Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 21:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 दावीदाच्या कारकिर्दीत लागोपाठ तीन वर्षे दुष्काळ पडला होता; म्हणून दावीद याहवेहसमोर गेला. याहवेह म्हणाले, “हे शौल आणि त्याच्या रक्तदोषी घराण्यामुळे आहे; कारण त्याने गिबोनी लोकांना मारले होते.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 दाविदाच्या कारकिर्दीत लागोपाठ तीन वर्षे दुष्काळ पडला; तेव्हा दाविदाने परमेश्वरासमोर जाऊन प्रश्‍न केला. परमेश्वराने उत्तर दिले, “शौल व त्याचे खुनी घराणे ह्यांच्यामुळे हा दुष्काळ पडला आहे, कारण त्याने गिबोनी लोकांचा संहार केला.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 दावीदाच्या कारकिर्दीत एकदा दुष्काळ पडला. हा दुष्काळ तीन वर्षे टिकला तेव्हा दावीदाने परमेश्वराची प्रार्थना केली परमेश्वराने सांगितले, “शौल आणि त्याचे खुनी रक्तपिपासू घराणे यावेळच्या दुष्काळाला जबाबदार आहेत. शौलने गिबोन्यांना मारले म्हणून हा दुष्काळ पडला.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 21:1
34 Iomraidhean Croise  

त्यावेळी त्या देशात मोठा दुष्काळ पडला होता म्हणून अब्राम इजिप्तमध्ये राहण्यास गेला, कारण दुष्काळ फारच भयंकर होता.


त्या देशात दुष्काळ पडला—अब्राहामाच्या काळात पडला त्या खेरीज हा दुसरा दुष्काळ होता—म्हणून इसहाक गरार या शहरात पलिष्ट्यांचा राजा अबीमेलेख याजकडे गेला.


जगभर दुष्काळ पडल्यामुळे संपूर्ण जगातील लोक इजिप्तमध्ये येऊन योसेफाकडून धान्य विकत घेऊ लागले.


अशा रीतीने इस्राएलचे पुत्र इतर लोकांबरोबर इजिप्तमध्ये धान्य खरेदीसाठी आले, कारण दुष्काळ कनान देशातही पडला होता.


परंतु देशात दुष्काळ तीव्र होता.


ज्याच्या जागी तू राज्य केलेस त्या शौलाच्या घराण्याचा जो रक्तपात तू केला त्याचा मोबदला याहवेह तुला देत आहेत. आता याहवेहने ते राज्य तुझा पुत्र अबशालोम याच्या हाती दिले आहे. तू खुनी आहेस म्हणून तू नाशास येऊन ठेपला आहेस!”


आणि याईरचा वंशज ईरा दावीदाचा याजक होता.


त्यांनी राजाला उत्तर दिले, “ज्या मनुष्याने आमचा नाश केला आणि आमची संख्या कमी व्हावी आणि इस्राएलमध्ये कुठेही आम्हाला स्थान नसावे म्हणून आमच्याविरुद्ध योजना केली,


इस्राएली लोकांविरुद्ध याहवेहचा कोप पुन्हा भडकला आणि त्यांनी दावीदाला चिथविले, “जा आणि इस्राएल व यहूदीयाची शिरगणती कर.”


तेव्हा दावीदाने याहवेहला विचारले, “मी जाऊन पलिष्ट्यांवर हल्ला करू काय? आपण त्यांना माझ्या हाती देणार काय?” याहवेहने त्याला उत्तर दिले, “जा, कारण मी नक्कीच पलिष्ट्यांना तुझ्या हातात देईन.”


तेव्हा दावीदाने याहवेहला विचारले आणि त्यांनी उत्तर दिले, “सरळ वरती जाऊ नको, परंतु त्यांच्यामागून वळसा घे आणि तुतीच्या झाडांसमोरून त्यांच्यावर हल्ला कर.


गिलआद येथील तिश्बे नगरातील उपरी म्हणून राहणाऱ्यापैकी एलीयाह तिश्बे अहाबाला म्हणाला, “याहवेह, इस्राएलचे जिवंत परमेश्वर ज्यांची मी सेवा करतो त्यांची शपथ, मी सांगितल्याशिवाय येणार्‍या काही वर्षांमध्ये दहिवर किंवा पाऊस पडणार नाही.”


म्हणून एलीयाह अहाबासमोर हजर झाला. याकाळात शोमरोनामध्ये अतिशय तीव्र दुष्काळ पडला होता,


शोमरोन शहरात फार मोठा दुष्काळ पडला; वेढा इतका काळ राहिला की गाढवाचे मुंडके चांदीच्या ऐंशी शेकेलला आणि कबुतराची एक पावशेर विष्ठा पाच शेकेलला विकली गेली.


अलीशाने ज्या स्त्रीच्या मुलास जिवंत केले होते, तिला म्हणाला, “तुझ्या कुटुंबीयांनी घेऊन निघून जा आणि जिथे तुला राहता येईल तिथे राहा, कारण याहवेह या भूमीवर मोठा दुष्काळ पाठविणार आहेत आणि तो सात वर्षे टिकणार आहे.”


मी परमेश्वराला म्हणेन: मला दोषी ठरवू नका, पण माझ्याविरुद्ध काय आरोप आहेत ते मला सांगा.


तुमच्याविषयी माझे अंतःकरण म्हणाले, “त्यांचे मुख शोध!” हे याहवेह, मी तुमचे मुख शोधेन.


आणि संकटकाळी माझा धावा कर; मी तुला संकटमुक्त करेन आणि तू माझे गौरव करशील.”


तो माझा धावा करेल, तेव्हा मी त्याला उत्तर देईन; त्याच्या संकटकाळी मी त्याच्याबरोबर असेन; मी त्याला सोडवेन आणि त्याचा सन्मान करेन.


मी तुमच्या भाकरीचा पुरवठा बंद करेन, तेव्हा दहा स्त्रिया एकाच चुलीवर भाकर भाजू शकतील आणि त्या भाकरीचे वजन करून देतील. तुम्ही खाल परंतु तृप्त होणार नाहीत.


त्याने एलअज़ार याजकापुढे उभे राहावे, जो याहवेहसमोर उरीमविषयी विचारेल. त्याच्या आज्ञेनुसार तो व सर्व इस्राएली समाज बाहेर जाईल व त्याच्या आज्ञेनुसार आत येतील.”


परंतु इस्राएली लोक समर्पित केलेल्या वस्तूंबाबतीत अविश्वासू होते; यहूदाह गोत्रातील जेरहाचा पुत्र जब्दी याचा पुत्र कर्मी, याचा पुत्र आखानाने त्यातील काही वस्तू घेतल्यामुळे याहवेहचा क्रोध इस्राएल राष्ट्राविरुद्ध भडकला.


आपण त्यांच्यासाठी असे करू या: आपण त्यांना जिवंत राहू देऊ, म्हणजे आपण त्यांना दिलेली शपथ मोडल्याबद्दल परमेश्वराचा क्रोध आपल्यावर येणार नाही.”


त्या दिवसांमध्ये जेव्हा शास्ते शासन करीत होते तेव्हा त्या प्रदेशात दुष्काळ पडला. म्हणून एक मनुष्य यहूदीयाच्या बेथलेहेम येथून त्याची पत्नी आणि दोन मुले यांच्यासह थोड्या काळासाठी मोआब देशात राहवयास गेला.


तेव्हा त्यांनी याहवेहला विचारले, “तो मनुष्य येथे आला आहे काय?” आणि याहवेह म्हणाले, “होय, त्याने स्वतःला सामानामध्ये लपविले आहे.”


कईलाहचे लोक मला त्याच्या स्वाधीन करतील काय? तुमच्या सेवकाने ऐकल्याप्रमाणे शौल इकडे येईल काय? याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, मी विनंती करतो, तुमच्या सेवकाला हे सांगा.” आणि याहवेहने उत्तर दिले, “तो येईल.”


तेव्हा त्याने याहवेहला विचारले, “मी तिकडे जाऊन पलिष्ट्यांवर हल्ला करू काय?” याहवेहने दावीदाला उत्तर दिले, “जा, पलिष्ट्यांवर हल्ला कर आणि कईलाहला वाचव.”


दावीदाने पुन्हा एकदा याहवेहला विचारले आणि याहवेहने त्याला उत्तर दिले, “कईलाहकडे जा, कारण पलिष्ट्यांना मी तुझ्या हाती देणार आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan