२ शमुवेल 16:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जेव्हा दावीद डोंगराच्या माथ्यावर काही अंतरावर गेला, तिथे मेफीबोशेथचा कारभारी सीबा त्याला भेटण्यासाठी तिथे वाट पाहत होता. त्याच्याकडे खोगीर घातलेली गाढवे व त्यांच्यावर दोनशे भाकरी, मनुक्यांच्या शंभर ढेपा, अंजिराच्या शंभर ढेपा आणि द्राक्षारसाचा एक बुधला होता. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 दावीद डोंगराच्या माथ्यावरून पलीकडे गेला तेव्हा त्याला मफीबोशेथाचा चाकर सीबा हा भेटला; खोगीर घातलेली दोन गाढवे व त्यांच्यावर दोनशे भाकरी, खिसमिसांचे शंभर घड, अंजिराच्या शंभर ढेपा व द्राक्षारसाचा एक बुधला अशी सामग्री त्याच्याजवळ होती. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 डोंगरमाथ्याच्या थोडे पुढे गेल्यावर, मफीबोशेथाचा सेवक सीबा दावीदाला भेटला. सीबाजवळ खोगीर घातलेली दोन गाढवे होती दोनशे भाकरी, किसमिसाचे शंभर घड, अंजिरांच्या शंभर ढेपा आणि द्राक्षरसाचा बुधला एवढे सामान गाढवांवर लादलेले होते. Faic an caibideil |
शेजारच्या लोकांनी म्हणजे इस्साखार, जबुलून व नफताली प्रांतांपर्यंत जे राहत होते, त्यांनी भाकरीचे पीठ, अंजिरांच्या ढेपा, खिसमिसांचे घड, द्राक्षारस, तेल इत्यादी खाण्याच्या वस्तू गाढवे, उंट खेचरे व बैल यांच्यावर लादून आणल्या होत्या. त्याचप्रमाणे असंख्य बैल व शेरडेमेंढरे पण आणली होती. कारण इस्राएलात सर्वत्र आनंदोत्सव साजरा होत होता.