Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 12:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 नंतर याहवेहनी नाथानला दावीदाकडे पाठवले. जेव्हा नाथान त्याच्याकडे आला, तो म्हणाला, “एका शहरात दोन माणसे राहत होती, एक श्रीमंत होता तर दुसरा गरीब.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मग परमेश्वराने नाथानाला दाविदाकडे पाठवले. तो त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “एका नगरात दोन माणसे राहत होती; त्यांतला एक श्रीमंत व दुसरा गरीब होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परमेश्वराने नाथानाला दावीदाकडे पाठवले. तेव्हा नाथान दावीदाकडे आला. नाथान म्हणाला, एका नगरात दोन माणसे होती एक श्रीमंत होता आणि एक गरीब.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 12:1
24 Iomraidhean Croise  

दावीदाने त्या संदेशवाहकाला म्हटले, “योआबाला सांग, ‘यामुळे तू निराश होऊ नकोस, कारण तलवार जसे एकाचा तसेच दुसर्‍याचाही नाश करते. त्या शहराविरुद्ध अधिक नेटाने हल्ला करा आणि त्याचा नाश करा.’ योआबाला उत्तेजित करण्यासाठी हे तू त्याला सांग.”


श्रीमंत माणसाजवळ पुष्कळ मेंढरे व गुरे होती,


जसे जमिनीवर सांडलेले पाणी पुन्हा गोळा करता येत नाही, तसेच आपणही मेले पाहिजे. परंतु परमेश्वराची तशी इच्छा नाही; तर घालवून दिलेला व्यक्ती कायमचा त्यांच्यापासून घालवून दिला जाऊ नये अशी योजना परमेश्वर करतात.


या संपूर्ण प्रकटीकरणातील प्रत्येक शब्द नाथानाने दावीदाला सांगितला.


परंतु सादोक याजक, यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, नाथान संदेष्टा, शिमी आणि रेई आणि दावीदाचा खास रक्षक हे अदोनियाहला मिळाले नाही.


याहवेहच्या वचनानुसार परमेश्वराचा एक मनुष्य यहूदीयावरून बेथेलास आला, जेव्हा यरोबोअम अर्पण करण्यासाठी वेदीजवळ उभा होता.


काही काळानंतर, म्हणजे तिसऱ्या वर्षी याहवेहचे वचन एलीयाहकडे आले: “जा आणि अहाबाच्या समोर हजर हो, आणि मी देशावर पाऊस पाठवेन.”


“खाली जाऊन इस्राएलचा राजा अहाब, जो शोमरोनमध्ये राज्य करतो त्याला भेट, आता तो नाबोथच्या द्राक्षमळ्यात आहे, तो आपल्या ताब्यात घ्यावा म्हणून तो तिथे गेला आहे.


नाथानचा पुत्र अजर्‍याह, हा राज्याधिकार्‍यांचा मुख्य होता. नाथानचा पुत्र जाबूद, राजाचा याजक व सल्लागार होता;


परंतु याहवेहच्या दूताने तिश्बी एलीयाहला निरोप देऊन म्हटले, “वर जा आणि शोमरोनाच्या राज्याच्या दूतांना भेट आणि त्यांना विचार, ‘इस्राएलमध्ये परमेश्वर नाही की काय, म्हणून तुम्ही एक्रोनचे दैवत बाल-जबूब याला विचारावयास निघाले आहात?’


दावीद राजाच्या कारकिर्दीतील घटना, सुरुवातीपासून शेवटपर्यंत द्रष्टा शमुवेल, संदेष्टा नाथान आणि द्रष्टा गाद यांच्या ग्रंथात लिहिल्या आहेत.


तेव्हा यशायाह संदेष्टा राजा हिज्कीयाहकडे गेला आणि त्याने विचारले, “ती माणसे काय म्हणाली आणि ती कुठून आली होती?” हिज्कीयाहने उत्तर दिले, “दूरवरील देशातून, ते बाबेलहून माझ्याकडे आले आहेत.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan