Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 21:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तेव्हा राजाने गिबोनी लोकांस बोलावून घेतले आणि त्यांना म्हटले. (गिबोनी लोक इस्राएलचा भाग नव्हते, परंतु अमोरी लोकांतून उरलेले लोक होते; त्यांना जिवंत ठेवावे अशी इस्राएली लोकांनी शपथ घेतली होती, परंतु इस्राएल आणि यहूदाह यांच्याबद्दल असलेल्या त्याच्या आवेशामुळे शौलाने त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.)

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 राजाने गिबोनी लोकांना बोलावून त्यांच्याशी बोलणे केले. (हे गिबोनी लोक इस्राएल लोकांपैकी नसून अवशिष्ट अमोर्‍यांपैकी होते; इस्राएल लोकांनी त्यांच्याशी शपथ वाहून करार केला होता; पण इस्राएल लोक व यहूदी लोक ह्यांच्या अभिमानास्तव शौलाने गिबोनी लोकांचा संहार करण्याचा प्रयत्न केला होता.)

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 गिबोनी म्हणजे इस्राएली नव्हेत ते अमोरी होत इस्राएलींनी त्यांना दुखापत न करण्याचे वचन दिले होते. तरी शौलाने गिबोन्यांच्या वधाचा प्रयत्न केला. इस्राएली आणि यहूदा लोकांविषयीच्या अति उत्साहामुळे त्याने तसे केले गिबोन्यांना एकत्र बोलावून राजा दावीदाने त्यांच्याशी बोलणे केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 21:2
13 Iomraidhean Croise  

चार पिढ्यानंतर तुझे वंशज या भूमीत परत येतील, कारण अमोर्‍यांचा अपराध अजून पूर्ण झालेला नाही.”


इस्राएली लोकांविरुद्ध याहवेहचा कोप पुन्हा भडकला आणि त्यांनी दावीदाला चिथविले, “जा आणि इस्राएल व यहूदीयाची शिरगणती कर.”


येहूने म्हटले, “आता माझ्याबरोबर चल आणि मी याहवेहविषयी किती उत्कट आस्था बाळगतो ते पाहा.” तेव्हा यहोनादाब त्याच्याबरोबर रथात बसून गेला.


परंतु येहू याहवेह इस्राएलांच्या परमेश्वराचे नियम आपल्या पूर्ण अंतःकरणाने पाळण्यात काळजीपूर्वक राहिला नाही. यरोबोअमने इस्राएलला करावयाला लावलेल्या पातकांपासून तो मागे फिरला नाही.


यबूसी, अमोरी, गिर्गाशी,


कारण ते तुम्हाला सभागृहामधून काढून टाकतील आणि खरोखर, अशी वेळ येत आहे की, जे कोणी तुम्हाला जिवे मारतील त्यांना आपण परमेश्वराला सेवेचा यज्ञ अर्पण करीत आहोत असे वाटेल.


ते परमेश्वराप्रती आवेशी आहेत, हे मला ठाऊक आहे, परंतु तो आवेश ज्ञानावर आधारित नाही, याबद्दल मी साक्ष देतो.


ते लोक तुम्हाला आपल्या पक्षात घेण्यास उत्सुक आहेत, पण ते तुमच्या भल्यासाठी नाही. परंतु तुम्ही त्यांचे शिष्य व्हावे, म्हणून ते तुम्हाला आम्हापासून वेगळे करू पाहतात.


याहवेह तुमचे परमेश्वर जे सर्व देश तुमच्या हाती देतील, त्यांचा तुम्ही पूर्णपणे संहार करावा. त्यांना दयामाया दाखवू नका व त्यांच्या दैवतांची सेवा करू नका. कराल, तर ते तुमच्यासाठी सापळा असे होईल.


शौल म्हणाला, “योनाथान, जर मी तुला मृत्युदंड दिला नाही, तर परमेश्वर माझ्याशी कठोरपणे वागो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan