Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 7:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 आणि मी माझ्या इस्राएली लोकांसाठी एक ठिकाण नेमून देईन आणि त्यांना त्या ठिकाणी स्थापित करेन, यासाठी की त्यांना स्वतःचे घर असावे आणि त्यांना पुन्हा त्रास होऊ नये. आणि पूर्वीप्रमाणे दुष्ट लोकांनी त्यांचा छळ करू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 मी आपल्या इस्राएल लोकांसाठी एक स्थान नेमून देईन; मी तेथे त्यांना रुजवीन म्हणजे ते आपल्या स्थानी वस्ती करून राहतील व ते तेथून पुढे कधी ढळणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 माझ्या इस्राएल लोकांसाठी मी जागेची निवड केली. त्यांना राहायला हक्काची जागा दिली, त्यांना रुजवले त्यांना जागोजागी भटकंती करायला लागू नये म्हणून मी हे केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 7:10
25 Iomraidhean Croise  

जर ते केवळ माझा सेवक मोशेने दिलेले सर्व नियम, विधी आणि आज्ञांचे काळजीपूर्वक पालन करतील तर जी भूमी मी त्यांच्या पूर्वजांस दिली आहे त्यातून इस्राएली लोकांचे पाय भटकू देणार नाही.”


आणि मी माझ्या इस्राएली लोकांसाठी एक ठिकाण नेमून देईन आणि त्यांना त्या ठिकाणी स्थापित करेन, यासाठी की त्यांना आपले स्वतःचे घर असावे आणि त्यांना पुन्हा त्रास होऊ नये. आणि पूर्वीप्रमाणे दुष्ट लोकांनी त्यांचा छळ करू नये.


जर ते फक्त मोशेद्वारे दिलेले सर्व नियम, विधी आणि आज्ञांचे काळजीपूर्वक पालन करतील तर जी भूमी मी तुमच्या पूर्वजांस दिली आहे त्यातून इस्राएली लोकांची पावले भटकू देणार नाही.”


तुम्ही आपल्या हातांनी राष्ट्रांना घालवून दिले आणि तिथे आमच्या पूर्वजांना स्थापित केले; तुम्ही त्या लोकांना चिरडले आणि आमच्या पूर्वजांना समृद्ध केले.


तुम्ही माझे राजा आणि परमेश्वर आहात, जे याकोबाच्या विजयाचा आदेश देतात.


तुम्ही एक द्राक्षवेल इजिप्त देशातून आणली; इतर राष्ट्रांना तिथून हाकलून तिला रुजविले.


तुम्ही जमिनीची मशागत केली व ती नांगरली; या वेलीने मूळ धरले व समस्त भूमी व्यापून टाकली.


मग फारोहने आपल्या सर्व लोकांना हुकूम दिला, “इब्य्रांना होईल तो प्रत्येक मुलगा नाईल नदीत फेकून द्यावा, परंतु प्रत्येक मुलीला जिवंत राहू द्यावे.”


तुम्ही त्यांना आत, तुमच्या वतनाच्या पर्वतावर आणून रोपणार; तेच ठिकाण याहवेह, जे तुम्ही आपल्या निवासासाठी तयार केले, ते पवित्रस्थान जे, हे प्रभू, तुमच्या हातांनी प्रस्थापित केले.


त्याने ते खोदले आणि त्यातील दगड काढून ते स्वच्छ केले आणि मनपसंद द्राक्षवेलींचे तिथे रोपण केले. त्याने त्यामध्ये एक टेहळणी बुरूज बांधला आणि त्याचबरोबर द्राक्षकुंडही तयार केला. नंतर त्याने उत्तम द्राक्षांच्या पिकांची वाट पाहिली, परंतु तिथे फक्त वाईट फळे उपजली.


इस्राएल राष्ट्र सर्वसमर्थ याहवेहचा द्राक्षमळा आहे, आणि यहूदीयाचे लोक, त्यांना प्रसन्न करणाऱ्या द्राक्षलता आहेत, ज्यामध्ये त्यांना आनंद होतो. आणि त्यांनी न्यायाची अपेक्षा केली, परंतु त्यांना रक्तपातच दिसून आला; नीतिमत्वाची अपेक्षा केली, परंतु पीडेचे रुदन ऐकू आले.


यापुढे तुझ्या देशातून हिंसाचार, किंवा अधोगती व विध्वंस तुझ्या सीमेत ऐकिवात येणार नाही, परंतु तुझ्या तटबंदीस तू तारण व तुझ्या वेशींना स्तुती असे म्हणशील.


मग तुझे सर्व लोक नीतिमान होतील आणि ते त्यांच्या भूमीचे सर्वकाळचे मालक बनतील. कारण ते मी रोपलेली फांदी आहेत, माझा गौरव प्रकट करण्यासाठी माझी हस्तकृती आहेत.


आणि जर मी एखाद्या राष्ट्राची बांधणी करण्याची आणि वसविण्याची घोषणा केली,


त्यांचे बरे होईल याकडे माझे लक्ष राहील, आणि मी त्यांना इकडे परत आणेन, मी त्यांना उभारेन आणि त्यांना उद्ध्वस्त करणार नाही; मी त्यांना रोपीन, उपटून टाकणार नाही.


“ ‘इस्राएली लोकांना काटेरी झुडूपांसारखे आणि धारदार काट्यांप्रमाणे द्वेष्ट वृत्ती असलेले शेजारी आणखी नसतील. तेव्हा ते जाणतील की मीच सार्वभौम याहवेह आहे.


त्या दिवशी मी त्यांच्यासाठी रानातील पशू, आकाशातील पक्षी आणि भूमीवर सरपटणारे यांच्यामध्ये मी करार घडवून आणेन. धनुष्य आणि तलवार आणि लढाया मी देशातून काढून टाकेन, म्हणजे तुम्ही सर्वजण सुरक्षितपणे विश्राम कराल.


मी इस्राएलला त्यांच्या स्वतःच्या भूमीमध्ये पेरीन, मी त्यांना दिलेल्या भूमीतून त्यांना पुन्हा उपटून टाकण्यात येणार नाही.” असे याहवेह तुमचे परमेश्वर म्हणतात.


‘ते त्यांच्या डोळ्यांतील प्रत्येक अश्रू पुसून टाकतील आणि आता मृत्यू,’ दुःख, रडणे व वेदना अस्तित्वात राहणार नाहीत. या सर्व जुन्या गोष्टी कायमच्या नाहीशा झाल्या आहेत.”


त्याच्याजवळ नऊशे लोखंडी रथ होते आणि त्याने क्रूरतेने वीस वर्षे इस्राएली लोकांचा छळ केला, त्यांनी मदतीसाठी याहवेहचा धावा केला.


छापा टाकलेल्या टोळ्या पलिष्ट्यांच्या छावणीतून तीन तुकड्यांमध्ये बाहेर पडल्या. एक शूआल भागात ओफराहकडे गेली,


Lean sinn:

Sanasan


Sanasan