Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 7:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 जिथे कुठे मी इस्राएली लोकांबरोबर फिरत आलो, तेव्हा त्यांच्यातील ज्यांना मी माझ्या इस्राएली लोकांची मेंढपाळाप्रमाणे काळजी घेण्यास आज्ञा दिली त्यातील कोणत्याही अधिकार्‍यांना, “तुम्ही माझ्यासाठी गंधसरूचे घर का बांधले नाही” असे कधी म्हटले काय?’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 मी इस्राएल लोकांसह जिकडे जिकडे भ्रमण करीत फिरलो तिकडे तिकडे ज्या कोणा इस्राएल वंशाला इस्राएल लोकांची जोपासना करण्याविषयी मी आज्ञा करीत असे, त्यांना तुम्ही माझ्यासाठी गंधसरूचे मंदिर का बांधले नाही असा एक शब्द तरी मी कधी बोललो आहे काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 इस्राएल लोकांबरोबर मी जेथे जेथे गेलो, त्या त्या ठिकाणी, माझ्या इस्राएल लोकांचे मेंढपाळ व्हा म्हणून ज्यांना मी सांगितले त्या इस्राएल वंशातील कोणात्याही अधिकाऱ्याला “कधीही माझ्यासाठी तू गंधसरूचे, घर का बांधले नाहीस?” असे विचारले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 7:7
19 Iomraidhean Croise  

मागील काळात, जेव्हा शौल आमचा राजा होता, तेव्हा इस्राएलला त्यांच्या युद्धात चालविणारे तुम्हीच तर होता. आणि याहवेहने तुम्हाला म्हटले, ‘माझ्या इस्राएल लोकांचा मेंढपाळ व त्यांचा अधिकारी तू होशील.’ ”


मागील काळात, जेव्हा शौल राजा होता, तेव्हा इस्राएलला त्यांच्या युद्धात चालविणारे तुम्हीच तर होता. आणि याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला म्हटले, ‘माझ्या इस्राएली लोकांचा मेंढपाळ व त्यांचा अधिकारी तू होशील.’ ”


जिथे कुठे मी इस्राएली लोकांबरोबर फिरत आलो, तेव्हा त्यांच्यातील ज्यांना मी माझ्या लोकांची मेंढपाळाप्रमाणे काळजी घेण्यास आज्ञा दिली त्यातील कोणत्याही पुढार्‍यांना, “तुम्ही माझ्यासाठी गंधसरूचे भवन का बांधले नाही असे कधी मी म्हटले काय?” ’


ते मेंढपाळाप्रमाणे त्यांच्या कळपाचे संगोपन करतात: ते कोकरांना त्यांच्या कवेत एकत्र करतात आणि आपल्या हृदयाजवळ ठेवतात; जे अजून पिल्ले आहेत, त्यांना ते सौम्यपणाने नेतात.


याहवेह असे म्हणतात: “स्वर्ग माझे सिंहासन आहे आणि पृथ्वी माझे पादासन आहे. तुम्ही माझ्यासाठी निवासस्थान बांधणार ते कुठे आहे? माझे विश्रांतिस्थान कुठे असणार?


त्यांची काळजी घेण्यासाठी मी असे मेंढपाळ नेमीन, जे त्यांचे संगोपन करतील, व त्यांना पुन्हा भीती आणि दहशत वाटण्याचे कारण राहणार नाही, तसेच त्यातील कोणी हरविणारही नाही,” असे याहवेह जाहीर करतात.


नंतर मी तुम्हाला माझ्या मनासारखा असा मेंढपाळ देईन, तो शहाणपणाने आणि समजूतदारपणाने तुम्हाला मार्गदर्शन करेल.


मी स्वतः माझ्या मेंढरांना पाळीन आणि त्यांना विसावा देईन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.


“मानवपुत्रा, इस्राएलच्या मेंढपाळांविरुद्ध भविष्यवाणी कर; भविष्यवाणी करून त्यांना सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएलच्या मेंढपाळांनो तुम्हास धिक्कार असो! तुम्ही केवळ स्वतःविषयी काळजी करता, मेंढपाळांनी आपल्या कळपाची काळजी घेऊ नये काय?


मी त्यांच्यावर एक मेंढपाळ नेमीन तो माझा सेवक दावीद असेल आणि तो त्यांचे राखण करेल; तो त्यांची जोपासना करेल व त्यांचा मेंढपाळ होईल.


तो याहवेहच्या सामर्थ्याने, याहवेह त्याच्या परमेश्वराच्या नावाच्या वैभवात उठेल आणि आपल्या कळपाचा मेंढपाळ होईल आणि ते सुरक्षित राहतील, कारण तेव्हा पृथ्वीच्या टोकापर्यंतच्या लोकांना याहवेहची महानता कळेल.


“ ‘परंतु तू यहूदीया प्रांतातील बेथलेहेमा, यहूदीयांच्या शासकांमध्ये तू कोणत्याही प्रकारे कमी नाही, तुझ्यातून एक शासक उदय पावेल, तो माझ्या इस्राएली लोकांचा मेंढपाळ होईल.’ ”


तुम्ही स्वतःवर आणि सर्व कळपावर लक्ष ठेवा, कारण पवित्र आत्म्याने तुम्हाला देखरेख करण्यासाठी नेमले आहे. परमेश्वराने स्वतःच्या रक्ताने ज्या मंडळीला विकत घेतले आहे, त्या परमेश्वराच्या मंडळीचे तुम्ही मेंढपाळ व्हा.


ते मोठ्याने ओरडत म्हणाले, “अहो इस्राएल लोकहो, आमची मदत करा! हा मनुष्य प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी आपल्या लोकांविरुद्ध, आपल्या नियमांविरुद्ध व या स्थळाबद्दल शिकवण देतो आणि याशिवाय या मनुष्याने गैरयहूदी लोकांना येथे आणून हे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे.”


तुमचे रक्षण करण्यासाठी आणि तुमच्यापुढे तुमच्या शत्रूंना तुमच्या हाती देण्यासाठी, याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या छावणीमध्ये फिरत असतात. तुमची छावणी पवित्र असली पाहिजे, यासाठी की त्यांच्या दृष्टीस अमंगळता पडल्यास ते तुमच्यापासून दूर निघून जातील.


तुमच्यामध्ये जे वडील आहेत त्यांना मी एक सहवडील आणि ख्रिस्ताच्या दुःखांचा साक्षी, तो मी सुद्धा पुढे प्रकट होणार्‍या गौरवाचा वाटेकरी असेन, हा बोध करतो:


Lean sinn:

Sanasan


Sanasan