२ शमुवेल 13:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 यहोनादाब म्हणाला, “तुझ्या पलंगावर जा आणि आजारी असल्याचे ढोंग कर, जेव्हा तुझे वडील तुला पाहायला येतील, तेव्हा त्यांना सांग, ‘माझी बहीण तामारने माझ्याकडे येऊन मला काहीतरी खावयास द्यावे. तिने ते भोजन माझ्या दृष्टीसमोर तयार करावे म्हणजे मी तिला पाहीन आणि नंतर ते तिच्या हातून खाईन.’ ” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 योनादाब त्याला म्हणाला, “तू आपल्या पलंगावर निजून आजार्याचे मिष कर, व तुझा पिता तुझा समाचार घेण्यास आला म्हणजे तू त्याला सांग, कसेही करून माझी बहीण तामार हिने येऊन मला अन्न भरवावे, तिने ते अन्न माझ्यादेखत तयार करावे म्हणजे मी ते प्रत्यक्ष पाहून तिच्या हातून खाईन.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 योनादाब यावर अम्नोनाला म्हणाला, आता तू आजारी पडल्याचे सोंग कर आणि झोपून जा. मग वडील भेटायला आले की त्यांना सांग, तामारला माझ्याकडे येऊ द्या. तिने मला खायला घालू द्या. माझ्या समोरच तिला एखादा खाद्य पदार्थ तयार करू द्या. मग तो तिच्या हातून मी खाईन. Faic an caibideil |