२ शमुवेल 4:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आता बैरोथ येथील रिम्मोनचे पुत्र रेखाब आणि बाअनाह हे प्रवासाला निघाले आणि इश-बोशेथ मध्यानाच्या वेळी, दुपारची विश्रांती घेत होता, तेव्हा हे त्याच्या घरी आले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 दुपारी उन्हाच्या वेळी ईश-बोशेथ आराम करीत असता रिम्मोन बैरोथकर ह्याचे पुत्र रेखाब व बाना हे त्याच्या घरात घुसले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 बैरोथच्या रिम्मोनची मुले रेखाब आणि बाना ही दुपारच्या वेळी ईश-बोशेथच्या घरी गेली. ऊन असल्यामुळे ईश-बोशेथ तेव्हा आराम करत होता. Faic an caibideil |
जेव्हा अरामी लोक मागे फिरले, तेव्हा त्यांनी योआशला गंभीर जखमी करून सोडले. यहोयादा या याजकाच्या मुलाचा खून करण्यासाठी त्याच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला आणि त्यांनी त्याला त्याच्या पलंगावर ठार मारले. म्हणून तो मरण पावला आणि त्याला दावीदाच्या नगरात पुरण्यात आले, परंतु राजांच्या कबरेत नव्हे.