Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 2:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 एकाएकी स्वर्गातून प्रचंड सोसाट्याच्या वार्‍यासारखा आवाज आला आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व घर त्याने भरले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तेव्हा अकस्मात मोठ्या वार्‍याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला, व ज्या घरात ते वसले होते ते सर्व त्याने भरले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 अकस्मात आकाशातून सोसाट्याच्या वाऱ्यासारखा आवाज झाला व ज्या घरात ते बसले होते ते घर त्या आवाजाने भरले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 2:2
14 Iomraidhean Croise  

याहवेहने त्याला म्हटले, “बाहेर जा आणि याहवेहच्या उपस्थितीत डोंगरावर उभा राहा, कारण याहवेह तिथून जाणार आहेत.” तेव्हा मोठ्या व शक्तिशाली वार्‍याने डोंगर याहवेहसमोर दुभागले आणि खडक फोडले, परंतु याहवेह त्या वार्‍यात नव्हते. त्या वार्‍यानंतर भूमिकंप झाला, परंतु याहवेह त्या भूमिकंपात देखील नव्हते.


करुबावर आरूढ होऊन ते उडून आले; वार्‍याच्या पंखांवर त्यांनी भरारी मारली.


उत्तरेच्या वार्‍या, जागा हो, आणि दक्षिणेच्या वार्‍या, ये; माझ्या बागेतील सुगंध चोहीकडे पसरावा, म्हणून माझ्या बागेवरून वाहत जा. माझ्या प्रियकराला त्याच्या बागेत येऊ द्या, आणि बागेतील सर्वोत्कृष्ट फळे खाऊ द्या.


मला हाक मारण्यापूर्वीच मी त्यांना उत्तर देईन; ते मला बोलून सांगताहेत तोच मी ऐकेन.


“मी माझा संदेष्टा पाठवेन, जो माझ्यापुढे मार्ग तयार करेल. मग ज्यांची तुम्ही वाट पाहत आहात, ते प्रभू अकस्मात त्यांच्या मंदिरात येतील; ते कराराचे संदेशवाहक, ज्यांची तुम्ही फार आतुरतेने इच्छा करीत आहात ते येतील,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.


अचानक त्या दूताबरोबर स्वर्गदूतांचा एक मोठा समूह त्यांना दिसला, ते परमेश्वराची स्तुती करीत म्हणाले,


वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, परंतु तो कुठून आला व कुठे जाईल हे तुम्ही सांगू शकत नाही. तसेच जो प्रत्येकजण आत्म्यापासून जन्मतो त्यांच्या बाबतीत असेच आहे.”


त्यावेळी अग्नीच्या जिभांसारख्या दिसणार्‍या जिभा वेगवेगळ्या होऊन प्रत्येकावर एकएक अशा स्थिरावताना त्यांना दिसल्या.


जेव्हा त्यांनी तो मोठा आवाज ऐकला, तेव्हा त्या ठिकाणी लोकांची मोठी गर्दी जमली आणि ते गोंधळून गेले, कारण प्रत्येकाने स्वतःची मातृभाषा बोलली जात असलेली ऐकले.


या प्रार्थनेनंतर ज्या ठिकाणी ते जमले होते, ती हादरली आणि ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन धैर्याने परमेश्वराचे वचन सांगू लागले.


ते त्यांना यासाठी प्रकट केले होते की, ते स्वतःची सेवा नव्हे तर तुमची करीत होते. ते ज्या गोष्टींविषयी बोलले होते, त्या गोष्टी तुम्हाला स्वर्गातून पाठविलेल्या पवित्र आत्म्याद्वारे, ज्यांनी शुभवार्तेची घोषणा केली त्यांच्याद्वारे तुम्हाला आता सांगितल्या आहेत. स्वर्गदूतांना सुद्धा या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan