Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 थेस्सल 1:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 यास्तव, तुम्ही सर्व छळांमध्ये आणि परीक्षांमध्ये जो धीर दाखविला आणि त्यामध्ये तुम्ही जी चिकाटी आणि विश्वास दाखविला त्याबद्दल आम्ही परमेश्वराच्या मंडळ्यांमध्ये अभिमानाने सांगतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 ह्यावरून तुमच्या सर्व छळांत व तुम्ही सोसत असलेल्या सर्व संकटांत तुम्ही जी सहनशीलता व जो विश्वास दाखवता त्यांबद्दल देवाच्या मंडळ्यांतून आम्ही स्वत: तुमची वाखाणणी करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 ह्यावरून तुमच्या सर्व छळांत व तुम्ही जी सहनशीलता व जो विश्वास दाखविता त्याबद्दल देवाच्या मंडळ्यांतून आम्ही स्वतः तुमचा अभिमान बाळगतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 ह्यावरून तुम्ही सोसत असलेल्या तुमच्या सर्व छळांत व संकटांत तुम्ही जी चिकाटी व जो विश्वास दाखविता त्याबद्दल देवाच्या ख्रिस्तमंडळ्यांत आम्ही स्वतः तुमची वाखाणणी करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 थेस्सल 1:4
24 Iomraidhean Croise  

आशेमध्ये हर्षित, संकटात सहनशील आणि प्रार्थनेमध्ये विश्वासू असा.


जे धीराने चांगले कार्य करीत राहून गौरव, सन्मान व अविनाशीतेसाठी खटपट करतात, त्यांना ते सार्वकालिक जीवन देतील.


पण जे अद्यापि प्राप्त झाले नाही त्याबद्दल आशा ठेवतो, तर आपण धीराने वाट पाहतो.


प्रत्येकाने विश्वासू व्यक्तीसारखे प्रभूने तुम्हाला ज्या स्थितीत ठेवले आहे व परमेश्वराने जसे पाचारण केले आहे तसे राहावे. सर्व मंडळ्यांसाठी माझा हाच नियम आहे.


ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान व कष्ट, छळ व अडचणी, याविषयी मी अगदी संतुष्ट आहे; कारण जेव्हा मी अशक्त आहे, तेव्हाच मी सबळ असतो.


मला तुमच्याबद्दल केवढा अभिमान आहे, हे मी त्याला सांगितले होते आणि तुम्ही मला मुळीच निराश केले नाही. जे काही आम्ही तुम्हाला सांगितले ते सर्व खरे होते, तसेच मी तीतापुढे काढलेले तुमच्याबद्दलचे अभिमानाचे शब्दही खरे ठरले आहेत!


मी अगदी मोकळेपणाने तुमच्याबरोबर बोलतो; मला तुमचा अतिशय अभिमान आहे. मी खूप उत्तेजित झालो आहे; आमच्या या सर्व दुःखात माझ्या आनंदाला कोणतीच सीमा उरली नाही.


कारण अशी मदत करण्याविषयीची तुमची उत्सुकता मला चांगली माहीत आहे; आणि तुमची अखया येथून गेल्या वर्षापूर्वीच अशी देणगी पाठविण्याची तयारी होती, असे मी मासेदोनियांना मोठ्या अभिमानाने सांगितले आहे. खरे म्हणजे तुमचा हा उत्साह पाहूनच येथील अनेकांना मदत करावी अशी प्रेरणा झाली.


मासेदोनियातील काही लोक माझ्याबरोबर आले आणि मी त्यांना सांगितल्याप्रमाणे तुमची काहीच तयारी नाही असे आढळले, तर आम्हास तुमच्याबद्दल जो भरवसा होता त्याबद्दल काही म्हणता येणार नाही व ते लाजिरवाणे ठरेल.


आपले पिता परमेश्वरापुढे तुमचे विश्वासाचे कार्य व प्रीतीने केलेले श्रम आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरील आशेचा धीर यांची आम्ही निरंतर आठवण करतो.


कारण बंधू आणि भगिनींनो, यहूदीयामध्ये तुम्ही ख्रिस्त येशूंमध्ये असलेल्या परमेश्वराच्या मंडळ्यांचे अनुकरण करणारे झालात म्हणून स्वतःच्या बांधवांकडून तुम्हाला दुःख सहन करावे लागले, त्याच गोष्टी यहूदी लोकांकडूनही या मंडळ्यांना सहन कराव्या लागल्या.


आमची आशा, आमचा आनंद, आपल्या प्रभू येशूंच्या पुनरागमनासमयी त्यांच्या सान्निध्यात जो आमचा आशेचा मुकुट तो काय? ते तुम्हीच आहात ना?


प्रभू तुमची अंतःकरणे परमेश्वराच्या प्रीतिकडे आणि ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे लावो.


तुम्ही परमेश्वराची इच्छा पूर्ण केल्यानंतर जे वचन त्यांनी तुम्हाला दिले आहे ते तुम्हास मिळेल यासाठी धीराचे अगत्य आहे.


तुम्ही आळशी व्हावे अशी आमची इच्छा नाही, परंतु अशांचे अनुकरण करा की जे विश्वासाद्वारे आणि धीराच्या योगे प्रतिज्ञेचे वारस आहेत.


मग अब्राहामाने धीराने वाट पाहिल्यानंतर त्याला अभिवचनाप्रमाणे प्राप्त झाले.


तुम्हाला माहीत आहे, ज्यांनी धीर धरला त्यांना आपण आशीर्वादित म्हणतो. तुम्ही इय्योबाच्या धीराविषयी ऐकले आणि शेवटी प्रभूने त्याला कसे आशीर्वादित केले हे तुम्ही पाहिले. प्रभू करुणा आणि दया यांनी भरलेले आहेत.


ज्ञानात आत्मसंयमाची; आत्मसंयमात धीराची; धीरात सुभक्तीची;


कारण येशूंवर विश्वास ठेवणारे व अखेरपर्यंत परमेश्वराच्या आज्ञा पाळणार्‍या पवित्र लोकांना यामुळे धीराने प्रत्येक छळ सहन करण्याची आता आवश्यकता आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan