Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 2:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 त्याने गिलआद, अशुरी, येज्रील आणि एफ्राईम, बिन्यामीन व सर्व इस्राएलवर त्याला राजा नेमले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 आणि त्याने गिलाद, अश्शूर्‍यांचा देश, इज्रेल, एफ्राईम, बन्यामीन वगैरे एकंदर इस्राएलावर त्याला राजा नेमले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 आणि त्याने ईश-बोशेथला गिलाद, अशेर, इज्रेल, एफ्राईम, बन्यामीन आणि सर्व इस्राएल यांच्यावर राजा म्हणून नेमले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 2:9
19 Iomraidhean Croise  

लेआने त्याचे नाव आशेर ठेवले. कारण ती म्हणाली. “मी किती आनंदी आहे! स्त्रिया मला धन्य म्हणतील.”


शौलाचा पुत्र इश-बोशेथ इस्राएल देशाचा राजा झाला तेव्हा तो चाळीस वर्षांचा होता आणि त्याने दोन वर्षे राज्य केले. मात्र यहूदाहचे गोत्र दावीदाशी एकनिष्ठ राहिले.


दावीद व शौल यांच्या घराण्यांमधील लढाईच्या काळात, अबनेर शौलाच्या घराण्यात आपले स्थान मजबूत करीत होता.


बिन्यामीनच्या म्हणजे शौलाच्या गोत्रातील 3,000, यातील बहुतेक या वेळेपर्यंत शौलाशा एकनिष्ठ राहिले होते;


एफ्राईमी, हे महान योद्धे आपआपल्या कुळांमध्ये नामांकित असे पुरुष 20,800;


गिलआद माझा आहे. मनश्शेह माझा आहे; एफ्राईम माझे शिरस्त्राण आहे, यहूदाह माझा राजदंड आहे.


आशेरच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.


एफ्राईमच्या गोत्राची त्यांच्या कुळानुसार ही सीमा होती: त्यांच्या वतनाची सीमा पूर्वेतील अटारोथ-अद्दार येथून बेथ-होरोनचा वरील भाग


तप्पूआहपासून ही सीमा पश्चिम दिशेस कानाहा ओहोळावरून जाऊन भूमध्य समुद्रापर्यंत संपते. एफ्राईम गोत्रास त्यांच्या कुळानुसार मिळालेले वतन हे होते.


मनश्शेहच्या वतनातील काही नगरे आणि त्यांची गावे सुद्धा एफ्राईमचे वतन म्हणून वेगळी करून ठेवण्यात आली होती.


योसेफाचा प्रथमपुत्र म्हणून मनश्शेहच्या गोत्राला देण्यात आलेला वाटा हा होता. गिलआदाचा पूर्वज माखीर, मनश्शेहच्या प्रथमपुत्राला गिलआद व बाशान हे मिळाले कारण माखीरी लोक महान योद्धे होते.


बिन्यामीन गोत्राच्या कुळानुसार पहिली चिठ्ठी निघाली. त्यांच्या वाट्याला आलेला भाग यहूदाह आणि योसेफाच्या गोत्रातील प्रांतांच्या दरम्यान होता.


पूर्वेकडील सीमा यार्देन नदी होती. बिन्यामीनच्या कुळांना मिळालेल्या वतनाच्या चारही बाजूने या सीमा होत्या.


त्यांच्या सीमेमध्ये या नगरांचा समावेश होता: येज्रील, कसुल्लोथ, शूनेम,


तेव्हा रऊबेनचे गोत्र, गादचे गोत्र आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी गिलआद, जो प्रदेश त्यांना याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेकडून मिळाला होता, त्याकडे परत जाताना कनानातील शिलोह येथे इस्राएली लोकांचा निरोप घेतला.


आशेरी लोक त्या देशात राहणार्‍या कनानी लोकांमध्ये राहत होते, कारण त्यांनी त्यांना हाकलून दिले नाही.


पलिष्ट्यांनी त्यांचे सर्व सैन्य अफेक येथे जमविले आणि इस्राएली सैन्याने त्यांची छावणी येज्रीलच्या झर्‍याजवळ दिली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan