Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 3:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 नंतर अबनेरने आपल्या निरोप्यांना दावीदाकडे असे म्हणत पाठवले, “हा प्रदेश कोणाचा आहे? माझ्याबरोबर एक करार कर आणि मी सर्व इस्राएली लोकांना तुझ्याकडे आणण्यास मदत करेन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 अबनेराने आपल्या नावाने दाविदाकडे जासूद पाठवून सांगितले, “हा देश कोणाचा बरे?” आणखी असेही सांगितले की, “आपण माझ्याशी सलोखा करा; सर्व इस्राएलाचे मन आपल्याकडे वळवण्याच्या कामी मी आपल्याला मदतीचा हात देतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 अबनेरने दूताकरवी दावीदाला निरोप पाठवला, “या प्रदेशावर कोणी राज्य करावे असे तुला वाटते? माझ्याशी करार कर. म्हणजे इस्राएलचा राजा म्हणून तुला मान्यता मिळवून द्यायला मी मदत करीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 3:12
15 Iomraidhean Croise  

अशाप्रकारे दावीदाने यहूदाह गोत्राच्या लोकांची मने जिंकून त्यांना एकमत केले. त्यांनी राजाकडे निरोप पाठवला, “तुम्ही आणि तुमची सर्व माणसे, परत या.”


लवकरच सर्व इस्राएली लोक दावीद राजाकडे येऊन त्यांना म्हणू लागले, “आमचे भाऊबंद, यहूदीयाचे लोक यांनी राजाला का चोरून नेले आणि त्यांना व त्यांच्या घराण्याला, त्यांच्या सैन्यासह यार्देन पार करून नेले?”


तुमचा द्वेष करणार्‍यांवर तुम्ही प्रेम करता आणि तुमच्यावर प्रेम करणार्‍यांचा तुम्ही द्वेष करता. आज तुम्ही हे स्पष्ट केले आहे की, सेनापती आणि त्यांची माणसे यांचे तुम्हाला काही वाटत नाही. मला तर असे वाटते की आज जर आम्ही सर्व मेलो असतो आणि अबशालोम जिवंत असता तर तुम्हाला आनंद झाला असता.


इश-बोशेथ अबनेरला आणखी एकही शब्द बोलण्यास धजला नाही, कारण तो अबनेरला घाबरत होता.


दावीद म्हणाला, “ठीक आहे, मी तुझ्याबरोबर एक करार करेन. परंतु मी तुझ्याकडून एका गोष्टीची मागणी करतो: जेव्हा तू मला भेटायला येशील तेव्हा शौलाची कन्या मीखल हिला घेऊन आल्याशिवाय माझ्यासमोर येऊ नकोस.”


तेव्हा अबनेर दावीदाला म्हणाला, “मी जाऊन माझ्या धनीराजासाठी सर्व इस्राएली लोकांना एकत्र करेन, यासाठी की त्यांनी तुमच्याबरोबर एक करार करावा, मग आपल्या मनास येईल त्यांच्यावर आपण राज्य करावे” तेव्हा दावीदाने अबनेरला रवाना केले आणि तो शांतीने गेला.


जेव्हा अबनेर हेब्रोनास परत आला, तेव्हा योआबाने त्याला आतील खोलीत बाजूला नेले जसे की, त्याला त्याच्याबरोबर काही खाजगी बोलावयाचे आहे. आणि तिथे त्याचा भाऊ असाहेल याच्या रक्ताचा सूड घ्यावा म्हणून योआबने त्याच्या पोटावर वार केला आणि तो मरण पावला.


नंतर राजा आपल्या माणसांना म्हणाला, “तुम्हाला लक्षात येत नाही काय की आज इस्राएलमध्ये एक सेनापती, एक महान पुरुष पडला आहे?


साधारण मानव श्वासमात्र आहेत; विशिष्ट मानव फक्त मिथ्या आहेत; तराजूत वजन केले की ते हलकेच भरतील; ते सर्व श्वासमात्र आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan