Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 4:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 त्यांनी इश-बोशेथचे डोके हेब्रोनात दावीदाकडे आणले आणि राजाला म्हणाले, “हे पाहा, तुमचा शत्रू शौल ज्याने तुम्हाला जिवे मारावयास पाहिले, त्याचा पुत्र इश-बोशेथ याचे डोके. आज याहवेहने माझ्या धनीराजाच्या विरुद्ध शौल आणि त्याच्या संतानाचा सूड घेतला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 त्यांनी ईश-बोशेथाचे शिर हेब्रोनात दाविदाकडे आणले; ते राजाला म्हणाले, “पाहा, आपला शत्रू व आपला प्राण घेऊ पाहणारा शौलाचा पुत्र ईश-बोशेथ ह्याचे हे शिर आहे; आज परमेश्वराने माझ्या स्वामीराजांप्रीत्यर्थ शौल व त्याचा वंश ह्यांचा सूड उगवला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 ते हेब्रोन येथे पोहोचले आणि दावीदाला त्यांनी ईश-बोशेथचे मस्तक अर्पण केले. रेखाब आणि बाना दावीद राजाला म्हणाले, “शौल पुत्र ईश-बोशेथ या आपल्या शत्रूचे हे मस्तक. त्याने तुमच्या वधाचा प्रयत्न केला. त्याबद्दल आज परमेश्वरानेच शौलाला आणि त्याच्या कुटुंबियांना तुमच्यासाठी शासन केले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 4:8
18 Iomraidhean Croise  

तेव्हा सादोकाचा पुत्र अहीमाज म्हणाला, “मी धावत जाऊन राजाला ही बातमी द्यावी, की याहवेहने राजाला त्यांच्या शत्रूच्या हातून सोडवून मुक्ती दिली आहे.”


नंतर कूशी मनुष्य येऊन पोहोचला आणि म्हणाला, “माझे राजा, माझे स्वामी, चांगली बातमी ऐका! आपल्याविरुद्ध उठलेल्या लोकांच्या हातातून याहवेहने तुम्हाला सोडवून तुमची सुटका केली आहे.”


त्या दरम्यान, शौलाचा सेनापती नेरचा पुत्र अबनेरने शौलाचा पुत्र इश-बोशेथला महनाईम येथे आणले.


परमेश्वरच आहे जे माझ्यासाठी सूड घेतात, ते राष्ट्रांना माझ्या अधीन आणतात,


तुमच्या न्यायीपणाचे वर्णन माझी जीभ दिवसभर करेल, कारण मला अपाय करण्याची योजना करणारे सर्व लज्जित आणि अपमानित झाले आहेत.


आणि सांगितले, “ऊठ, बालक व त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशात परत जा, कारण बालकाचा जीव घेण्यास जे पाहत होते, ते मरण पावले आहेत.”


“पण हे स्वर्गा! तिचा शेवट झाला म्हणून तू आनंद कर! आणि तुम्ही, परमेश्वराच्या मुलांनो, संदेष्ट्यांनो, प्रेषितांनो, तुम्हीही आनंद करा! कारण तिने तुमच्यावर लादलेल्या न्यायाविरुद्ध परमेश्वराने तुमच्या बाजूने न्यायनिवाडा केला आहे.”


त्यांनी प्रभूला मोठ्याने हाक मारली, “हे सर्वसत्ताधारी पवित्र आणि सत्य प्रभू, पृथ्वीवरील लोकांचा न्याय करण्यास आणि आमच्या रक्ताबद्दल सूड घेण्यास तुम्ही किती काळ लावणार?”


“मी दावीदाला भिंतीशी खिळून टाकीन” असे म्हणत शौलाने भाला फेकला, परंतु दावीदाने त्याला दोनदा चुकविले.


शौलाने त्याचा पुत्र योनाथान आणि सर्व सेवकांना सांगितले की त्यांनी दावीदाला मारून टाकावे. परंतु योनाथानला दावीद फार आवडत असे


तेव्हा शौलाने दावीदाला पाहण्यासाठी माणसे परत पाठवली आणि त्यांना सांगितले, “त्याच्या पलंगासहित त्याला घेऊन या म्हणजे मी त्याला ठार मारेन.”


नंतर दावीद रामाहतील नायोथ येथून पळून गेला आणि योनाथानकडे जाऊन त्याने विचारले, “मी काय केले आहे? माझा अपराध काय आहे? तुझ्या पित्याशी मी काय चुकीचे वागलो आहे की, ते मला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत?”


दावीद जीफच्या वाळवंटातील होरेश येथे असताना त्याला कळले की, शौल त्याचा प्राण घेण्यासाठी बाहेर पडला आहे.


दावीदाची माणसे म्हणाली, “हाच तो दिवस आहे, ज्याविषयी याहवेहने तुम्हाला सांगितले होते, ‘मी तुझ्या शत्रूला तुझ्या हाती देईन तेव्हा तुला वाटेल तसे तू त्याचे कर.’ ” तेव्हा दावीदाने हळूवारपणे सरकत जाऊन शौलाच्या झग्याचा काठ कापून घेतला.


जरी कोणा मनुष्याने तुमचा जीव घेण्यासाठी तुमचा पाठलाग केला, तरी माझ्या धन्याचा जीव याहवेह तुमचा परमेश्वर यांच्याजवळ जिवंतांच्या गाठोड्यामध्ये सुरक्षित राहेल, परंतु जसे गोफणीच्या झोळीतून फेकावे तसे याहवेह तुमच्या शत्रूंचे प्राण भिरकावून देतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan