Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 13:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 त्याने अम्नोनास विचारले, “तू जो राजाचा पुत्र असून दिवसेंदिवस असा क्षीण का दिसतोस? तू मला सांगणार नाहीस काय?” तेव्हा अम्नोन त्याला म्हणाला, “माझा भाऊ अबशालोम याची बहीण तामारवर मी प्रेम करतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तो अम्नोनाला म्हणाला, “राजकुमारा, तू दिवसानुदिवस असा क्षीण का होत चालला आहेस? मला नाही का सांगणार?” अम्नोनाने त्याला उत्तर दिले, “माझा बंधू अबशालोम ह्याची बहीण तामार हिच्यावर माझे मन बसले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तो अम्नोनाला म्हणाला, दिवसें दिवस तू क्षीण होत चालला आहेस. तू तर राजपुत्र! खायची प्यायची रेलचेल असताना तू असा अशक्त का होत आहेस? माझ्यापाशी मनमोकळे कर. तेव्हा अम्नोन योनादाबाला म्हणाला, माझे तामार वर प्रेम आहे, पण ती माझा सावत्र भाऊ अबशालोमची बहीण आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 13:4
11 Iomraidhean Croise  

दावीदाचा भाऊ शिमिआह, याचा पुत्र योनादाब अम्नोनाचा सल्लागार असून अतिशय धूर्त होता.


यहोनादाब म्हणाला, “तुझ्या पलंगावर जा आणि आजारी असल्याचे ढोंग कर, जेव्हा तुझे वडील तुला पाहायला येतील, तेव्हा त्यांना सांग, ‘माझी बहीण तामारने माझ्याकडे येऊन मला काहीतरी खावयास द्यावे. तिने ते भोजन माझ्या दृष्टीसमोर तयार करावे म्हणजे मी तिला पाहीन आणि नंतर ते तिच्या हातून खाईन.’ ”


तेव्हा त्याची पत्नी ईजबेल आत आली व त्याला विचारले, “तुम्ही इतके खिन्न का आहात? तुम्ही अन्न का खात नाही?”


त्याची पत्नी ईजबेल म्हणाली, “इस्राएलचा राजा असताना तुमचे वर्तन असे असावे काय? उठा आणि भोजन करा! आपले मन आनंदित करा. येज्रीली नाबोथचा द्राक्षमळा मी तुम्हाला मिळवून देईन.”


त्यांच्या चेहऱ्यावरील भाव त्यांच्याच विरोधात साक्ष देतात; त्यांच्या पापांचे ते सदोम नगरीप्रमाणे प्रदर्शन करतात; ते लपवित नाहीत. त्यांचा धिक्कार असो! त्यांनीच स्वतःवर आपत्ती ओढवून घेतली आहे.


त्यांना त्यांच्या वाईट कृत्याबद्दल लाज वाटते का? नाही, त्यांना मुळीच लज्जा वाटत नाही; लाज वाटणे म्हणजे काय असते हे त्यांना माहीतच नाही. म्हणून ते पतन पावलेल्या लोकांमध्ये पतन पावतील; त्यांना शिक्षा मिळेल तेव्हा त्यांचे पतन होईल, असे याहवेह म्हणतात.


“ ‘तुझ्या बहिणीशी शारीरिक संबंध तू ठेवू नकोस, तुझ्या वडिलांची कन्या असो किंवा तुझ्या आईची कन्या, मग ती एकाच घरात जन्मली असेल किंवा इतरत्र.


“ ‘एखाद्या व्यक्तीने आपल्या बहिणीबरोबर मग ती त्याच्या पित्याची किंवा आईची कन्या असो, विवाह केला आणि त्यांनी शारीरिक संबंध ठेवले, तर ते अपमानास्पद आहे. त्यांना जाहीरपणे लोकांमधून काढून टाकावे. कारण त्याने आपल्या बहिणीचा अपमान केला आहे आणि त्यासाठी तोच जबाबदार राहील.


वाईट करण्यात दोन्ही हात निपुण आहेत; शासक भेटवस्तूंची मागणी करतो, न्यायाधीश लाच घेतात, सामर्थ्यवान लोक बळजबरीने त्यांच्या इच्छा पूर्ण करतात; ते सर्व मिळून कट रचतात.


“हे लहान कळपा, तू भिऊ नकोस कारण तुम्हाला राज्य देण्यास पित्याला आनंद होतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan