Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 15:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तो सकाळी लवकर उठत असे आणि शहराच्या वेशीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला थांबत असे. जेव्हा कोणी राजाकडे तक्रार आणत असे तेव्हा अबशालोम त्याला बोलावून विचारत असे, “तू कोणत्या नगराचा आहेस?” तो उत्तर देत असे, “आपला सेवक इस्राएलातील गोत्रांपैकी एका गोत्राचा आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 अबशालोम नित्य पहाटेस उठून वेशीकडे जाणार्‍या रस्त्यात उभा राही आणि कोणी फिर्यादी दाद मागण्यासाठी राजाकडे आला म्हणजे त्याला बोलावून “तू कोणत्या नगराचा आहेस,” असे विचारी; तेव्हा तो म्हणे, “तुझा दास इस्राएलाच्या अमुक अमुक वंशातला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 रोज लवकर ऊठून सकाळीच तो वेशीपाशी जाई. आपल्या अडचणी घेऊन निवाड्यासाठी राजाकडे जायला निघालेल्या लोकांस भेटून त्यांच्याशी बोलत असे. चौकशी करून तो विचारी, तू कोणत्या शहरातून आलास? तो सांगत असे, मी इस्राएलच्या अमुक वंशातला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 15:2
13 Iomraidhean Croise  

म्हणून हमोर आणि शेखेम यांनी त्या शहरातील वेशीकडे जाऊन लोकांपुढे सुंतेची ही सूचना मांडली.


तेव्हा राजा उठला आणि शहराच्या वेशीकडे आपल्या स्थानी जाऊन बसला. जेव्हा माणसांना सांगण्यात आले, “राजा वेशीकडे बसला आहे,” तेव्हा ते सर्वजण त्याच्यासमोर आले. या दरम्यान इस्राएली लोक त्यांच्या घरांकडे पळून गेले.


त्यांनी उत्तर दिले, “जर तुम्ही या लोकांना दया दाखविली आणि त्यांना संतुष्ट केले व त्यांना अनुकूल उत्तर दिले, तर ते नेहमीच तुमचे सेवक म्हणून राहतील.”


दिवस मावळला म्हणजे हत्यारा सज्ज होतो, गरीब आणि गरजवंतांना तो ठार करतो, आणि रात्रीच्या वेळी चोरासारखी चोरी करतो.


जेव्हा मोशे लोकांसाठी जे सर्व करीत होता ते त्याच्या सासर्‍याने पाहिले, तो म्हणाला, “हे तू लोकांसाठी काय करीत आहेस? तू एकटाच न्यायाधीश म्हणून का बसतोस व ते सर्व लोक दिवसभर तुझ्याभोवती उभे असतात?”


जेव्हा त्यांच्यात वाद होतात, ते माझ्याकडे आणतात आणि मी त्यांचा निर्णय करतो आणि त्यांना परमेश्वराचे विधी व नियम याबद्दल सांगतो.”


त्यांनी सर्व समयी लोकांचे न्यायाधीश म्हणून सेवा केली. अवघड वाद त्यांनी मोशेकडे आणले, परंतु साधेसरळ वाद त्यांनीच सोडविले.


कारण दुष्कर्म केल्याशिवाय ते स्वस्थ राहू शकत नाहीत; कोणाला तरी अडखळून पाडल्याशिवाय त्यांना झोप येत नाही.


“त्याच्या जागी असा नीच मनुष्य येईल ज्याला राजघराण्याचा मान मिळालेला नाही. जेव्हा जनतेला सुरक्षित वाटत असेल, तेव्हाच तो राज्यावर आक्रमण करेल आणि कट रचून राज्य आपल्या ताब्यात घेईल.


प्रातःकाळ झाल्यावर सर्व महायाजक आणि लोकांच्या वडीलजनांनी येशूंचा वध कसा करता येईल याची योजना केली.


तुमच्या न्यायालयात खटले येतात, ज्यांचा निवाडा करण्याचे काम तुमच्या आवाक्याबाहेरचे असेल—मग ते रक्तपात असो, फिर्याद अथवा मारामारी असोत—याहवेह तुमच्या परमेश्वराने निवडलेल्या स्थानी तुम्ही तो वाद न्यावा.


त्या दरम्यान बवाज नगराच्या वेशीकडे गेला आणि तो तिथे बसला असताना तो सोडवणूक करणारा, ज्याच्याबद्दल त्याने सांगितले होते, तो मनुष्य पुढे आला. तेव्हा बवाज त्याला म्हणाला, “माझ्या मित्रा, इकडे ये आणि इथे बस.” तेव्हा तो तिकडे गेला आणि बसला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan