Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 3:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 त्याचा दुसरा पुत्र किलियाब, हा त्याला कर्मेलच्या नाबालाची विधवा अबीगईल हिच्यापासून झाला; तिसरा पुत्र अबशालोम हा गशूरचा राजा तलमय याची कन्या माकाह हिच्यापासून झाला;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 कर्मेली नाबालाची स्त्री अबीगईल हिच्यापासून त्याला किलाब झाला, हा त्याचा दुसरा पुत्र; गशूराचा राजा तलमय ह्याची कन्या माका हिच्यापासून त्याला तिसरा पुत्र अबशालोम झाला;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 दुसरा मुलगा किलाब, हा कर्मेलची नाबालची विधवा अबीगईल हिचा मुलगा. अबशालोम तिसरा, गशूरचा राजा तलमय याची मुलगी माका ही याची आई.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 3:3
22 Iomraidhean Croise  

काही काळानंतर, दावीदाचा पुत्र अम्नोन हा तामार, जी दावीदाचा पुत्र अबशालोम याची सुंदर बहीण होती, तिच्या प्रेमात पडला.


मग योआबाने गशूरला जाऊन अबशालोमला यरुशलेमास परत आणले.


तेव्हा राजाने म्हटले, “त्याने आपल्या स्वतःच्या घरी जावे, त्याने माझे मुख पाहू नये.” म्हणून अबशालोम आपल्या स्वतःच्या घरी जाऊन राहिला व त्याने राजाचे मुख पाहिले नाही.


अबशालोम योआबाला म्हणाला, “पाहा, मी तुला बोलाविणे पाठवित म्हटले, ‘येथे ये म्हणजे मी तुला राजाकडे हे विचारण्यास पाठवेन, “गशूरहून मी का आलो? मी अजूनही तिथेच असतो तर ते माझ्यासाठी बरे झाले असते!” ’ तर आता मला राजाला भेटावयाचे आहे, जर माझ्याठायी काही दोष असेल, तर त्यांनी मला जिवे मारावे.”


चार वर्षे पूर्ण झाल्यावर, अबशालोम राजाला म्हणाला, “मला हेब्रोन येथे जाऊ द्यावे म्हणजे मी याहवेहला केलेला आपला नवस फेडीन.


आपला सेवक अराम येथील गशूर या ठिकाणी राहत असताना मी हा नवस केला होता: ‘जर याहवेह मला परत यरुशलेमास घेऊन जातील, तर मी हेब्रोन येथे याहवेहची उपासना करेन.’ ”


तेव्हा राजा हादरून गेला. तो वरती दरवाज्यावरील खोलीत गेला आणि रडला! “माझ्या मुला, माझ्या मुला अबशालोमा! तुझ्या ऐवजी मी मेलो असतो—अरे माझ्या पुत्रा अबशालोमा, माझ्या पुत्रा!”


तेव्हा दावीद त्याच्या दोन पत्नी म्हणजे येज्रीली अहीनोअम आणि कर्मेलच्या नाबालाची विधवा अबीगईल यांच्याबरोबर तिथे गेला.


(“तू जे काही करतोस ते का करतोस?” असे त्याच्या वडिलांनी त्याला कधीही खडसावून विचारले नाही. तो सुद्धा फार रूपवान होता आणि अबशालोमच्या नंतर तो जन्मला होता.)


तेव्हा तो म्हणाला, “तुम्हाला तर ठाऊकच आहे की वास्तविकता राज्य माझे होते. त्यांचा राजा म्हणून सर्व इस्राएलची नजर माझ्याकडे होती. परंतु ते पालटले, आणि राज्य माझ्या भावाकडे गेले आहे; कारण त्याला ते याहवेहकडून आले आहे.


हेब्रोन येथे जन्मलेले दावीदाचे पुत्र: दावीदाचा ज्येष्ठपुत्र अम्नोन. दावीदाला तो येज्रीली अहीनोअमपासून झाला. दावीदाचा दुसरा पुत्र दानीएल. त्याच्या आईचे नाव अबीगईल असे असून ती कर्मेलची होती.


तिसरा पुत्र अबशालोम हा गशूरचा राजा तलमयची कन्या माकाहपासून झाला. चौथा पुत्र अदोनियाह हग्गीथपासून जन्मला.


मनश्शेहच्या वंशातील याईराच्या कुळाने गशूरी व माकाथी लोकांच्या सीमेपर्यंतचा अर्गोबचा संपूर्ण प्रदेश आपल्या ताब्यात घेतला; त्याच्या नावावरून त्या प्रदेशाचे नाव पडले, त्यामुळे आजपर्यंत बाशानाला हव्योथ याईर म्हणतात.)


परंतु इस्राएली लोकांनी गशूरी व माकाथी लोकांना घालवून दिले नव्हते, म्हणून आज देखील ते लोक इस्राएली लोकात राहत आहेत.


त्याचे नाव नाबाल आणि त्याच्या पत्नीचे नाव अबीगईल होते. ती बुद्धिमान व सुंदर स्त्री होती, परंतु तिचा पती तो कालेबच्या वंशाचा असून कठोर व दुष्ट वृत्तीचा होता.


अबीगईल त्वरित गाढवावर बसली आणि तिच्या पाच दासी व दावीदाच्या निरोप्यांबरोबर गेली आणि त्याची पत्नी झाली.


नंतर दावीद आणि त्याच्या माणसांनी गशूरी, गिरजी आणि अमालेकी या लोकांवर छापा टाकला. (पुरातन काळापासून हे लोक शूर शहरापासून इजिप्तपर्यंत वाढत गेलेल्या प्रदेशात राहत होते.)


Lean sinn:

Sanasan


Sanasan