Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 7:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 राजा आपल्या राजवाड्यात राहत असताना व याहवेहने त्याला त्याच्या चहूकडील सर्व शत्रूंपासून विसावा दिल्यानंतर,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 राजा आपल्या मंदिरात राहू लागला, आणि परमेश्वराने त्याला त्याच्या चोहोकडल्या शत्रूंपासून विसावा दिला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 राजा दावीद आपल्या नवीन घरात राहू लागला आणि परमेश्वराने त्यास भोवतालच्या सर्व शत्रूंपासून विसावा दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 7:1
19 Iomraidhean Croise  

आता सोरचा राजा हीरामाने दावीदाकडे दूत पाठविले, त्यांच्याबरोबर देवदारू लाकडे व सुतार आणि गवंडी पाठवले आणि त्यांनी दावीदासाठी एक राजवाडा बांधला.


आणि शौलाची मुलगी मीखल हिला तिच्या मृत्यूच्या दिवसापर्यंत संतती झाली नाही.


मी माझ्या इस्राएली लोकांवर पुढारी नेमले तेव्हापासून त्यांनी तसेच केले आहे. मी तुलासुद्धा तुझ्या सर्व शत्रूंपासून विसावा देईन. “ ‘याहवेह असे जाहीर करतात, की याहवेह स्वतः तुझ्यासाठी घर स्थापित करतील:


परंतु आता माझ्या याहवेह परमेश्वराने सर्व बाजूंनी मला स्वस्थता दिली आहे. कोणी शत्रू किंवा अरिष्ट नाही.


नंतर त्याने त्याचा पुत्र शलोमोनला इस्राएलचे परमेश्वर याहवेहसाठी एक भवन बांधण्याची जबाबदारी दिली.


दावीद शलोमोनाला म्हणाला, “याहवेह परमेश्वराच्या नावाने मंदिर बांधावयाची माझी मनापासून इच्छा होती,


राजा दावीद उभा राहिला व म्हणाला: “माझ्या इस्राएली बंधूंनो, माझ्या लोकांनो, माझे ऐका. याहवेहच्या पवित्र कराराच्या कोशासाठी आणि परमेश्वराच्या पादास्थानासाठी एक भवन असावे म्हणून मंदिर बांधण्याची माझी इच्छा होती. आणि मी मंदिर बांधावयास योजना केली आहे.


त्याने यहूदीयाची तटबंदी असलेली नगरे बांधली, कारण देशात शांतता होती. त्या वर्षांमध्ये त्याच्याबरोबर युद्ध करणारा कोणी नव्हता, कारण याहवेहनी त्याला विश्रांती दिली होती.


आणि यहोशाफाटच्या राज्यात शांतता होती, कारण त्याच्या परमेश्वराने त्याला सर्व बाजूंनी विसावा दिला होता.


जेव्हापर्यंत याहवेहसाठी मी एक जागा उपलब्ध करीत नाही, याकोबाच्या सर्वसमर्थासाठी एक निवासस्थान बांधत नाही.”


याहवेह, माझे सामर्थ्य, माझे तुमच्यावर प्रेम आहे.


जर एखाद्या मनुष्यांचे मार्ग याहवेहला आवडले, तर ते त्याच्या शत्रूंबरोबरसुद्धा त्यांचा समेट घडवून आणतात.


नंतर, ज्या सेवकाला पाच सोन्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, त्याने ताबडतोब कामधंदा सुरू केला आणि लवकरच त्याने पाच थैल्या अधिक मिळविल्या.


दावीदाने परमेश्वराची कृपादृष्टी अनुभवली आणि त्याने याकोबाच्या परमेश्वरासाठी निवासस्थान बांधता येईल का अशी विचारपूस केली.


याहवेहने त्यांच्या पूर्वजांना शपथ दिल्याप्रमाणे त्यांना सर्वस्वी विसावा दिला. त्यांचा एकही शत्रू त्यांच्यासमोर उभा राहू शकला नाही; याहवेहने इस्राएली लोकांच्या प्रत्येक शत्रूला त्यांच्या हाती दिले.


पुष्कळ काळ होऊन गेला होता आणि याहवेहने इस्राएली लोकास सभोवतालच्या सर्व शत्रूपासून विश्रांती दिली, तोपर्यंत यहोशुआ अतिशय वयस्कर झाला होता,


Lean sinn:

Sanasan


Sanasan