Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 13:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 काही काळानंतर, दावीदाचा पुत्र अम्नोन हा तामार, जी दावीदाचा पुत्र अबशालोम याची सुंदर बहीण होती, तिच्या प्रेमात पडला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 ह्यानंतर असे झाले की दाविदाचा पुत्र अबशालोम ह्याची एक सुंदर बहीण होती, तिचे नाव तामार; दाविदाचा पुत्र अम्नोन हा तिच्यावर मोहित झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 दावीदाचा मुलगा अबशालोम याला तामार नावाची बहीण होती. ती दिसायला फार सुदंर होती. दावीदाला अम्नोन नावाचा आणखी एक मुलगा होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 13:1
15 Iomraidhean Croise  

याकोबाचे राहेलवर प्रेम बसले होते, म्हणून तो म्हणाला, “मला तुमची धाकटी मुलगी राहेल पत्नी म्हणून द्याल, तर मी तुमच्यासाठी सात वर्षे काम करेन.”


याप्रमाणे याकोबाने राहेलकरिता पुढील सात वर्षे काम केले. परंतु त्याचे तिच्यावर इतके प्रेम होते की, ही वर्षे त्याला काही दिवसांप्रमाणे भासली.


याकोबाची मुलगी दीना हिच्यावर त्याचे हृदय आकर्षित झाले; त्याने त्या तरुण स्त्रीवर प्रेम केले आणि तो कोमलतेने तिच्याशी बोलला.


परमेश्वराच्या पुत्रांनी बघितले की मानवाच्या कन्या सुंदर आहेत; आणि आपल्या आवडीप्रमाणे त्यांनी त्यांच्याशी विवाह केला.


एके संध्याकाळी दावीद त्याच्या बिछान्यावरून उठला आणि आपल्या राजवाड्याच्या गच्चीवर फिरू लागला. गच्चीवरून त्याने एका स्त्रीला स्नान करताना पाहिले. ती स्त्री फार सुंदर होती,


नंतर अम्नोनाला तिचा तीव्र तिरस्कार वाटू लागला. वास्तविकता त्याने तिच्यावर जितके प्रेम केले होते, त्यापेक्षाही त्याला अधिक तिचा तिरस्कार वाटला. नंतर अम्नोन तिला म्हणाला, “ऊठ आणि चालती हो!”


अम्नोन त्याच्या बहिणीच्या प्रेमात इतका वेडा झाला की, तो आजारी पडला. तामार कुमारी होती आणि तिच्याशी काही करणे हे त्याला अशक्य होते.


अबशालोमास तीन पुत्र व एक कन्या झाली. त्याच्या कन्येचे नाव तामार असे होते. ती फार सुंदर होती.


शलोमोन राजा, फारोहच्या कन्येशिवाय मोआबी, अम्मोनी, एदोमी, सीदोनी व हिथी या परदेशीय स्त्रियांवर देखील प्रेम करत होता.


तिसरा पुत्र अबशालोम हा गशूरचा राजा तलमयची कन्या माकाहपासून झाला. चौथा पुत्र अदोनियाह हग्गीथपासून जन्मला.


या यादीमध्ये त्याला त्याच्या उपपत्नींपासून झालेल्या पुत्रांचा समावेश केलेला नाही. दावीदाला तामार नावाची एक कन्याही होती.


मोहकपणा फसवा असू शकतो आणि सौंदर्य टिकाऊ नसते, परंतु याहवेहचे भय बाळगून त्यांचा आदर करणारी स्त्री प्रशंसनीय असते.


तू मनात तिच्या सौंदर्याबद्दल वासना बाळगू नकोस, किंवा तिच्या नेत्रकटाक्षांमुळे तिला वश होऊ नकोस.


Lean sinn:

Sanasan


Sanasan