Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 3:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 याहवेहने शपथ घेऊन दावीदाला जे म्हटले आहे त्याप्रमाणे मी जर केले नाही तर परमेश्वर अबनेराचे तसे किंवा त्यापेक्षा अधिक शासन करोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9-10 मी शौलाच्या घराण्याकडून राज्य हिसकावून घेईन आणि दाविदाची गादी दानापासून बैरशेब्यापर्यंत इस्राएल व यहूदा ह्यांच्यावर स्थापीन अशी आणभाक परमेश्वराने केली आहे; त्यानुसार मी त्याच्याशी वर्तन केले नाही तर देव अबनेराचे त्या मानाने, किंबहुना त्याहूनही अधिक शासन करो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 आता मात्र मी निश्चित सांगतो की, परमेश्वराने भाकित केल्याप्रमाणे सर्व घडेल. माझ्या हातून आता हे सर्व प्रत्यक्षात आले नाही, तर देव खुशाल माझे वाईट करो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 3:9
16 Iomraidhean Croise  

आणि अमासाला असे म्हणा, ‘तू माझ्या हाडामांसाचा नाहीस काय? योआबाच्या जागी तू माझ्या सैन्याचा सेनापती झाला नाहीस तर परमेश्वर मला अधिक कठोर शिक्षा करो.’ ”


अशाप्रकारे दावीदाने यहूदाह गोत्राच्या लोकांची मने जिंकून त्यांना एकमत केले. त्यांनी राजाकडे निरोप पाठवला, “तुम्ही आणि तुमची सर्व माणसे, परत या.”


नंतर त्या सर्वांनी येऊन दावीदाने दिवस असताच काही खावे अशी विनंती केली; पण दावीद शपथ घेत म्हणाला, “सूर्यास्ताच्या आधी मी भाकर किंवा काहीही सेवन केले, तर परमेश्वर मला कठोर शासन करोत!”


तेव्हा ईजबेलने एलीयाहकडे असे म्हणत एक दूत पाठवला, “उद्या या वेळेपर्यंत मी त्यांच्यातील एकाप्रमाणे तुझ्या जिवाचे केले नाही तर देव माझे त्याहूनही अधिक वाईट करो.”


तेव्हा शलोमोन राजाने याहवेहची शपथ घेतली: “अदोनियाहने ही जी विनंती केली आहे त्यासाठी त्याचा जीव देऊन त्याने किंमत मोजली नाही तर, परमेश्वर माझे पाहो आणि माझ्याशी अधिक कठोरपणे वागो!


दावीद हेब्रोन येथे असताना, त्याला अनेक कसलेले योद्धे येऊन मिळाले. याहवेहने वचन दिल्याप्रमाणे दावीदाला शौलाच्या जागी राजा होण्यास मदत करावी या उद्देशाने ते आले होते.


तुम्ही मराल तिथे मी मरेन आणि तिथेच मला मूठमाती देण्यात यावी. मरणाशिवाय तुम्हाला आणि मला वेगळे केले तर याहवेह माझा अधिक कठोरपणे न्याय करो.”


शौल म्हणाला, “योनाथान, जर मी तुला मृत्युदंड दिला नाही, तर परमेश्वर माझ्याशी कठोरपणे वागो.”


तेव्हा शमुवेल त्याला म्हणाला, “याहवेहने आज इस्राएलचे राज्य तुझ्यापासून फाडून घेऊन ते तुझ्यापेक्षा उत्तम असलेल्या तुझ्या एका शेजार्‍याला दिले आहे.


उद्या सकाळपर्यंत त्याच्या लोकांपैकी मी एकही पुरुष जिवंत ठेवला तर परमेश्वर दावीदाचे तसेच किंवा त्यापेक्षा अधिक वाईट करो!”


याहवेहने माझ्याद्वारे जे भविष्य सांगितले होते, ते त्यांनी केले आहे. याहवेहने तुझ्या हातून राज्य फाडून टाकले आहे आणि ते तुझ्या शेजार्‍यांपैकी एकाला म्हणजेच दावीदाला दिले आहे.


“याहवेह तुला काय म्हणाले?” एलीने विचारले. “माझ्यापासून ते लपवू नकोस. ज्यागोष्टी त्यांनी तुला सांगितल्या त्या जर तू माझ्यापासून लपवून ठेवल्या तर परमेश्वर तुला फार कठीण शिक्षा देवो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan