२ शमुवेल 20:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 दावीद जेव्हा यरुशलेमात त्याच्या राजवाड्यात परतला, तेव्हा त्याने राजवाड्याची व्यवस्था पाहण्यासाठी मागे ठेवलेल्या त्याच्या दहा उपपत्नींना घेऊन एका घरात देखरेखीत ठेवले आणि त्यांना सामुग्री पुरविली परंतु त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवले नाही. त्यांच्या मरणाच्या दिवसापर्यंत, विधवांप्रमाणे बंदिवासात ठेवले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 दावीद यरुशलेम येथे आपल्या मंदिरात आला आणि ज्या दहा उपपत्नी राजमंदिराच्या संरक्षणासाठी त्याने ठेवल्या होत्या त्यांना त्याने अटकेत ठेवून त्यांच्या उदरनिर्वाहाची तरतूद केली; पण त्याने त्यांच्याशी समागम केला नाही. त्या आमरण वैधव्यदशेत तशाच अटकेत राहिल्या. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 दावीद यरूशलेम येथील आपल्या घरी परतला. आपल्या दहा दासींना त्याने घराच्या निगराणीसाठी मागे ठेवले होते त्यांना त्याने एका खास घरात ठेवले. आणि त्यांच्यावर पहारा ठेवला. मरेपर्यंत या स्त्रिया तेथेच राहिल्या दावीदाने त्यांच्या उदरनिर्वाहाची सगळी नीट व्यवस्था केली पण पुन्हा त्यांच्याशी संबंध ठेवले नाहीत. त्यामुळे शेवटपर्यंत त्यांची स्थिती विधवेसारखी होती. Faic an caibideil |