Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 13:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 नंतर तिने ताट घेतले आणि त्याला भाकर वाढली परंतु त्याने खाण्यास नकार दिला. अम्नोन म्हणाला, “प्रत्येकाला येथून बाहेर घालवून द्या.” तेव्हा प्रत्येकजण त्याच्यापासून निघून गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तिने त्याच्यापुढे ताट मांडून त्यात त्या वाढल्या, पण तो त्या काही केल्या खाईना. अम्नोन म्हणाला, “माझ्याजवळच्या सर्व लोकांना बाहेर घालवा.” तेव्हा सर्व लोक तेथून निघून गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 पोळ्या तयार झाल्यावर तव्यावरून काढून तिने त्या अम्नोनासाठी ताटात वाढल्या. पण अम्नोन ते काही केल्या खाईना मग आपल्या नोकारांना त्याने बाहेर निघून जाण्याची आज्ञा देऊन तिथून घालवले. सर्व नोकर बाहेर पडले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 13:9
5 Iomraidhean Croise  

आता मात्र आपल्या सेवकांसमोर योसेफाचा भावनावेग अनावर झाला आणि तो मोठ्याने ओरडला, “सगळ्यांनी माझ्या समक्षतेतून बाहेर जावे!” योसेफाने तिथे कोणी नसताना स्वतःला आपल्या भावांसमोर प्रगट केले.


नंतर अम्नोन तामारला म्हणाला, “भाकरी माझ्या झोपण्याच्या खोलीकडे घेऊन ये म्हणजे मी तुझ्या हाताने ती खाईन.” तेव्हा तिने बनविलेल्या भाकरी घेऊन तामार आपला भाऊ अम्नोनच्या खोलीकडे आली.


तेव्हा तामार तिचा भाऊ अम्नोन याच्या घरी गेली, तो तर बिछान्यावर पडून होता. तिने थोडे पीठ घेतले, ते मळले, आणि त्याच्या दृष्टीसमोर भाकरी तयार केल्या आणि त्या भाजल्या.


दुष्कृत्ये करणारा प्रत्येकजण प्रकाशाचा द्वेष करतो आणि प्रकाशाकडे येत नाही, कारण आपली दुष्कृत्ये प्रकट होतील अशी त्याला भीती वाटते.


परंतु गिलगालजवळील दगडी मूर्तीजवळ पोहोचल्यावर तो स्वतः एग्लोनकडे परत गेला आणि म्हणाला, “महाराज, माझ्याकडे तुमच्यासाठी एक गुप्त संदेश आहे.” राजा आपल्या सेवकांना म्हणाला, “आम्हाला एकटे सोडा!” आणि ते सर्व निघून गेले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan