Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 3:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 तेव्हा इश-बोशेथचे बोलणे ऐकल्याने अबनेर फार संतापला. त्याने उत्तर दिले, “मी यहूदीयाच्या कुत्र्याचे डोके आहे काय? आजही मी तुझा पिता शौल याच्या घराण्याशी आणि त्याच्या कुटुंबाशी आणि त्याच्या मित्रांशी एकनिष्ठ आहे. मी तुला दावीदाच्या हातून शासन केले नाही. तरीही या स्त्रीला मध्ये आणून माझ्यावर अपराधाचा आरोप करीत आहे!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 ईश-बोशेथाचे हे शब्द ऐकून अबनेरास क्रोध आला व तो त्याला म्हणाला, “मी काय यहूदाच्या कुत्र्याचे डोके आहे? (मी काय यहूदाच्या पक्षाचा आहे?) आज तुझा बाप शौल ह्याचे घराणे आणि आप्तजन ह्यांच्यावर मी दया करीत असून तुला दाविदाच्या हाती लागू दिले नाही, आणि तू आज ह्या बायकोच्या संबंधाने मला दोष देत आहेस काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 या बोलण्याचा अबनेरला संताप आला. तो म्हणाला, मी काय यहूदाच्या असलेल्या कुत्र्याचे डोके आहे? शौलाशी आणि त्याच्या घराण्याशी मी एकनिष्ठ राहिलेलो आहे. दावीदाच्या हातून मी तुमचा पराभव होऊ दिला नाही. मी विश्वासघात केला नाही, पण आता तू मला या स्त्रीच्या संदर्भात दोष देत आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 3:8
16 Iomraidhean Croise  

तेव्हा जेरुइयाहचा पुत्र अबीशाई राजाला म्हणाला, “या मेलेल्या कुत्र्याने माझ्या स्वामीला का शाप द्यावा? मला त्याच्याकडे जाऊन त्याचा शिरच्छेद करू द्या.”


त्या दरम्यान, शौलाचा सेनापती नेरचा पुत्र अबनेरने शौलाचा पुत्र इश-बोशेथला महनाईम येथे आणले.


आता तसे करा! कारण याहवेहने दावीदाला अभिवचन दिले आहे, ‘माझा सेवक दावीद याच्याद्वारे माझ्या इस्राएली लोकांना मी पलिष्ट्यांच्या आणि त्यांच्या सर्व शत्रूंच्या हातातून सोडवेन.’ ”


याहवेहने शपथ घेऊन दावीदाला जे म्हटले आहे त्याप्रमाणे मी जर केले नाही तर परमेश्वर अबनेराचे तसे किंवा त्यापेक्षा अधिक शासन करोत.


मागील काळात, जेव्हा शौल आमचा राजा होता, तेव्हा इस्राएलला त्यांच्या युद्धात चालविणारे तुम्हीच तर होता. आणि याहवेहने तुम्हाला म्हटले, ‘माझ्या इस्राएल लोकांचा मेंढपाळ व त्यांचा अधिकारी तू होशील.’ ”


मेफीबोशेथ दंडवत घालीत म्हणाला, “तुमचा सेवक कोण आहे की, माझ्यासारख्या मेलेल्या कुत्र्याची तुम्ही नोंद घ्यावी?”


हजाएल म्हणाला, “कसे काय तुमचा सेवक मी एक कुत्रा आहे, एवढी मोठी गोष्ट करणार काय?” अलीशाने उत्तर दिले, “याहवेहने मला दाखविले आहे, तू अरामचा राजा होणार,”


खचित तुमचा मनुष्यावरचा क्रोध तुमच्या स्तुतीस कारणीभूत होईल, आणि तुमच्या रोषाने उर्वरितांना रोखण्यात आले.


तू कोणाचा उपहास व निंदा केलीस? तू कोणाविरुद्ध उंच आवाजात बोललास, गर्विष्ठपणाने कोणाकडे नजर उचलून बघितलेस? इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराविरुद्ध तू हे केलेस!


वेश्येच्या कमाईचा अथवा पुमैथुन करणार्‍याच्या मिळकतीचा पैसा याहवेह तुमच्या परमेश्वराच्या मंदिरात नवस फेडण्यासाठी कोणीही आणू नये; कारण हे दान व दान देणारी व्यक्ती या दोन्हीही गोष्टी याहवेह तुमच्या परमेश्वराच्या दृष्टीने ओंगळ होत.


तेव्हा शमुवेल त्याला म्हणाला, “याहवेहने आज इस्राएलचे राज्य तुझ्यापासून फाडून घेऊन ते तुझ्यापेक्षा उत्तम असलेल्या तुझ्या एका शेजार्‍याला दिले आहे.


तो दावीदाला म्हणाला, “माझ्यावर काठी घेऊन चालून येण्यास, मी कुत्रा आहे काय?” आणि त्या पलिष्ट्याने आपल्या दैवतांची नावे घेऊन दावीदाला शाप दिला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan