Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 4:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 ते अत्यंत अस्वस्थ झाले, कारण प्रेषित शिक्षण देत होते व येशूंच्याद्वारे मृतांचे पुनरुत्थान होईल असे लोकांना जाहीरपणे सांगत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 कारण ते लोकांना शिक्षण देऊन, येशूच्या द्वारे मेलेल्यांतून पुन्हा उठणे आहे असे उघडपणे सांगत होते, ह्याचा त्यांना संताप आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 कारण ते लोकांस शिक्षण देऊन येशूच्या द्वारे पुनरुत्थान असे उघडपणे सांगत होते म्हणून त्यांना फार संताप आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 हे लोक संतप्त झाले होते कारण पेत्र व योहान लोकांना शिकवण देऊन, येशूद्वारे मेलेल्यांतून पुन्हा उठणे आहे, असे उघडपणे सांगत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 4:2
18 Iomraidhean Croise  

पण होरोनी सनबल्लट व अम्मोनी अधिकारी तोबीयाह यांना हे जेव्हा समजले तेव्हा ते फारच अस्वस्थ झाले, की कोणीतरी इस्राएलला मदत करण्यासाठी आले आहे.


परंतु यहूद्यांनी समुदाय पाहिला, तेव्हा त्यांना हेवा वाटला आणि पौल जे बोलत होता त्याला विरोध करून त्यांनी त्याची निंदानालस्ती केली.


तेव्हा एपिकूरपंथी व स्तोयिकपंथी यांच्यातील काही तत्वज्ञानी लोक त्याच्याशी वाद घालू लागले. त्यांच्यापैकी काहीजण म्हणाले, “हा बडबड्या काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे?” इतर म्हणाले, “हा परक्या परमेश्वराचा प्रचारक दिसतो.” ते असे बोलत, कारण पौल येशू व पुनरुत्थान या विषयीच्या शुभवार्तेचा प्रचार करीत होता.


त्याच सुमारास, या मार्गाविषयी फार मोठी खळबळ उडाली.


ही केवळ एक गोष्ट सोडून मी त्यांच्यासमोर उच्च आवाजाने ओरडलो: ‘मृतांचे पुनरुत्थान यामुळे मी आज आपणापुढे चौकशीसाठी उभा आहे.’ ”


त्यांनी सांगितले होते की ख्रिस्त दुःख सहन करतील आणि यहूदी व गैरयहूदी अशा दोघांनाही प्रकाशाचा संदेश मिळावा म्हणून तेच प्रथम मरणातून पुन्हा उठतील.”


परंतु मृतांचे पुनरुत्थान हे तुम्हापैकी कोणालाही अविश्वसनीय का वाटावे?


तुम्ही प्रत्यक्ष जीवनाच्या निर्माणकर्त्यालाच जिवे मारले, परंतु परमेश्वराने त्यांना मरणातून पुन्हा उठविले, याचे आम्ही साक्षी आहोत.


नंतर महायाजक आणि त्यांचे सहकारी जे सर्व सदूकी पंथाचे सभासद होते, ते मत्सराने भरून गेले.


आणि ज्यांनी येशूंना मेलेल्यातून उठविले, त्यांचा आत्मा जर तुम्हामध्ये वास करीत असेल, तर ज्यांनी ख्रिस्ताला मरणातून उठविले ते तुमच्यामध्ये राहत असणार्‍या त्याच पवित्र आत्म्याद्वारे तुमची मर्त्य शरीरे जिवंत करतील.


प्रत्येकजण आपआपल्या क्रमाप्रमाणे उठेल: प्रथमफळ ख्रिस्त; नंतर जेव्हा ते येतील तेव्हा जे त्यांचे आहेत ते उठतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan