Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 10:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 जेव्हा अम्मोनी लोकांना समजून आले की, दावीदाला आपण घृणास्पद झालो आहोत, तेव्हा त्यांनी बेथ-रहोब व अराम-झोबाह येथून वीस हजार अरामी पायदळ, तसेच माकाहच्या राजाबरोबर एक हजार लोक आणि तोब कडून बारा हजार माणसे भाड्याने आणली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 दाविदाला आपली किळस आली आहे असे अम्मोनी लोकांनी पाहिले तेव्हा त्यांनी बेथ-रहोब येथले अरामी व सोबा येथले अरामी मिळून वीस हजार पायदळ, माका राजाचे एक हजार शिपाई व तोबाचे बारा हजार शिपाई मोल देऊन बोलावले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 आपण दावीदाचे शत्रुत्व ओढवले आहे हे अम्मोन्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी बेथ-रहोब आणि सोबा येथील अरामी माणसे मोलाने घेतली. अराम्यांचे पायदळ वीस हजारांचे होते. शिवाय त्यांनी, माका राजाची एक हजार माणसे तसेच तोबाचे बारा हजार सैनिक घेतले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 10:6
24 Iomraidhean Croise  

तेव्हा याकोब, शिमओन व लेवी यांना म्हणाला, “या भूमीतील सर्व कनानी व परिज्जी लोकांना माझी किळस येईल असे वर्तन तुम्ही केले आहे. आपण अगदी थोडके आहोत; ते आपल्यावर चालून येतील आणि आपल्याला चिरडून टाकतील व आपण सर्वजण मारले जाऊ.”


जेव्हा दावीदाला याबाबतीत सांगितले गेले, तेव्हा दावीदाने त्या माणसांची भेट घेण्यासाठी माणसे पाठवली, कारण त्यांचा मोठा अपमान झाला होता. राजाने म्हटले, “तुमची दाढी वाढेपर्यंत यरीहोतच राहा, मग परत या.”


हे ऐकून, दावीदाने युद्ध करणाऱ्या माणसांच्या संपूर्ण सैन्यासह योआबाला पाठवले.


अहीथोफेलने अबशालोमास सल्ला दिला, “तुझ्या पित्याच्या उपपत्नी, ज्यांना तो राजवाड्याच्या देखरेखीसाठी सोडून गेला त्यांच्यापाशी जाऊन नीज. तेव्हा सर्व इस्राएलास समजेल की तू तुझ्या पित्याची किती घृणा करतो आणि तुझ्याबरोबर काम करीत असलेल्या प्रत्येकाचा हात बळकट होईल.”


माकाथी अहसबैचा पुत्र एलिफेलेत, गिलोनी अहीथोफेलचा पुत्र एलीयाम,


अराम व मोआब, अम्मोनी आणि पलिष्टी आणि अमालेकी. सोबाहचा राजा, रहोबाचा पुत्र हादादेजर याच्याकडून आणलेली लूट सुद्धा दावीद राजाने याहवेहला समर्पित केली.


याशिवाय दावीद त्याच्या स्मारकाची पुनर्स्थापना करण्यास फरात नदीकडे गेला असता, त्याने सोबाहचा राजा, रहोबाचा पुत्र हादादेजरचा पराभव केला.


जेव्हा दिमिष्कातील अरामी लोक सोबाहचा राजा हादादेजरच्या मदतीला आले तेव्हा दावीदाने त्यांच्यातील बावीस हजार जणांना मारून टाकले.


जेव्हा दावीदाने जोबाहच्या सैन्याचा नाश केला, रेजोनने त्याच्यासोबत काही लोक जमा केले व तो त्यांचा पुढारी झाला; ते पुढे दिमिष्कास गेले, तिथे स्थायिक होऊन त्यांनी त्याचा ताबा घेतला.


कारण प्रभू परमेश्वराने अरामी सेनेला रथांचा आणि घोड्यांचा आणि मोठ्या सैन्याचा आवाज ऐकविला होता. तेव्हा ते एकमेकांना म्हणाले, “पाहा, आमच्यावर हल्ला चढविण्यासाठी इस्राएलाच्या राजाने पैसे देऊन हिथी व इजिप्ती राजे बोलाविले आहे.”


ज्यावेळी राजांनी आपली सैन्ये एकवटली, ज्यावेळी ते एकत्र होऊन आगेकूच करीत आले.


ते त्यांना म्हणाले, “याहवेह तुम्हाकडे पाहो व तुमचा न्याय करो! तुम्ही दोघांनी फारोह व त्याच्या अधिकार्‍यांसमोर आम्हाला किळसवाणे असे केले आहे आणि आम्हाला मारून टाकण्यासाठी त्यांच्या हाती तलवार दिली आहे.”


ते न्यायालयात नेण्याची घाई करू नकोस, कारण जर तुझा शेजारी तुला फजीत करेल, तर शेवटी तू काय करशील?


तेव्हा ते म्हणजे नथन्याहचा पुत्र इश्माएल, कोरहाचे पुत्र योहानान व योनाथान, तन्हुमेथचा पुत्र सेरायाह, नटोफाथी एफै याचे पुत्र, व माकाथी यजन्याह व त्यांचे लोक गदल्याहकडे मिस्पाह येथे आले.


तिच्या सैन्यातील भाडोत्री सैनिक एखाद्या धष्टपुष्ट वासरांसारखे झाले आहेत. तेही वळून एकत्र पलायन करतील, ते भूमीवर टिकाव धरू शकणार नाही, कारण त्यांच्यावरील संकटाचा दिवस जवळ येत आहे, त्यांना शिक्षा मिळण्याचा हा समय आहे.


मनश्शेहच्या वंशातील याईराच्या कुळाने गशूरी व माकाथी लोकांच्या सीमेपर्यंतचा अर्गोबचा संपूर्ण प्रदेश आपल्या ताब्यात घेतला; त्याच्या नावावरून त्या प्रदेशाचे नाव पडले, त्यामुळे आजपर्यंत बाशानाला हव्योथ याईर म्हणतात.)


म्हणून इफ्ताह आपल्या भावांपासून पळून गेला आणि तोब या देशात जाऊन राहिला. लवकरच त्याने गुंड लोकांची टोळी जमविली. त्या टोळीतले लोक त्याचे अनुयायी बनले व त्याच्याबरोबर राहू लागले.


जेव्हा अम्मोनी इस्राएल लोकांशी लढत होते, तेव्हा गिलआदाचे वडीलजन इफ्ताहाला आणण्यास तोब येथे गेले.


त्यांना वाचविणारा कोणी नव्हता, कारण ते सीदोनापासून दूर राहत होते आणि त्यांचा इतर लोकांशी कसलाही व्यवहार नव्हता. हे शहर बेथ-रहोब शेजारी असलेल्या खोर्‍यात होते. मग दानच्या लोकांनी ते शहर पुन्हा बांधले आणि ते तिथे राहू लागले.


तेव्हा इस्राएली लोकांनी ही बातमी ऐकली: “शौलाने पलिष्ट्यांच्या ठाण्यावर हल्ला केला आहे आणि पलिष्ट्यांसमोर इस्राएली लोक घृणित ठरले.” म्हणून लोकांना गिलगाल येथे शौलाबरोबर येण्यासाठी बोलाविण्यात आले.


आखीशने दावीदावर भरवसा ठेवला आणि स्वतःशीच म्हणाला, “तो आपल्या इस्राएली लोकांच्या दृष्टीत इतका घृणास्पद झाला आहे की, तो आयुष्यभर माझा सेवक म्हणून राहील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan