिळाला.


योशीयाहचा पुत्र, यहोयाकीम, हा यहूदीयाचा राजा असताना, यिर्मयाहला याहवेहकडून आलेले वचन हेच आहे:


परंतु जेव्हा बाबेलचा राजा, नबुखद्नेस्सरने या देशावर हल्ला केला, आम्ही म्हटले, ‘चला, बाबिलोनचे व अराम्यांपासून आपला बचाव करण्यासाठी आपण यरुशलेमला पलायन करू या.’ म्हणून आम्ही यरुशलेम येथेच राहत आलो आहोत.”


योशीयाहचा पुत्र, यहूदीयाचा राजा यहोयाकीम, याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी यिर्मयाहला याहवेहचे हे वचन आले:


यहूदीयाचा राजा योशीयाहचा पुत्र, यहोयाकीम राजा, याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, यिर्मयाह संदेष्ट्याने सांगितलेली याहवेहची सर्व वचने लिहून घेण्याचे काम नेरीयाहचा पुत्र बारूखाने संपविल्यानंतर, यिर्मयाहने हा संदेश त्याला दिला:


बाबिलोन व बाबिलोनच्या लोकांचा देश यांच्याविरुद्ध याहवेहने संदेष्टा यिर्मयाहला सांगितलेले हे वचन आहे:


बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, याच्या कारकिर्दीच्या एकोणविसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदान यरुशलेमास आला.


बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने बंदिवासात नेलेल्या लोकांची संख्या अशी: सातव्या वर्षी, 3,023 यहूदी;


तेव्हा दानीएलला राजासमोर आणण्यात आले आणि राजाने त्याला म्हटले, “दानीएल तो तूच आहेस काय, ज्याला माझे पिता राजा यांनी यहूदीयातून कैदी म्हणून आणला होता?


Lean sinn:

Sanasan


Sanasan