Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 24:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 परंतु योआबाने राजाला उत्तर दिले, “याहवेह आपले परमेश्वर आपल्या सैन्यातील संख्या शंभरपटीने वाढवो आणि माझे स्वामी ते आपल्या डोळ्यांनी पाहो. परंतु गणती करावी अशी इच्छा राजा का बाळगतात?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 यवाब राजाला म्हणाला, “आपले लोक कितीही असोत, आपला देव परमेश्वर त्यांना शतगुणित करो आणि माझे स्वामीराजे आपल्या डोळ्यांनी ते पाहोत; पण माझ्या स्वामीराजांना ही हौस का वाटावी?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 पण यवाब राजाला म्हणाला, “आपले लोक कितीही असोत देव परमेश्वर त्यांना शतगुणित करो. तुम्हास हे सर्व पाहायला मिळो पण तुम्हास असे का करावेसे वाटते?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 24:3
7 Iomraidhean Croise  

खंबीर व्हा, आपल्या लोकांसाठी आणि आपल्या परमेश्वराच्या शहरांसाठी आपण धैर्याने लढू. याहवेहच्या दृष्टीने जे बरे ते याहवेह करतील.”


तथापि, राजाच्या शब्दापुढे योआब व सेनापतींचे म्हणणे सफल झाले नाही; तेव्हा ते इस्राएलच्या लढाऊ पुरुषांची गणती करण्यासाठी राजापुढून निघून गेले.


याहवेह तुम्हाला समृद्ध करो, तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळांनाही.


वाढती लोकसंख्या राजाचे वैभव आहे; पण लोकच नसले तर अधिपती नष्ट होतो!


मग तू ते बघशील व उल्हासित होशील, तुझे अंतःकरण स्पंदेल व आनंदाने फुगून जाईल; सागराची संपत्ती तुझ्याकडे आणण्यात येईल, अनेक देशांची समृद्धी तुझ्याकडे येईल.


याहवेह तुमच्या पूर्वजांच्या परमेश्वरांनी जे तुम्हाला अभिवचन दिले होते, त्यानुसार तुमची संख्या हजारपटीने वाढवो आणि तुम्हाला आशीर्वाद देवो!


Lean sinn:

Sanasan


Sanasan