Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 3:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 आणि शौलाच्या घराण्याकडून राज्य हस्तांतरीत करून इस्राएल आणि यहूदीयावर दानपासून बेअर-शेबापर्यंत दावीदाचे सिंहासन स्थापित केले नाही तर परमेश्वर अबनेरशी अधिक कठोरपणे वागो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 शौलाच्या घराण्याकडून राज्य काढून घेऊन ते दावीदाकडे सोपवण्याचे भाकित परमेश्वराने केले आहे. परमेश्वर दावीदाला इस्राएल आणि यहूदा यांचा राजा करणार आहे. दानपासून बैर-शेब्यापर्यंत त्याचे राज्य असेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 3:10
9 Iomraidhean Croise  

“म्हणून मी तुला सल्ला देतो: दानपासून बेअर-शेबापर्यंत असलेल्या सर्व असंख्य इस्राएली लोकांना समुद्रकिनाऱ्यावरील वाळूप्रमाणे तुझ्याकडे गोळा कर, आणि तू स्वतः युद्धाचे नेतृत्व कर.


म्हणून राजाने योआब व त्याच्या बरोबरच्या सेनापतींना सांगितले, “दानपासून बेअर-शेबापर्यंत इस्राएलच्या सर्व गोत्रांमधून फिरून, लढाऊ पुरुषांची नोंदणी करा, म्हणजे ते किती आहेत ते मला कळेल.”


इश-बोशेथ अबनेरला आणखी एकही शब्द बोलण्यास धजला नाही, कारण तो अबनेरला घाबरत होता.


तेव्हा अबनेर दावीदाला म्हणाला, “मी जाऊन माझ्या धनीराजासाठी सर्व इस्राएली लोकांना एकत्र करेन, यासाठी की त्यांनी तुमच्याबरोबर एक करार करावा, मग आपल्या मनास येईल त्यांच्यावर आपण राज्य करावे” तेव्हा दावीदाने अबनेरला रवाना केले आणि तो शांतीने गेला.


शलोमोनच्या जीवनभरात यहूदीया आणि इस्राएलचे लोक, दानपासून बेअर-शेबापर्यंत सुरक्षित होते, प्रत्येकजण आपआपल्या द्राक्षवेली व अंजिराच्या झाडाखाली होते.


तेव्हा दानपासून ते बेअर-शेबापर्यंतचे आणि गिलआदाच्या प्रदेशातून सर्व इस्राएली एकत्र आले आणि मिस्पाह येथे याहवेहसमोर जमा झाले.


तेव्हा शमुवेल त्याला म्हणाला, “याहवेहने आज इस्राएलचे राज्य तुझ्यापासून फाडून घेऊन ते तुझ्यापेक्षा उत्तम असलेल्या तुझ्या एका शेजार्‍याला दिले आहे.


याहवेहने माझ्याद्वारे जे भविष्य सांगितले होते, ते त्यांनी केले आहे. याहवेहने तुझ्या हातून राज्य फाडून टाकले आहे आणि ते तुझ्या शेजार्‍यांपैकी एकाला म्हणजेच दावीदाला दिले आहे.


आणि दानपासून बेअर-शेबापर्यंत सर्व इस्राएली लोकांनी ओळखले की शमुवेल याहवेहचा संदेष्टा होण्यास प्रमाणित केलेला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan