Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 थेस्सल 1:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 जे परमेश्वराला ओळखत नाहीत आणि आपल्या प्रभू येशूंची शुभवार्तेचे पालन करीत नाहीत, त्यांना ते शिक्षा देतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता मानत नाहीत त्यांचा तो सूड उगवील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा तो सूड उगवील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशूचे शुभवर्तमान मानत नाहीत, त्यांचा तो सूड उगवील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 थेस्सल 1:8
59 Iomraidhean Croise  

अशा रीतीने त्यांनी मनुष्याला एदेन बागेच्या बाहेर घालवून दिले आणि जीवनवृक्षाकडे कोणीही जाऊ नये यासाठी एदेन बागेच्या पूर्वेस करूबीम आणि प्रत्येक दिशेकडे फिरणारी एक ज्वालामय तलवार ठेवली.


जे कोणी काट्यांना गोळा करतात ते लोखंडी साधन किंवा भाल्याचा दांडा वापरतात; ते जागीच भस्म केले जातात.”


परदेशीय माझ्यासमोर भीतीने वाकतात; माझे नाव ऐकताच ते माझी आज्ञा पाळतात.


अशा राष्ट्रांवर, जी राज्ये तुमची प्रार्थना करण्याचे नाकारतात, जे तुमच्या नावाचा धावा करीत नाहीत; अशा राष्ट्रांवर तुमच्या क्रोधाचा वर्षाव करा.


ज्यांना तुमचे नाव ठाऊक आहे, ते तुमच्यावर भरवसा ठेवतात, कारण हे याहवेह, जे तुमचा धावा करतात त्यांना तुम्ही कधीही टाकत नाही.


याहवेह, सूड घेणारे परमेश्वर आहेत, हे सूड घेणारे याहवेह, प्रज्वलित व्हा.


यावर फारोह म्हणाला, “हा याहवेह कोण आहे, की मी त्याचे ऐकावे व इस्राएली लोकांना जाऊ द्यावे? मी याहवेहला ओळखत नाही. मी इस्राएलला जाऊ देणार नाही.”


जर तुमची तयारी असेल आणि तुम्ही आज्ञाकारक असाल, तर तुम्ही भूमीच्या चांगल्या वस्तू खाल;


परंतु बंडखोर आणि पापी या दोघांना मोडण्यात येईल, आणि ज्यांनी याहवेहचा त्याग केला, त्यांचा नाश होईल.


जेव्हा झाडाच्या फांद्या वाळून शुष्क होतात व मोडतात आणि स्त्रिया येतात व ते सरपण म्हणून जाळतात. तसे हे लोक असमंजस आहेत; म्हणून त्यांना घडविणाऱ्याला त्यांची दया येत नाही आणि त्यांचा निर्माणकर्ता त्यांच्यावर कृपा करीत नाही.


याहवेहच्या कृपेचे वर्ष आणि परमेश्वराचा सूड घेण्याचा दिवस आला आहे, हे जाहीर करण्यास, आणि जे सर्व विलाप करतात त्यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे.


या राष्ट्रांवर आपल्या क्रोधाग्नीचा वर्षाव करा जे तुमचा अधिकार मान्य करीत नाहीत, जे लोक तुमच्या नावाचा धावा करीत नाहीत. त्यांनी याकोबाला गिळले आहे; त्याला संपूर्णपणे गिळंकृत केले आहे आणि त्यांच्या मातृभूमीचा नायनाट केला आहे.


तू फसवणुकीच्या मध्ये आपले निवास बनविले आहे; त्यांच्या या कपटामुळे ते माझे अस्तित्व नाकारतात,” असे याहवेह म्हणतात.


अग्नीची नदी निघून वाहत होती जी त्याच्यामधून बाहेर येत होती. हजारोच्या हजार लोक त्याची सेवा करीत होते; कोट्यावधी लोक त्याच्यासमोर उभे होते. न्यायालयाचे कामकाज सुरू झाले आणि पुस्तके उघडली गेली.


जे याहवेहचे अनुसरण करण्यापासून मागे फिरले आहेत आणि जे याहवेहचा शोध घेत नाहीत वा त्यांची इच्छा जाणून घेत नाहीत.”


“नंतर तो त्याच्या डावीकडे असलेल्या लोकांना म्हणेल, ‘अहो शापग्रस्त लोकांनो, तुम्ही माझ्यापुढून निघून जा. सैतान आणि त्याच्या दूतांसाठी जो सार्वकालिक अग्नी तयार ठेवला आहे त्यात जा.


“मग त्यांना सार्वकालिक मृत्यूची शिक्षा मिळेल, पण जे नीतिमान आहेत ते सार्वकालिक जीवनात प्रवेश करतील.”


निर्णय हाच आहे: प्रकाश या जगात आला आहे, परंतु लोकांनी प्रकाशाऐवजी अंधकाराची अधिक आवड धरली; कारण त्यांची कर्मे दुष्ट होती.


तेव्हा त्यांनी विचारले, “तुझा पिता कुठे आहे?” त्यावर येशूंनी उत्तर दिले, “मी व माझा पिता कोण आहे हे तुम्हाला माहीत नाही, तुम्ही मला ओळखले असते, तर माझ्या पित्यालाही ओळखले असते.”


मग परमेश्वराच्या वचनाचा प्रसार झाला. यरुशलेममध्ये शिष्यांची संख्या मोठ्या वेगाने वाढली आणि अनेक याजकांनी देखील मोठ्या संख्येने विश्वासाचे आज्ञापालन केले.


यानंतरही, परमेश्वराचे ज्ञान राखून ठेवावे हे त्यांना उचित वाटले नाही, म्हणून परमेश्वरानेही त्यांची मने दुष्टतेच्या स्वाधीन केली, यासाठी की जे करू नये ते त्यांनी करावे.


त्यांच्याद्वारे आम्हाला कृपा व प्रेषितपण मिळाले आहे; ते यासाठी की सर्व गैरयहूदीयांनी त्यांच्या नावाकरिता विश्वासाने आज्ञापालन करणारे व्हावे.


परंतु शुभवार्ता सर्वच इस्राएल लोकांनी स्वीकारली नाही. यशायाह म्हणतो, “प्रभू, आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे?”


गैरयहूदीयांनी परमेश्वराचे आज्ञापालन करावे म्हणून ख्रिस्ताने माझ्या शब्द व कृतीने जे काही पूर्ण केले त्या व्यतिरिक्त मी इतर गोष्टीबद्दल बोलण्यास धजणार नाही.


पण आता संदेष्ट्यांनी लिहिलेल्या शास्त्राद्वारे प्रकट आणि जाहीर झालेली सार्वकालिक परमेश्वराची आज्ञा यांना अनुसरून सर्व गैरयहूदी लोकांनी विश्वासाने आज्ञापालन करावे.


ज्याची आज्ञा पाळण्यासाठी तुम्ही स्वतःला वाहवून घेता, त्याची आज्ञा पाळण्याने तुम्ही त्याचे गुलाम बनता; पापाची गुलामी तर मरण किंवा परमेश्वराचे आज्ञापालन तर नीतिमत्व हे तुम्हाला माहीत नाही काय?


तुम्ही शुद्धीवर यावयास हवे आणि पाप करणे सोडून द्या; पण परमेश्वरासंबंधात काहीजण अज्ञानी आहेत मी हे तुम्हाला लाज वाटावी म्हणून बोलतो.


आम्ही वाद व परमेश्वराच्या ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले सर्वकाही पाडून टाकतो आणि प्रत्येक विचाराला बंदिस्त करून ख्रिस्ताच्या आज्ञेखाली स्वाधीन करतो.


अहो मूर्ख गलातीकरांनो! तुम्हाला कोणी मोहात पाडले आहे? तुमच्या डोळ्यांसमोरच येशू ख्रिस्त यांना क्रूसावर खिळण्यात आले असे स्पष्ट चित्रित केले होते.


तुम्हाला परमेश्वराची ओळख होण्यापूर्वी, तुम्ही सुद्धा, जे वास्तविक परमेश्वर नाहीत, त्यांचे दास होता.


सूड घेणे मजकडे आहे; मी परतफेड करेन. ठरल्या वेळेवर त्यांचे पाय घसरतील; त्यांच्या नाशाचा दिवस जवळ आलेला आहे, आणि त्यांचा सर्वनाश वेगाने त्यांच्या दिशेने सरसावत आहे.”


मग तुम्ही जवळ येऊन त्या पर्वताच्या पायथ्याशी जाऊन उभे राहिलात आणि पर्वत अग्नीने पेटला होता, त्याची ज्वाला आकाशापर्यंत पोहोचली होती, सर्वत्र अंधार, ढग आणि घनदाट अंधकार पसरला होता.


तुमच्यावर यातना व अनेक दुःखाचे प्रसंग येतील, तेव्हा तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत याल आणि त्यांचे आज्ञापालन कराल.


(त्यावेळी मी तुमच्या आणि याहवेहमध्ये उभा राहिलो आणि तुम्हाला याहवेहच्या वचनाची घोषणा केली, कारण तुम्हाला अग्नीची भीती वाटत असल्यामुळे तुम्ही पर्वतावर चढून त्यांच्यापर्यंत गेला नाही.) आणि ते म्हणाले:


जे परमेश्वराला ओळखत नाहीत अशा गैरयहूदीयांप्रमाणे कामवासनेच्या लालसेने नव्हे;


पण राहिले ते भयावह न्यायाची प्रतीक्षा आणि परमेश्वराच्या शत्रूंना भस्मसात करून टाकणारी मोठी आगच.


कारण “सूड घेणे मजकडे आहे; मी परतफेड करेन,” आणि आणखी, “प्रभू त्यांच्या लोकांचा न्याय करतील,” असे जे म्हणाले, ते आपल्याला माहीत आहे.


जेव्हा परमेश्वराने त्याला वारसाचे अभिवचन दिलेल्या देशात जाण्यास सांगितले, तेव्हा अब्राहामाने आपण कुठे जात आहोत हे माहीत नसतानाही विश्वासाने आज्ञापालन केले.


कारण आपले “परमेश्वर भस्म करणारे अग्नी आहेत.”


ज्या तारणाची प्रभूने प्रथम घोषणा केली आणि ऐकणार्‍यांनी आम्हाला पुष्टी दिली, त्या महान तारणाची आपण उपेक्षा केली, तर आपण कसे निभावू?


आणि परिपूर्ण केल्यामुळे, त्यांच्या आज्ञा मानणार्‍या सर्वांचे अनंतकाळचे तारणकर्ता झाले,


जे परमेश्वर पित्याच्या पूर्वज्ञानानुसार निवडलेले, आत्म्याच्या पवित्रीकरणाच्या कार्याद्वारे, येशू ख्रिस्ताचे आज्ञापालन करणारे, त्यांच्या रक्ताने सिंचन झालेले: तुम्हाला भरपूर कृपा व शांती असो.


ज्याप्रमाणे सारा अब्राहामाच्या आज्ञेत राहिली आणि त्याला तिचा प्रभू असे म्हणाली. जर तुम्ही भीती न बाळगता जे चांगले ते करीत आहात, तर तुम्ही तिच्या मुली आहात.


कारण ही वेळ न्यायनिवाडा करण्याची आहे आणि त्याची सुरुवात परमेश्वराच्या घराण्यातील लोकांपासून होत आहे; आणि जर त्याची सुरुवात आपल्यापासून झाली तर, जे परमेश्वराच्या शुभवार्तेप्रमाणे चालत नाहीत त्यांचे काय होईल?


आता अस्तित्वात असलेले आकाश व पृथ्वी ही त्याच परमेश्वराच्या शब्दाने अग्नीत नष्ट करण्यासाठी राखलेली आहेत, अनीतिमान लोकांच्या न्यायाच्या दिवसासाठी आणि नाशासाठी ती राखून ठेवलेली आहेत.


त्याच प्रकारे सदोम आणि गमोरा आणि शेजारच्या गावांनी स्वतःच्या देहाला लैंगिक व्यभिचार आणि भ्रष्टतेमध्ये वाहवून घेतले. त्यांना अनंतकाळाच्या अग्नीची शिक्षा सहन करावी म्हणून उदाहरणादाखल पुढे ठेवले आहे.


मग त्यांचा विश्वासघात करणार्‍या सैतानाला ज्या सरोवरात तो पशू आणि खोट्या संदेष्ट्यांना आधी टाकले आहे, त्या अग्नीच्या व जळत्या गंधकाच्या सरोवरात पुन्हा टाकण्यात येईल. तिथे त्यांना रात्रंदिवस, युगानुयुग यातना भोगाव्या लागतील.


परंतु भेकड, विश्वासहीन, अशुद्ध, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक व सर्व लबाड—अशा माणसांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण होय.”


त्यांनी प्रभूला मोठ्याने हाक मारली, “हे सर्वसत्ताधारी पवित्र आणि सत्य प्रभू, पृथ्वीवरील लोकांचा न्याय करण्यास आणि आमच्या रक्ताबद्दल सूड घेण्यास तुम्ही किती काळ लावणार?”


एलीचे पुत्र अतिशय नीच होते; ते याहवेहचा आदर करीत नसत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan