Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 3:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 शौलाचे घराणे आणि दावीदाचे घराणे यांच्यामधील युद्ध फार काळ चालू होते. दावीदाचे घराणे अधिक अधिक बलवान होत गेले आणि शौलाचे घराणे अधिक अधिक दुर्बल होत गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 शौलाचे घराणे व दाविदाचे घराणे ह्यांच्यामध्ये फार दिवस युद्ध चालू राहिले; दावीद प्रबल होत गेला व शौलाचे घराणे निर्बल होत गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 दावीद आणि शौल यांच्या घराण्यांमध्ये दीर्घकाळ युध्द चालू राहिले. काही दिवसानंतर दावीदाची ताकद वाढत चालली तर शौलाचे घराणे कमकुवत बनत गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 3:1
26 Iomraidhean Croise  

तू आणि स्त्री, तुझी संतती आणि तिची संतती यामध्ये मी शत्रुत्व निर्माण करेन; तिचे संतान तुझे मस्तक चिरडेल आणि तू त्याची टाच फोडशील.”


त्या दिवशी तीव्र युद्ध झाले आणि अबनेर व इस्राएली सैन्य यांचा दावीदाच्या माणसांनी पराभव केला.


तेव्हा योआबने कर्णा वाजविला आणि सर्व सैन्य थांबले; त्यांनी पुढे इस्राएलचा पाठलाग केला नाही किंवा ते त्यांच्याशी पुन्हा लढलेही नाही.


“लोकांच्या हल्ल्यापासून तुम्ही माझी सुटका केली; राष्ट्रांचा प्रमुख म्हणून तुम्ही मला राखून ठेवले. ज्या लोकांची मला ओळख नव्हती ते आता माझी सेवा करतात,


दावीद व शौल यांच्या घराण्यांमधील लढाईच्या काळात, अबनेर शौलाच्या घराण्यात आपले स्थान मजबूत करीत होता.


आणि दावीद अधिकाधिक शक्तिशाली बनत गेला, कारण याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर त्याच्याबरोबर होते.


रेहोबोअम व यरोबोअम यांच्यामध्ये सतत युद्ध होत राहिले.


यहूदीयाचा राजा आसा व इस्राएलचा राजा बाशा यांच्यात त्यांच्या आयुष्यभर युद्ध होत राहिले.


यहूदीयाचा राजा आसा व इस्राएलचा राजा बाशा यांच्यात त्यांच्या आयुष्यभर युद्ध होत राहिले.


आणि दावीद अधिकाधिक शक्तिशाली बनत गेला, कारण सर्वसमर्थ याहवेह त्याच्याबरोबर होते.


हेब्रोन येथे जन्मलेले दावीदाचे पुत्र: दावीदाचा ज्येष्ठपुत्र अम्नोन. दावीदाला तो येज्रीली अहीनोअमपासून झाला. दावीदाचा दुसरा पुत्र दानीएल. त्याच्या आईचे नाव अबीगईल असे असून ती कर्मेलची होती.


मग हामानाने घडलेल्या गोष्टीची संपूर्ण हकिकत त्याची पत्नी जेरेश व त्याच्या सर्व मित्रांना सांगितली. त्याचे सल्लागार व पत्नी जेरेश त्याला म्हणाले, “मर्दखय यहूदी असेल, तर तुमचे अधःपतन सुरू झाले आहे. तुम्ही त्याच्याविरुद्ध कधीही यशस्वी होणार नाही—आता तुमचा निश्चितच नाश होणार!”


मर्दखया राजवाड्यात एक महत्त्वाचा व्यक्ती होता; त्याची किर्ती सर्व प्रांतात पसरली होती व तो आता अत्यंत प्रबळ झालेला होता.


तरीही, नीतिमान आपल्या मार्गात स्थिर राहतील, आणि शुद्ध हृदयाचे लोक अधिक बलवान होत जातील.


तुझा प्रारंभ लीन असला, तरी तुझे भावी आयुष्य समृद्धीचे होईल.


लोकांच्या हल्ल्यापासून तुम्ही माझी सुटका केली; राष्ट्रांचा प्रमुख म्हणून तुम्ही मला नेमले. ज्या लोकांची मला ओळख नव्हती ते आता माझी सेवा करतात,


दिगंतापर्यंत युद्धे ते बंद करतात. ते धनुष्य तोडतात आणि भाल्याचे तुकडे तुकडे करतात; ते रथांना अग्नीत भस्म करतात.


सीयोनात परमेश्वराच्या समोर प्रत्येकजण उपस्थित होईपर्यंत, त्यांचे सामर्थ्य दिवसेंदिवस वाढेल.


दैहिक इच्छा आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहाविरुद्ध आहे. ते आपसात विरोधी आहेत, यासाठी की ज्यागोष्टी तुम्ही केल्या पाहिजे त्या तुम्ही करू नये.


कारण आपले युद्ध मांस आणि रक्त यांच्याविरुद्ध नाही, तर सत्ताधारी, अधिपतींविरुद्ध, अंधकाराच्या शक्तीविरुद्ध, आणि आकाशमंडळातील दुष्ट आत्मे यांच्याविरुद्ध आहे.


मी पहिले तो माझ्यासमोर एक पांढरा घोडा आहे असे मला दिसले! घोडेस्वाराजवळ एक धनुष्य होते. त्याच्या डोक्यावर एक मुकुट ठेवण्यात आला. मग विजेता म्हणून जिंकण्याच्या उद्देशाने तो स्वार निघून गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan