Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 2:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तेव्हा यहूदीयातील माणसे हेब्रोनास आली व तिथे त्यांनी दावीदाचा यहूदाहच्या गोत्राचा राजा म्हणून अभिषेक केला. जेव्हा दावीदाला सांगण्यात आले की, ज्या लोकांनी शौलाला पुरले ते याबेश-गिलआदचे लोक होते,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 यहूदी लोकांनी तेथे जाऊन दाविदाला अभिषेक करून यहूदाच्या वंशाचा राजा नेमले. दाविदाला त्यांनी सांगितले की, “शौलाला ज्यांनी मूठमाती दिली ते याबेश-गिलादाचे लोक होते.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 यहूदा येथील लोक मग हेब्रोनला आले आणि त्यांनी दावीदाला अभिषेक करून यहूदाचा राजा म्हणून घोषित केले. ते मग त्यास म्हणाले, “याबेश गिलाद देशाच्या लोकांनी शौलाला पुरले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 2:4
16 Iomraidhean Croise  

दावीद राजाने सादोक आणि अबीयाथार याजकांना निरोप पाठवला: “यहूदीयाच्या वडीलजनांना विचारा, ‘जे सर्व इस्राएलात बोलले जात आहे ते राजाच्या कानी आले आहे, तर राजाला त्याच्या राजवाड्यात आणण्यास तुम्ही सर्वात शेवटचे का आहात?


यहूदीयाच्या सर्व लोकांनी इस्राएली लोकांना उत्तर दिले, “आम्ही असे केले, कारण राजा आमचा जवळचा नातेवाईक आहे. तुम्हाला त्याविषयी का राग यावा? राजाच्या सामुग्रीतील आम्ही काही खाल्ले आहे काय? आमच्यासाठी आम्ही काही घेतले आहे काय?”


हेब्रोनात यहूदीयावर दावीदाने राज्य केले त्याचा कालावधी सात वर्षे व सहा महिने होता.


तर आता हिंमत ठेवा आणि धैर्य धरा, कारण शौल तुमचा धनी मरण पावला आहे आणि यहूदीयाच्या लोकांनी त्यांचा राजा म्हणून माझा अभिषेक केला आहे.”


अय्याहची कन्या रिजपाह, जी शौलाची उपपत्नी होती तिने जे केले ते दावीदाला कळले,


दावीद गेला आणि याबेश-गिलआद येथील नागरिकांकडून शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्या अस्थी घेतल्या. (त्यांनी त्यांची शरीरे बेथ-शान नगराच्या चौकातून चोरली होती, जिथे पलिष्ट्यांनी शौलाला गिलबोआत मारून टाकल्यानंतर त्यांना तिथे टांगले होते.)


इस्राएलवर राजा म्हणून दावीदाचा अभिषेक झाला आहे असे पलिष्ट्यांनी जेव्हा ऐकले, तेव्हा ते त्याला शोधण्यासाठी आपले सर्व सैन्य घेऊन निघाले, परंतु दावीदाने याबद्दल ऐकले तेव्हा तो खाली गडाकडे गेला.


जेव्हा इस्राएलचे सर्व वडील लोक हेब्रोनात दावीद राजाकडे आले, तेव्हा राजाने त्यांच्याशी याहवेहसमोर हेब्रोन येथे एक करार केला आणि त्यांनी दावीदाला इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला.


त्याने हेब्रोन येथून यहूदीयावर सात वर्षे आणि सहा महिने राज्य केले आणि सर्व इस्राएल व यहूदाह यांच्यावर यरुशलेमात तेहतीस वर्षे राज्य केले.


मग यहोयादाने राजाच्या पुत्राला बाहेर आणले, त्याच्या शिरावर राजमुकुट ठेवला; त्याच्या हातामध्ये कराराची प्रत दिली आणि त्याला राजा म्हणून घोषित केले. मग त्यांनी त्याला अभिषेक केला आणि लोकांनी टाळ्या वाजविल्या व मोठ्याने जयघोष करून ते म्हणाले, “राजा चिरायू होवो!”


पलिष्टी लोकांनी शौलाचे काय केले हे जेव्हा याबेश-गिलआदच्या रहिवाशांनी ऐकले,


जेव्हा इस्राएलचे सर्व वडील लोक हेब्रोनात दावीद राजाकडे आले होते, तेव्हा त्याने याहवेहसमोर हेब्रोन येथे त्यांच्याशी एक करार केला आणि त्यांनी दावीदाचा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला, जसे याहवेहने शमुवेलद्वारे वचन दिले होते.


दावीद हेब्रोन येथे असताना, त्याला अनेक कसलेले योद्धे येऊन मिळाले. याहवेहने वचन दिल्याप्रमाणे दावीदाला शौलाच्या जागी राजा होण्यास मदत करावी या उद्देशाने ते आले होते.


तेव्हा शमुवेलने तेलाचे शिंग घेतले व त्याच्या भावांदेखत दावीदाचा अभिषेक केला आणि त्या दिवसापासून याहवेहचा आत्मा सामर्थ्याने दावीदावर आला. नंतर शमुवेल रामाह येथे परत गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan