Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 तीमथ्य 1:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 त्या दिवशी प्रभूपासून त्याला दया मिळेल असे प्रभू करो! इफिसमध्ये त्याने मला किती प्रकारे मदत केली, हे तुला चांगले माहीत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 (प्रभू करो आणि त्या दिवशी त्याला प्रभूपासून दया मिळो!) आणि इफिसात कितीतरी प्रकारे त्याने सेवा केली हे तुला चांगले माहीत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 प्रभू करो आणि त्यास त्यादिवशी प्रभूकडून दया मिळो कारण माझ्या इफिसात कितीतरी प्रकारे माझी सेवा केली हे तुला चांगले माहीत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 न्यायाच्या दिवशी त्याला प्रभूकडून दया मिळो! इफिस येथे किती तरी प्रकारे त्याने माझी सेवा केली, हे तुला चांगले माहीत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 तीमथ्य 1:18
26 Iomraidhean Croise  

मग त्याने याहवेहचा धावा करीत म्हटले, “याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी या विधवेच्या घरात राहत आहे, तिच्या मुलाला मारून आपण तिच्यावर अरिष्ट आणले काय?”


आमच्या पूर्वजांवर दया करावी आणि त्यांच्या पवित्र कराराची आठवण करावी.


कारण परमेश्वराच्या करुणेमुळे, आपल्यावर स्वर्गातून दिव्य प्रभातेचा उदय होण्याची वेळ आली आहे.


हेरोदाचा घरगुती कारभारी खुजा, त्याची पत्नी योहान्ना, सुसान्ना व इतर अनेक स्त्रिया, स्वतःच्या मिळकतीतून त्यांना मदत करीत असत.


इफिसमध्ये पोहोचल्यावर, पौलाने प्रिस्किल्ला व अक्विलाला तिथेच सोडले. तो स्वतः तेथील सभागृहामध्ये गेला आणि त्याने तेथील यहूदी लोकांबरोबर युक्तिवाद गेला.


परंतु निघताना मात्र त्याने त्यांना वचन दिले, “परमेश्वराची इच्छा असेल, तर मी पुन्हा येईन.” मग इफिस सोडून जलमार्गाने तो निघाला.


अपुल्लोस करिंथ येथे असताना, पौल अंतर्भागातून प्रवास करीत इफिस येथे आला. तिथे त्याला काही शिष्य आढळले.


प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही निर्दोष असे असावे म्हणून तेच तुम्हाला शेवटपर्यंत स्थिर करतील.


पण पन्नासाव्या दिवसाच्या सणापर्यंत मी येथेच म्हणजे इफिसमध्ये राहणार आहे.


तर त्या प्रत्येकाचे काम जसे आहे तसे दिसेल, कारण तो दिवस ते प्रकाशात आणेल. अग्नीद्वारे ते प्रकट होईल, प्रत्येकाचे काम कसे आहे हे अग्नीने पारखले जाईल.


प्रभूंच्या लोकांना मदत करण्याच्या या सेवेबाबत मी तुम्हाला लिहावे याची गरज नाही.


परंतु परमेश्वर हे दयेचे सागर आहेत व आपल्यावरील त्यांच्या अपरंपार प्रीतीमुळे,


आमची आशा, आमचा आनंद, आपल्या प्रभू येशूंच्या पुनरागमनासमयी त्यांच्या सान्निध्यात जो आमचा आशेचा मुकुट तो काय? ते तुम्हीच आहात ना?


मासेदोनियास जाताना मी तुला सांगितल्याप्रमाणे, विनंती करतो इफिस येथेच राहा आणि चुकीचे शिक्षण देणार्‍यांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न कर आणि ज्यांच्याकडून विश्वासातील परमेश्वरासंबंधी रचना न होता, वाद मात्र तयार होतात, अशा गोष्टींवर आणि अखंडित वंशावळ्यांवर चित्त त्यांनी ठेवू नये.


याच कारणामुळे मी येथे तुरुंगात दुःख सोशीत आहे. पण मला त्याची मुळीच लाज वाटत नाही, कारण ज्यांच्यावर माझा विश्वास आहे, त्यांना मी चांगला ओळखतो आणि माझी खात्री आहे की मी त्यांच्याकडे सोपविलेली माझी ठेव त्यांच्या त्या दिवसापर्यंत राखून ठेवण्यास ते समर्थ आहे.


अनेसिफर आणि त्याचे सर्व कुटुंबीय यांच्यावर प्रभू दया करो, कारण त्याने अनेक वेळा मला उत्तेजन दिले आणि त्याला माझ्या तुरुंगवासाची कधीच लाज वाटली नाही.


जेव्हा तो रोममध्ये आला, तेव्हा त्याने सर्वत्र माझा कसून शोध केला आणि शेवटी मला शोधून काढले.


मीच तुखिकास इफिसास पाठविले


पुढे आता माझ्यासाठी जो नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे, प्रभू, आपले नीतिमान न्यायाधीश, त्या दिवशी मला देतील, आणि केवळ मलाच नाही, तर जे त्यांच्या परत येण्याची आवडीने वाट पाहत आहेत, त्या सर्वांना मिळेल.


कारण परमेश्वर अन्यायी नाहीत. तुमची कृत्ये आणि त्यांच्या नावावर जी प्रीती तुम्ही त्यांच्या लोकांची मदत करून आणि अजूनही मदत करून दाखविता ती ते विसरणार नाहीत.


तुमच्याकडे जी येणार होती, त्या कृपेबद्दल ज्या संदेष्ट्यांनी तुम्हाला सांगितले, त्यांनी या तारणासंबंधी लक्षपूर्वक शोध घेतला आणि मोठ्या काळजीने,


“इफिस येथील मंडळीच्या देवदूताला लिही: जे आपल्या उजव्या हातात सात तारे धरतात व जे सोन्याच्या सात समयांमध्ये चालतात, ते असे म्हणतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan