Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 18:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 दावीदाने एकतृतीयांश लोक योआबाच्या हाताखाली, एकतृतीयांश सैन्य योआबाचा भाऊ, जेरुइयाहचा पुत्र अबीशाईच्या हाताखाली आणि एकतृतीयांश इत्तय गित्तीच्या हाताखाली असे आपले सैन्य पाठवले. राजाने सैन्यास सांगितले, “मी स्वतः अवश्य तुम्हाबरोबर चालत जाईन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 मग दाविदाने एक तृतीयांश लोक यवाबाच्या ताब्यात दिले; एक तृतीयांश लोक यवाबाचा भाऊ अबीशय जो सरूवेचा पुत्र होता त्याच्या व बाकीचे एक तृतीयांश लोक इत्तय गित्तीच्या ताब्यात दिले; व त्यांना युद्धासाठी पाठवले, आणि राजाने लोकांना सांगितले, “मीही अवश्य तुमच्याबरोबर येतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 सर्वांची त्याने तीन गटात विभागणी केली. यवाब, अबीशय यवाबाचा भाऊ आणि सरुवेचा मुलगा आणि गथ येथील इत्तय या तिघांना एकेक गटाचे प्रमुख म्हणून नेमले आणि सर्वांची रवानगी केली. तेव्हा राजा दावीद त्यांना म्हणाला, मी ही तुमच्याबरोबर येतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 18:2
14 Iomraidhean Croise  

“म्हणून मी तुला सल्ला देतो: दानपासून बेअर-शेबापर्यंत असलेल्या सर्व असंख्य इस्राएली लोकांना समुद्रकिनाऱ्यावरील वाळूप्रमाणे तुझ्याकडे गोळा कर, आणि तू स्वतः युद्धाचे नेतृत्व कर.


परंतु जेरुइयाहचा पुत्र अबीशाई दावीदाचा बचाव करण्यासाठी आला; त्याने त्या पलिष्ट्यावर हल्ला केला आणि त्याला ठार मारले. तेव्हा दावीदाच्या लोकांनी दावीदाला शपथ घेत सांगितले, “येथून पुढे पुन्हा आपण आमच्याबरोबर युद्धासाठी येणार नाही, म्हणजे इस्राएलचा दिवा विझणार नाही.”


जेरुइयाहचा पुत्र योआबचा भाऊ अबीशाई हा तिघांचा प्रमुख होता. त्याने आपला भाला तीनशे लोकांवर उगारून त्यांना मारून टाकले होते, म्हणून तो या तिघांप्रमाणेच प्रसिद्ध झाला होता.


जेरुइयाहचा पुत्र योआब सर्व सैन्याचा सेनापती होता; आणि अहीलुदचा पुत्र यहोशाफाट हा नोंदणी करणारा होता.


जेव्हा योआबाला ही बातमी कळली, तो याहवेहच्या मंडपाकडे पळून गेला आणि वेदीवरील शिंगे धरून राहिला. अबशालोमसोबत तो जरी मिळाला नव्हता तरीही अदोनियाहसोबत त्याने कट रचला होता.


असंख्य मला चहूबाजूंनी वेढतील, तरी मला मुळीच भीती वाटणार नाही.


मग गिदोनाने आपल्या तीनशे सैनिकांच्या तीन तुकड्या केल्या आणि प्रत्येकाला एक रणशिंग व मातीचे एक रिकामे मडके दिले, त्या मडक्यात एकेक मशाल होती.


गिदोन आणि त्याच्या बरोबरची शंभर माणसे मध्य पहाटेच्या सुरुवातीला पहारा बदलल्यानंतर छावणीच्या टोकाला पोहोचले. त्यांनी रणशिंग फुंकले आणि त्यांच्या हातातील मडके फोडले.


म्हणून त्याने लोक घेतले, त्यांना तीन तुकड्या मध्ये विभाजित केले व ते शेतांमध्ये दबा धरून बसले. जेव्हा त्याने पहिले की लोक शहरातून बाहेर येत आहेत, तेव्हा त्याने उठून त्यांच्यावर हल्ला केला.


दुसर्‍या दिवशी शौलाने आपल्या लोकांना तीन भागांमध्ये विभागले; रात्रीच्या शेवटच्या प्रहरी ते अम्मोन्यांच्या छावणीत घुसले आणि सूर्य तापेपर्यंत त्यांना मारून टाकले. जे वाचले त्यातील दोन व्यक्तीही एकत्र येणार नाही असे विखरून गेले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan