Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 15:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 त्यानंतरच्या काळात, अबशालोमने स्वतःसाठी एक रथ आणि घोडे आणि त्याच्यापुढे धावण्यासाठी पन्नास माणसे ठेवली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 ह्यानंतर असे झाले की अबशालोमाने आपल्यासाठी रथ, घोडे व आपल्यापुढे दौडण्यासाठी पन्नास माणसे ठेवली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 यानंतर अबशालोमने स्वत:साठी रथ आणि घोड्यांची तयारी केली, तो रथातून जात असताना पन्नास माणसे त्याच्यापुढे धावत असत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 15:1
11 Iomraidhean Croise  

त्यावेळी अदोनियाह, ज्याच्या आईचे नाव हग्गीथ होते, त्याने स्वतःला पुढे करीत म्हटले, “मी राजा होणार.” म्हणून त्याने रथ आणि घोडे तयार केले आणि त्याच्यापुढे धावण्यासाठी पन्नास माणसे घेतली.


कोणी रथांवर आणि कोणी घोड्यांवर भरवसा ठेवतात, परंतु आम्ही याहवेह आमच्या परमेश्वराच्या नावावर भरवसा ठेऊ.


“याहवेह असे म्हणतात: ‘तुझ्याच घराण्यातून मी तुझ्यावर अरिष्ट आणणार आहे. तुझ्या डोळ्यांसमोर मी तुझ्या स्त्रिया घेऊन तुझ्या जिवलगाला देईन आणि तो दिवसाच्या प्रकाशात तुझ्या स्त्रियांशी संबंध ठेवील.


शमुवेल म्हणाला, “जो राजा तुमच्यावर राज्य करेल तो या गोष्टी तुमच्याकडून हक्काने मागेल: तो तुमचे पुत्र घेईल आणि त्यांना त्याचे रथ आणि घोडे यांच्याबरोबर सेवा करावयास लावील आणि ते त्याच्या रथांच्या पुढे धावतील.


जो कोणी कलहप्रिय असतो तो पापाची आवड धरतो; जो कोणी उंच प्रवेशद्वार बांधतो तो आपत्तींना आमंत्रण देतो.


नाशापूर्वी गर्व आणि अधःपातापूर्वी मग्रूरी येते.


जेव्हा गर्विष्ठपणा येतो, तेव्हा अप्रतिष्ठा येते, परंतु विनम्रपणामुळे सुज्ञता प्राप्त होते.


राजाने त्यांना म्हटले: “आपल्या धन्याचे सेवक तुमच्यासोबत घ्या आणि माझा पुत्र शलोमोन याला माझ्या खेचरावर बसवून त्याला गीहोन येथे घेऊन जा.


राजाने स्वतःसाठी घोड्यांचा मोठा संग्रह करू नये किंवा त्याने आपल्यासाठी अधिक घोडे आणण्यासाठी आपली माणसे इजिप्त देशात पाठवू नये, कारण “तुम्ही त्या मार्गाने परत जाऊ नये,” असे याहवेहने तुम्हाला सांगितले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan