Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 22:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 जेव्हा याहवेहने दावीदाला त्याच्या सर्व शत्रूंच्या हातातून आणि शौलाच्या हातातून सोडविले, तेव्हा दावीदाने या शब्दात याहवेहसाठी गीत गाईले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 परमेश्वराने दाविदाला त्याच्या सर्व शत्रूंपासून व शौलाच्या हातांतून सोडवले त्या समयी त्याने परमेश्वराला हे कवन गाईले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 शौल आणि इतर शत्रू यांच्या हातून परमेश्वराने सोडवल्याबद्दल दावीदाने हे स्तुतिगीत म्हटले;

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 22:1
20 Iomraidhean Croise  

त्या दिवशी दबोरा आणि अबीनोअमाचा पुत्र बाराकाने हे गीत गाईले:


नंतर मोशे व इस्राएली लोकांनी याहवेहप्रीत्यर्थ हे गीत गाईले: “मी याहवेहला गीत गाईन, कारण ते अत्युच्च आहेत. घोडे व त्यांचे स्वार त्यांनी समुद्रात फेकले आहेत.


प्रभू सर्व वाईटापासून मला सोडवतील आणि मला त्यांच्या स्वर्गीय राज्यात सुरक्षित आणतील. परमेश्वराला सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.


नीतिमानावर संकटे येत नाहीत असे नाही, परंतु याहवेह त्याला प्रत्येक संकटातून सोडवितात.


“परमेश्वराला उपकारस्तुतीचे यज्ञ कर; सर्वोच्च परमेश्वरापुढे आपले नवस फेड,


ते मला माझ्या वैर्‍यांपासून मुक्त करतात. तुम्ही मला माझ्या वैर्‍यांपेक्षा उंचावले आहे; हिंसक मनुष्यापासून तुम्ही मला सोडविले.


परंतु दावीदाने आपल्या मनात म्हटले, “कधी तरी मी शौलाच्या हातून मरणारच आहे. पलिष्ट्यांच्या देशात पळून जाणे उत्तम आहे. मग शौल इस्राएलमध्ये माझा शोध करण्याचे सोडून देईल आणि मी त्याच्या हातातून निसटून जाईन.”


जसा आज तुमचा जीव मला मोलाचा वाटला, तसेच याहवेहला माझाही जीव मोलाचा वाटो आणि ते सर्व संकटांपासून मला वाचवो.”


जरी कोणा मनुष्याने तुमचा जीव घेण्यासाठी तुमचा पाठलाग केला, तरी माझ्या धन्याचा जीव याहवेह तुमचा परमेश्वर यांच्याजवळ जिवंतांच्या गाठोड्यामध्ये सुरक्षित राहेल, परंतु जसे गोफणीच्या झोळीतून फेकावे तसे याहवेह तुमच्या शत्रूंचे प्राण भिरकावून देतील.


याहवेहनेच आपला न्यायाधीश होऊन आपल्यामध्ये निवाडा करावा. त्यांनी माझा वाद लक्षात घेऊन माझा कैवार घ्यावा; व मला तुमच्या हातून सोडवून माझी सुटका करावी.”


दावीद अरण्यातील गडांमध्ये आणि जीफच्या डोंगराळ प्रदेशातील रानामध्ये राहू लागला. दिवसेंदिवस शौल त्याचा शोध घेत होता, परंतु परमेश्वराने दावीदाला त्याच्या हाती दिले नाही.


त्यांनी आम्हाला मरणाच्या धोक्यातून सोडविले आणि ते पुन्हा आम्हाला असेच सोडवतील. आम्ही त्यांच्यावर आशा ठेवली आहे की ते आम्हाला असेच पुढेही सोडवित राहतील.


आणि मोशेने या गीताचे शब्द प्रारंभापासून तर शेवटपर्यंत जमलेल्या इस्राएली लोकांच्या सर्व मंडळीच्या कानी पडतील असे सांगितले.


त्या दिवसापासून दावीदाने याहवेहची अशा प्रकारे उपकारस्तुती करण्यासाठी आसाफ व त्याचे सहायक नेमले:


तेव्हा नाथान दावीदाला म्हणाला, “तो मनुष्य तूच आहेस! याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘मी तुझा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला आणि तुला शौलाच्या हातातून सोडविले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan