Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 तीमथ्य 3:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 परंतु दुष्ट आणि भोंदू लोक हे दुसर्‍यांना फसवून आणि स्वतः फसून अधिक वाईटाकडे जातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 आणि दुष्ट व भोंदू माणसे ही दुसर्‍यांना फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 पण दुष्ट लोक व भोंदू लोक इतरांना वरचेवर फसवत राहतील आणि स्वतःही फसून अधिक वाईटाकडे जातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 परंतु भोंदू माणसे दुसऱ्यांना व स्वतःला फसवून दुष्टपणात अधिक सरसावतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 तीमथ्य 3:13
15 Iomraidhean Croise  

पराक्रम आणि शहाणपण ही त्यांची आहेत; फसणारे आणि फसविणारे दोन्हीही त्यांचेच आहेत.


असा मनुष्य राख भक्षण करतो; संभ्रमात पडलेले अंतःकरण त्याला चुकीचे मार्गदर्शन करते; तो स्वतःला वाचवू शकत नाही किंवा म्हणू शकत नाही “ही माझ्या उजव्या हातातील वस्तू निव्वळ खोटेपणा नाही का?”


तो पुन्हा म्हणाला, “यापेक्षाही अधिक अमंगळ कृत्ये करताना तू त्यांना पाहशील.”


गौरव आणि अपमान, वाईट अहवाल आणि चांगला अहवाल; प्रामाणिक परंतु लबाड समजण्यात आलेले;


पवित्र आत्मा स्पष्ट सांगतो की शेवटच्या काळात कित्येक लोक विश्वासापासून दूर जातील आणि धूर्त व दुरात्माच्या शिक्षणावर मन लावतील.


यान्नेस आणि यांब्रेस यांनी जसा मोशेला विरोध केला, तसेच हे शिक्षक सत्याचा विरोध करतात. ते भ्रष्ट बुद्धीचे आणि विश्वासाविषयी नाकारलेले असे लोक आहेत.


पूर्वी आपण देखील मूर्ख व अवज्ञा करणारे; सर्वप्रकारे बहकलेले आणि विलासवृत्ती आणि दुष्ट वासनांचे गुलाम होतो. क्रोध व हेवा यांनी आपली जीविते भरून गेली हाती आणि एकमेकांचा द्वेष करणारे होतो.


प्रभू व तारणारा येशू ख्रिस्तांच्या ज्ञानाद्वारे जगाच्या भ्रष्टतेतून बाहेर पडल्यावर जर पुन्हा तिच्यात गुंतून तिच्या कह्यात गेले तर त्यांची शेवटची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते.


सर्वात प्रथम तुम्ही हे समजून घ्या की, शेवटच्या दिवसात थट्टा करणारे येतील, थट्टा करतील आणि स्वतःच्या वाईट वासनांच्या मागे लागतील.


तो प्रचंड अजगर, म्हणजे दियाबल किंवा सैतान म्हटलेला, सर्व जगाला फसविणारा प्राचीन सर्प, याला त्याच्या सर्व दूतांसह पृथ्वीवर लोटून देण्यात आले.


कारण पहिल्या पशूच्या प्रतिनिधी प्रमाणे या पशूने अद्भुत चिन्हे करून पृथ्वीवरील रहिवाशांना फसविले. तलवारीने प्राणांतिक जखम होऊनही पुन्हा जिवंत झालेल्या त्या पहिल्या पशूची मोठी मूर्ती उभारावी, असा त्याने जगातील लोकांना हुकूम केला.


दिव्यांचा प्रकाश यापुढे तुझ्यावर उजळणार नाही आणि वधूवरांची वाणी पुन्हा ऐकू येणार नाही. तुझे व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक होते. सर्व राष्ट्रे तुझ्या चेटकाने ठकविली गेली होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan