Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 19:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 “अबशालोमसाठी राजा रडत आहे आणि शोक करीत आहे हे योआबाला सांगण्यात आले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 “अबशालोमासाठी राजा विलाप करीत आहे” असे यवाबाच्या कानी आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 लोकांनी ही बातमी यवाबाला सांगितली. ते त्यास म्हणाले, राजा अबशालोमसाठी शोक करत आहे. तो फार दु:खात आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 19:1
9 Iomraidhean Croise  

त्याचे सर्व पुत्र आणि कन्या आले आणि त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तो म्हणत असे, “मी पुत्र शोकानेच मरेन आणि अधोलोकी आपल्या मुलाकडे जाईन.” अशा रीतीने तो त्याच्यासाठी दुःखाने रडत असे.


पण त्या मनुष्याने योआबाला उत्तर दिले, “जरी माझ्या हातावर चांदीची हजार शेकेल वजन करून ठेवली, तरी मी राजपुत्रावर हात टाकणार नाही. कारण राजाने तुला, अबीशाईला व इत्तयला आज्ञा देताना आम्ही असे ऐकले की, ‘माझ्यासाठी तरुण अबशालोमचे रक्षण करा.’


योआब म्हणाला, “मी असा तुझ्यासाठी थांबणार नाही.” असे म्हणत त्याने आपल्या हाती तीन भाले घेतले आणि अबशालोम एलाच्या झाडाला अजूनही जिवंत असा लटकलेला असताना त्याने त्याच्या छातीत ते भोसकले.


पण योआब त्याला म्हणाला, “तू आज ही बातमी घेऊन जाणार नाहीस, तू ही बातमी दुसर्‍या एखाद्या दिवशी घेऊन जा, परंतु आज ती तू नेऊ नये, कारण राजाचा पुत्र मेला आहे.”


तेव्हा राजा हादरून गेला. तो वरती दरवाज्यावरील खोलीत गेला आणि रडला! “माझ्या मुला, माझ्या मुला अबशालोमा! तुझ्या ऐवजी मी मेलो असतो—अरे माझ्या पुत्रा अबशालोमा, माझ्या पुत्रा!”


राजाने योआब, अबीशाई व इत्तय यांना आज्ञा दिली, “माझ्यासाठी त्या तरुण अबशालोमशी सौम्यतेने वागा.” राजाने अबशालोमविषयी प्रत्येक सेनापतीला दिलेली ही आज्ञा सर्व सैनिकांनी ऐकली.


आणि त्या दिवशी संपूर्ण सैन्याचा विजय, शोकात बदलला, कारण त्या दिवशी त्या सैन्याने ऐकले, “राजा आपल्या पुत्रासाठी शोक करीत आहे.”


मूर्ख मुलगा आपल्या वडिलांच्या दुःखास कारणीभूत होतो, आणि ज्या आईने त्याला जन्म दिला तिला क्लेश देतो.


“मग मी दावीदाच्या घराण्यावर व यरुशलेमच्या सर्व रहिवाशांवर कृपेचा आणि विनंतीचा आत्मा ओतेन आणि ज्याला त्यांनी भोसकले त्या माझ्याकडे ते पाहतील आणि एकुलत्या एका पुत्रासाठी करावा, तसा ते त्याच्यासाठी शोक करतील आणि प्रथम पुत्रासाठी करावा, तसा ते त्याच्यासाठी विलाप करतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan