Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 7:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 जेव्हा तुझे दिवस भरतील आणि तू आपल्या पूर्वजांबरोबर निजशील, तेव्हा मी तुझे संतान म्हणजे तुझ्या पोटचा वंश उभा करून त्याला तुझा उत्तराधिकारी बनवीन, मी त्याचे राज्य प्रस्थापित करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तुझे दिवस पुरे झाले आणि तू जाऊन आपल्या पितरांबरोबर निजलास म्हणजे तुझ्या पोटच्या वंशजाला तुझ्यामागून स्थापून त्याचे राज्य स्थिर करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 तुझे जीवन संपुष्टात आले, म्हणजे तुझ्या मृत्यूनंतर तुझ्या पूर्वजांशेजारी तुझे दफन होईल. पण मी तुझ्या पुत्रापैकीच एकाला राजा करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 7:12
36 Iomraidhean Croise  

तेव्हा त्याच्याकडे याहवेहचे वचन आले, “तुझ्या मालमत्तेचा वारसदार हा मनुष्य होणार नाही, परंतु तुझे मांस व तुझे रक्त असलेला तुझा पुत्र तुझा वारस होईल.”


“ते आपल्या राजाला महान विजय देतात; ते आपल्या अभिषिक्तावर, दावीदावर आणि त्याच्या वंशजांवरही सर्वदा कृपा करतात.”


नाहीतर, माझे स्वामी त्यांच्या पूर्वजांबरोबर विसावा पावतील आणि मला आणि माझा पुत्र शलोमोनला दोषी असल्याची वागणूक दिली जाईल.”


आणि म्हटले, ‘याहवेह, इस्राएलचे परमेश्वर ज्यांनी मला आज माझ्या राजासनावरचा माझा वारस मला पाहू दिला, त्यांचे नाव धन्यवादित असो.’ ”


जेव्हा दावीदाचा शेवट जवळ आला, तेव्हा त्याने आपला पुत्र शलोमोनाला आज्ञा दिल्या.


यानंतर दावीद त्याच्या पूर्वजांसोबत विसावला आणि दावीदाच्या नगरात त्याला पुरले गेले.


आणि मला दिलेले हे अभिवचन याहवेह पूर्ण करतील: ‘जर तुझे वंशज आपले जीवन यथायोग्य ठेवतील, आणि त्यांच्या सर्व हृदयाने आणि जिवाने माझ्यासमोर विश्वासूपणे चालतील, इस्राएलच्या राजासनावर बसण्यासाठी तुझा वंश खुंटणार नाही.’


जसे याहवेहने माझे पिता दावीदाला सांगितले होते, ‘तुझा पुत्र, ज्याला मी तुझ्या जागी तुझ्या राजासनावर बसवेन तो माझ्या नावासाठी मंदिर बांधेल.’ म्हणून याहवेह माझ्या परमेश्वराच्या नावासाठी मी मंदिर बांधावे अशी मी इच्छा बाळगतो.


तेव्हा राजाने म्हटले: “याहवेह, इस्राएलचे परमेश्वर धन्यवादित असोत, कारण त्यांनी माझे वडील दावीद, यांना स्वतःच्या मुखाने दिलेले वचन आज स्वहस्ते पूर्ण केले आहे. कारण याहवेहने म्हटले होते की,


तथापि, तू ते मंदिर बांधणार नाहीस, तर तुझा पुत्र, तुझ्या स्वतःच्या हाडामांसाचा; तोच माझ्या नावासाठी मंदिर बांधील.’


“याहवेहने दिलेले वचन पूर्ण केले आहे: माझे वडील दावीदाचा मी वारस झालो आणि याहवेहने अभिवचन दिल्याप्रमाणे आता इस्राएलच्या राजासनावर मी बसतो आणि याहवेह इस्राएलचे परमेश्वर यांच्यासाठी मी हे मंदिर बांधले आहे.


तर इस्राएलवरचे तुझे राजासन मी सर्वकाळासाठी प्रस्थापित करेन, तुझा पिता दावीद याला मी अभिवचन देत म्हटले होते, ‘इस्राएलच्या राजासनावर तुझा वारस कधीही खुंटणार नाही.’


तथापि आपला सेवक दावीदासाठी याहवेहने यहूदाहचा नाश केला नाही. कारण त्यांनी दावीदाच्या वंशजाचा दिवा कायम ठेवण्याचे अभिवचन दिले होते.


जेव्हा तुझे दिवस भरतील आणि तू आपल्या पूर्वजांना जाऊन मिळशील, तेव्हा मी तुझे संतान, तुझ्या पुत्रांपैकी एक उभा करून त्याला तुझा उत्तराधिकारी बनवीन, मी त्याचे राज्य स्थापित करेन.


आता याहवेह परमेश्वरा, माझे पिता दावीदाला दिलेली वचने पूर्ण होऊ द्यावी, जमिनीवरील धूलिकणांप्रमाणे असंख्य लोक असलेल्या राष्ट्राचा तुम्ही मला राजा बनविले.


तुम्हाला माहीत नाही काय की, इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांनी मिठाच्या कराराद्वारे इस्राएलचे राज्यपद दावीद आणि त्याच्या वंशजांना कायमचे दिले आहे?


तथापि आपला सेवक दावीदासाठी याहवेहने दावीदाच्या घराण्याचा नाश केला नाही. कारण त्यांनी त्याच्या वंशजाचा दिवा कायम ठेवण्याचे अभिवचन दिले होते.


तेव्हा सर्व मंडळीने परमेश्वराच्या मंदिरात राजाबरोबर एक करार केला. यहोयादा त्यांना म्हणाला, “याहवेहनी दावीदाच्या वंशजांविषयी वचन दिल्याप्रमाणे राजाचा पुत्र राज्य करेल.


आपला सेवक, माझे पिता दावीदाला दिलेले अभिवचन आपण पाळले आहे; आपण आपल्या मुखाने अभिवचन दिले आणि स्वहस्ते ते आज पूर्ण केले आहे.


तथापि, तू ते मंदिर बांधणार नाहीस, तर तुझा पुत्र, तुझ्या स्वतःच्या हाडामांसाचा; तोच माझ्या नावासाठी मंदिर बांधील.’


मी त्याचे वंशज सर्वकाळ सुस्थापित करेन, त्याचे सिंहासन गगनमंडळाच्या अस्तित्वापर्यंत राहील.


त्या दिवशी इशायाचे मूळ लोकांसाठी ध्वज म्हणून उभे राहील; राष्ट्रे त्यांच्याकडे एकत्र येतील आणि त्यांचे विश्रामस्थान गौरवशाली असेल.


त्यांच्या सत्तेच्या महानतेचा आणि शांतीचा अंत होणार नाही. ते दावीदाच्या सिंहासनावरून राज्य करतील आणि त्याच्या राज्यावर राज्य करतील, ते त्या काळापासून आणि सर्वकाळपर्यंत न्याय आणि धार्मिकता स्थापन करतील आणि टिकवतील. सर्वसमर्थ याहवेहचा आवेश हे पूर्ण करेल.


कारण याहवेह असे म्हणतात: ‘इस्राएलाच्या सिंहासनावर बसण्यासाठी दावीदाला वारसाचा अभाव कधीही होणार नाही.


पृथ्वीच्या धुळीत झोपलेले बरेच लोक जागे होतील: काहीजण सर्वकाळच्या जीवनासाठी तर काही निर्लज्जता व सर्वकाळच्या अपमानासाठी उठतील.


अब्राहामाचा पुत्र दावीदाचा पुत्र, येशू ख्रिस्ताची ही वंशावळी:


ते परमथोर होतील आणि त्यांना परात्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू परमेश्वर त्यांना त्यांचा पूर्वज दावीदाचे सिंहासन देतील.


नंतर त्यांनी संपूर्ण धर्मशास्त्रातील मोशे व सर्व संदेष्ट्यांच्या लिखाणामधून स्वतःविषयी काय सांगितले आहे, हे त्यांना स्पष्ट केले.


“दावीदाने परमेश्वराच्या उद्देशाप्रमाणे आपल्या पिढीची सेवा केल्यानंतर तो मरण पावला; त्याला त्याच्या पूर्वजांबरोबर पुरले आणि त्याचे शरीर कुजले.


परंतु तो संदेष्टा होता व त्याला माहीत होते की परमेश्वराने त्याला शपथ वाहून असे अभिवचन दिले होते, त्याच्या वंशजांपैकी एकाला ते त्याच्या सिंहासनावर बसवतील.


ऐका, मी तुम्हाला एक रहस्य सांगतो: आपण सर्वच मरणार नाही, तर आपण सर्व बदलून जाऊ.


आणि याहवेह मोशेला म्हणाले: “तू आपल्या पूर्वजांसोबत विसावा घ्यावयास जाणार आहे आणि हे लोक ज्या देशात प्रवेश करणार आहेत, तिथे लवकरच परकीय दैवतांच्या समोर व्यभिचार करतील. ते माझा त्याग करतील आणि मी त्यांच्याबरोबर केलेला करार मोडतील.


कारण येशू मरण पावले आणि पुन्हा जिवंत झाले, असा आपला विश्वास आहे, त्याअर्थी येशूंमध्ये झोपी गेले आहेत त्यांना परमेश्वर माघारी आणतील यावर आपण विश्वास ठेवतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan